name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): शेतकरी' ते 'निर्यातदार' वाटचाल! Farmers' to 'exporters' move!

शेतकरी' ते 'निर्यातदार' वाटचाल! Farmers' to 'exporters' move!

 शेतकरी' ते 'निर्यातदार' वाटचाल! 

Farmers' to 'exporters' move!

"फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स" व "सह्याद्रि फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड", नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यातील "कृषिमाल निर्यात परिषद" (Agri Export Conclave) ला महाराष्ट्रातून तरुण शिबिरार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Farmers' to 'exporters' move!

           पुणे येथील 'फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स' ही संस्था गेली बारा वर्षांपासून 'शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास' हे एकमेव उद्दिष्ट घेऊन कार्यरत आहे. त्यामध्ये 80% काम हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर टीकात्मक असते. ज्याला आम्ही 'Constructive Criticism' म्हणतो. ज्यामुळे देश पातळीवर धोरणात्मक निर्णय/ बदल होऊ शकतात. 20% विधायक कामामध्ये महिला बचत गट सक्षमीकरण, शेतकरी उत्पादक कंपनी प्रशिक्षण, जल परिषद, कार्बन क्रेडिट, कृषी पर्यटन वगैरे विविध उपक्रम असतात.

        शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्यात. पण त्यांना पुढे काय करायचे हे न समजल्यामुळे त्यापैकी बऱ्याच बंद पडल्या आहेत. इन ऍक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांना समजत नाही की काय करावे. कृषीमाल निर्यातीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्यासाठीचे सध्या अनुकूल वातावरण आहे व भविष्यात त्याला भरपूर वाव (पोटेन्शिअल) आहे. त्यांच्यासाठी, तसेच ग्रामीण भागातील उच्चशिक्षित बेरोजगार, आय. टी, इंजिनिअर, कृषि पदवीधरांना निर्यात क्षेत्रात उद्योजक बनण्याची सुवर्ण संधी आहे. विशेष म्हणजे कमीत कमी भांडवलामध्ये आपण 170 देशांमध्ये निर्यात करू शकतो.

         *ह्या परिषदेची मध्यवर्ती कल्पना (Centralised Theme) 'शेतकरी' ते 'निर्यातदार' वाटचाल अशी आहे. हा काही इव्हेंट नाही तर तुमच्या पुढील खडतर वाटचालीची सुरुवात आहे. या परिषदेमध्ये सर्व प्रश्न सुटणार नाहीत. त्याला पुढचा अभ्यास, तज्ञांच्या भेटीगाठी, कृती तुम्हालाच करावी लागेल. या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोतच.

       या बिझनेस मध्ये खूप Misconceptions, Misunderstandings, गैरसमज व काल्पनिक भीती आहेत. उदाहरणार्थ फक्त सेंद्रियच माल निर्यात करता येतो. किंवा माझ्याकडे कमी माल आहे मी कशी निर्यात करू शकतो. माझी आर्थिक फसवणूक होईल का? वगैरे. पण मित्रांनो, *दहा ग्रॅमच्या केशरपासून ते 40 फूट कंटेनर मध्ये 46 टनापर्यंत, तसेच कोथिंबिरीपासून जिवंत बोकडापर्यंत तुम्हाला निर्यात करता येते.

Farmers' to 'exporters' move!

        निर्यातदार होण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत त्याबद्दल तज्ञ मार्गदर्शन करतीलच. उदाहरणार्थ,

# कंपनी तयार करणे. (Registration of Firm)

#  कंपनीची व प्रॉडक्टची आकर्षक वेबसाईट व विविध व्हिडिओ तयार करणे.

# सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर नाव नोंदणी करून मेंबरशिप घेणे. ज्यामुळे तुम्ही जगाला दिसू शकता.

- APEDA (Agriculture & Processed Food Product Export Development Authority)

- DGFT (Directorate General of Foreign Trade)

- COO ( Common Digital platform for issuance of certificate of origin)

# प्रॉडक्ट निवडणे - तुमचा इंटरेस्ट, त्या भागातील उत्पादन, perishable / nonperishable वगैरे

# IEC- Importer - Exporter Code घेणे.

# EDC- जवळपासच्या Sea/Air port मध्ये रजिस्टर करणे.

# त्याचबरोबर तुमच्या शेतमाल /प्रोसेसड प्रॉडक्टसाठी

 - FSSAI Certificate

  - फायटोसॅनिटरी (कीड रोगमुक्त प्रमाणपत्र). हे देण्याची सोय बारा जिल्ह्यामध्ये आहे.

  - कीडनाशक उर्वरित अंश (Residue free) टेस्ट करावे लागतील.

#  त्यानंतर ग्राहक Buyer शोधणे व त्यांची विश्वासार्हता, Reliability चेक करणे.

# आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून Proper  Commercial Terms and Conditions चा अभ्यास करणे जरुरी आहे. उदाहरणार्थ 50% ऍडव्हान्स आणि 50% payment against LC लेटर ऑफ क्रेडिट वगैरे.

# सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या मालाची किंमत ठरवणे, निगोसिएशन्स व प्रॉफिट ठरवणे. आपली क्वालिटी, ब्रँड व्हॅल्यू व hidden, contingency चार्जेस गृहीत धरावे लागतील.

वेगवेगळ्या कंडिशन्स असतात.

FOB - Free on Board

CFR - Cost & Fright

CIR- Cost, Insurances & Fright

# Mode of Despatch ठरवणे

      उदाहरणार्थ,  नेपाळ आणि भुतानला बाय रोड निर्यात करू शकतो. नेपाळ जवळपास 65 टक्के आयात भारताकडून करतो. काही ठिकाणी बाय ट्रेन आहे (किसान रेल), विमानाने, जहाजाने किंवा फ्रोजन कंटेनर. त्या प्रमाणे sea worthy पॅकिंग,  प्रि- ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, माल पोहचण्यासाठी दहा दिवस लागणार असतील तर कांद्याला रेडिएशन ट्रीटमेंट करतात.

आपल्या या अभ्यासाचा फायदा दोन्हीकडे होऊ शकतो. डोमेस्टिक एक्सपोर्ट (भारतातील 141 कोटी ग्राहक) व इंटरनॅशनल एक्सपोर्ट.

आमचा हा पण प्रयत्न असणार आहे की जे यशस्वी निर्यातदार आहेत ते इतर शेतकऱ्यांकडून माल घेतील व निर्यात करतील. म्हणजे त्यांची पण bulk quanitity वाढेल व इतर शेतकऱ्यांना पण फायदा होईल.

Farmers' to 'exporters' move!
*निर्यातीसंदर्भात तुमच्या काही मागण्या / अडचणी* असतील तर आम्हाला कळवा. आम्ही सरकारकडे त्याचा पाठपुरावा करू. उदाहरणार्थ, जसे एनजीओ साठी ऑडिट करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट असतो. किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी असतो. तसे एक्सपोर्टचे सर्व रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन, प्रोसेस करण्यासाठी सिंगल विंडो ऑथॉरिटी ची जरुरी आहे. प्रत्येकाला या सगळ्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.

शेवटचा मुद्दा असा आहे की आपले सरकार जसे वेगवेगळ्या देशांबरोबर दीर्घकालीन आयात करार करतात. उदा. मलेशिया बरोबर पाम तेल. तसेच त्यांनी निर्यात करार करावे. व शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेण्याची यंत्रणा विकसित करावी, अशी आपली मागणी आहे.

आमचा असा प्रयत्न राहील की तुमच्यापैकी काही लोकांना आम्ही Hand holding करून तज्ञामार्फत मार्गदर्शन करू. तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद!

सतीश देशमुख, B.E. (Mech.),                          अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स, पुणे  

Blogger deshmukhsk29.blogspot.com

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...