name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): परफेक्ट कृषी मार्केटयार्डचा दशकपूर्ती सोहळा संपन्न (Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard )

परफेक्ट कृषी मार्केटयार्डचा दशकपूर्ती सोहळा संपन्न (Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard )

परफेक्ट कृषी मार्केट यार्डचा 

दशकपूर्ती सोहळा संपन्न 

Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard 

नाशिक : कृषी पणन सुधारणा कायद्यान्वये २०१२ मध्ये जिल्ह्यात परफेक्ट नावाने पहिले खासगी मार्केट यार्ड सुरू झाले होते. 

Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard

परफेक्ट कृषी मार्केट यार्ड प्रायव्हेट लिमिटेड ही एक गैर-सरकारी कंपनी असून याची स्थापना १९ जानेवारी २०१२ रोजी झाली. सध्या या मार्केट यार्डचे  कामकाज सक्रिय असून  या मार्केट यार्डच्या संचालक मंडळात श्री. बापू पिंगळे, दीपक पिंगळे, देविदास निमसे आणि सोमनाथ निमसे यांचा समावेश आहे.

परफेक्ट मार्केट यार्डचा दशकपूर्ती सोहळा ७ मार्च (गुरुवारी) रोजी पार पडला त्यानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ्य शेतकऱ्यांचा सन्मान तसेच कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ‘सह्याद्री फार्मर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केले.

छत्रपती संभाजीनगर रोडवरील नांदूर शिवारातील मार्केट यार्डात  संपन्न  झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती लाभली. ते या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतीत शास्त्रोक्त पद्धतीने कामकाज केलेच पाहिजे. शेतीविषयक वाचन शेतकऱ्यांनी केले पाहिजे. कृषी विभागात जाऊन योजनांची माहिती घेतली पाहिजे. जर महिलांच्या नावावर शेती असेल तर ८० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकार शेतीत मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे शेतीविषयक योजनांची माहिती करून घ्यावी . 

ड्रोन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकरी आता खते देण्यासह फवारण्या करू शकतो. तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणले कि, शेतकऱ्यांनी आपली मते मांडली पाहिजेत, ती मते लोकप्रतिनिधींसमोर येतात. शेतकऱ्याला माल पिकवता येतो. मात्र विकता येत नाही. त्यामुळे दर आणि बाजारपेठांचा आढावा घेऊनच मालाची विक्री करायला हवी. त्यामुळे शेतीत शिकलेला माणूस आला तरच शेती क्षेत्राची प्रगती होईल, बिना शिकलेल्या माणसाची शेती राहिली नाही, अर्थसंकल्पात शेतीविषयी कोणत्या सुविधा दिल्या आहेत त्या शेतकन्यांना समजून सांगण्यासाठी अशा मार्केट यार्डच्या माध्यमातून प्रदर्शन भरविले गेले पाहिजे असेही ते म्हणाले. 

केंद्र सरकारतर्फे दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढण्यास परवानग्या देण्यास तयार आहे. पण या कंपन्या काय आहेत. हेच अजून कळले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनाच  फायदा होत आहे. अशा कंपन्या शेतकऱ्यांनी  काढल्यास ज्या  शेतमालाला हमीभाव आहे, तो शेतमाल खरेदी करता येणार आहे. सरकारकडून प्रत्येक गावाला ड्रोन दिला जाणार आहे. त्याचे महिलांना प्रशिक्षण दिले आजार आहे. विम्याच्या माध्यमातून सरकारने शेतीत गुंतवणूक केली आहे. केवळ एक रुपयात पीक विमा काढण्यात येत आहे.फार्मर प्रोडयुसर कंपन्या व शेती अवजारांवर सबसिडी आहे. शेतीसाठीच्या योजना शेतकऱ्यांना माहीत करून दिल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard

या शेतकरी मेळाव्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, परफेक्ट कृषी मार्केट यार्डचे संचालक बापू पिंगळे, राधाकिसन पठाडे, दामोदर मानकर, नाना करपे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...