दूर दूर पर्यंत...
Far away
दूर-दूर पर्यंत
दिसतात दत्तगुरू,
गुरू मनुष्यदेहाचा
उपासना करा सुरू...
दूर-दूर पर्यंत
विश्वाचे गुरूस्थान,
समग्र अध्यात्मात
गुरूमहिमेला स्थान...
दूर-दूर पर्यंत
गुरूदत्ताचे महात्म्य,
दत्तभक्तीत व्हा लीन
हाेते चित्तशुद्धी आत्म...
दूर-दूर पर्यंत
साजिरे रूप दत्तगुरूंचे,
हाकेला सत्वर पावतात
दार उघडा इच्छाशक्तीचे...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा