परतीचा प्रवासReturn Journey
परतीचा प्रवास
असताे शाेधक,
कुणालाही नसताे
ताे साधक-बाधक।।
परतीचा प्रवास
राहताे आठवणीत,
शाेधते विराणी
जगण्याच्या मैफलीत।।
परतीचा प्रवास
लेखाजोखा मांडताे,
आवश्यक परिमार्जन
आनंदही ओसंडताे।।
परतीचा प्रवास
व्हावा ताे सुखकर,
जीवन जगतांना
दुःख मिळते भयंकर।।
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment