name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): July 2021

फक्त माणूस व्हायचंय...(Just became a man)

फक्त माणूस व्हायचंय...
Just became a man

Just became a man

फक्त माणूस व्हायचंय म्हणून माणूस झालाे, 
दगडाला आकार दिला म्हणून मूर्तीत बदललाे... 

माती तुडविली म्हणून मडक्याला आला आकार, 
सुयोग्य मेहनत केली म्हणून स्वप्न झाले साकार... 

फक्त माणूस व्हायचंय म्हणून माणूस झालाे, 
खाचखळगे टाळत जगणं सुकर बनवत गेलाे... 

माझ्यापेक्षा दुःखी कष्टकरींचे जगणं मी बघितले, 
प्रतिकूल परिस्थितीतही ताेल ढळू न देता सावरले... 

© दीपक अहिरे, नाशिक

भरकटलेलं मन (A Lost mind)

भरकटलेलं मन
A Lost mind

A Lost mind

भरकटलेलं मन
येत नाही थाऱ्यावर,
कधीही येत राहते
अनाहूत भावनांची सर 

भरकटलेलं मन
कधी करतं अविचार, 
भरकटलेल्या मनावर
आहेत का खात्रीने उपचार

भरकटलेलं मन
हाेत नाही कधी स्थिर,
विचारांचे वारू
वाहतात कसे भीर भीर    

भरकटलेलं मन
बिघडवताे मनाचा ताळेबंद, 
कधी येईल का मनात
पूर्वीसारखा निरपेक्ष आनंद

@ दीपक अहिरे, नाशिक




चांगल्या सवयी...(The Best Habit)

          
चांगल्या सवयी
The Best Habit

Changlya savayi

सवय वाचनाची
वाचक घडताे,
अधिक वाचनाने
पारंगत हाेताे...

सवय वकृत्वाची
यथाेचित बाेलताे,
अधिक भाषणाने
अष्टपैलू बनताे...

सवय लिखाणाची
लेखक घडताे,
अधिक लिखाणाने
शास्त्रशुद्ध बनताे...

सवय चिंतनाची
मनन हाेत राहते,
चांगल्या सवयीने
व्यक्तीमत्व घडते...

© दीपक केदू अहिरे,
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************





घाव (wound)

घाव 
wound

Wound

तू दिलेला घाव
वर्मी मला लागला,
तुला असे वाटले
कसा भरला टाेला...

किती दिले तू
मरणासन्न घाव,
जगण्यास आता
मिळाले अनेक वाव...

काळानुसार घाव
आता ताे बसला,
व्रणाची जखम
साेडून ताे गेला...

तू कितीही देशील
गुप्तपणे हे घाव,
उलटणार तुझ्यावर
नक्की हे तुझे डाव...

@ दीपक अहिरे,
नाशिक





मायेचा हात (Maya's hand)

मायेचा हात... 
Maya's hand

Maya's hand

मायेचा हात
असावा शिरी,
हीच धनसंपदा
आमची खरी...

मायेचा हात
प्रेमाने मिळावा,
ज्येष्ठांचा आधार
हाच आमचा धावा...

मायेचा हात
कायम असावा,
त्यातून गाेडवा
कायम पाझरावा...

मायेचा हात
खुटू नये कधी,
भलेही असू द्या
माणसं ती साधी...
 
@ दीपक अहिरे, नाशिक




अबाेल मी... (Abol mi)

अबाेल मी  
Abol mi

Abol mi

  
अबाेल मी
लागलाे बाेलायला,
अन्यायाविरुद्ध
आवाज मी चालवला...

अबाेल मी
नाही सहन करणार, 
चुकलं असेल तुमचं
माझं शस्त्र पारजणार...

अबाेल मी
कसं शांत राहायचं,
वेळप्रसंगी शस्त्र
     म्यानातून काढायचं...        
अबाेल मी
नका गृहीत धरू, 
उखडलाे तर मी
ऊधळेल चाैफेर वारू... 

@ दीपक अहिरे, नाशिक


.



उध्वस्त...(ruined)

उध्वस्त 
Ruined


Ruined


ध्वस्त संसार
कसा मी सांधायचा,
निसर्गाचा प्रकाेप
कुठे मी मांडायचा...

उध्वस्त केले आम्हा
नाही वाचले कुणी, 
कशा नशीबाचा फेरा
काेसताे मनाेमनी...

उध्वस्त झाले
सारे डाेळ्यासमाेर,
जीव कसा वाचवू
युद्ध आमचे घनघोर..

उध्वस्त झालाे आम्ही
धीर कुणा द्यायचा, 
प्रत्येकाचा सुटला संयम
हात कसा हातात घ्यायचा...

@ दीपक अहिरे, नाशिक

गुरूवंदना (Guruvandana)

गुरूवंदना
Guruvandana


Guru  vandana         

गुरूने दिला 
ज्ञानरूपी वसा, 
या ज्ञानसागरात 
        पाेहताे हा मासा...        

गुरूने दाखवली
ज्ञानाची दिशा,
बदलली आमची
  जीवनाची दशा... 

गुरूने दिले 
ज्ञानाचे संस्कार, 
हेच ठरले आज 
जीवनात तारणहार...    

गुरूपौर्णिमेनिमित्त
करताे गुरूंना वंदन, 
करताे मी ज्ञानग्रहण
विकसित हाेते माझे मन... 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

Guru vandana

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

लाभले आयुष्य (Gained a life)

 लाभले आयुष्य...
Gained a life 

Gained a life

लाभले आयुष्य
सत्कारणी लाव,
तरच या जगी
मिळेल ताे भाव...

लाभले आयुष्य
समज ताे बाेनस,
नासवू नकाे ते
करून काम बाेगस...

लाभले आयुष्य
ध्येयासाठी लढ,
तरच जिंकशील
आयुष्याचा गड...

लाभले आयुष्य
वेळ जपूनी वापर,
पैसा समजूनी त्याशी
जपूनी खर्च कर...

© दीपक अहिरे, नाशिक


न पाठवलेले पत्र (Unsent Letter)

न पाठवलेलं पत्र 
Unsent Letter

Unsent Letter
 
न पाठवलेलं पत्र
कसे तुला मिळाले,
असे कसे तुझे
अनाहूत मन चाळले...

न पाठवलेलं पत्र
कसे तुला सापडले,
कधी न हाेणारे अव्यक्त
 मन तू मात्र वाचले...

न पाठवलेलं पत्र
कशा पाेहचल्या भावना,
दगड बनूनी राहिल्या
तुझ्या निश्चल मना...

न पाठवलेलं पत्र
त्याला दुःखाची किनार,
ताेंड दाबून केला तू
अशा बुक्यांचा हा मार...

© दीपक अहिरे, नाशिक

ओढ वारीची (Odh warichi)

ओढ वारीची
Odh warichi 

Odh warichi

ओढ वारीची
लागली पांडुरंगा,
भक्ती भावाचा
हा फुलवू धागा...

ओढ वारीची
भेटताे नित्यनेमाने,
स्फूर्ती येते मला
तुझ्या चिंतनाने...

ओढ वारीची
लागली तुझी आस,
दरवळला सुगंध
तूच माझा श्वास...

ओढ वारीची
तगमगताे हा जीव,
तुझ्या भेटीने
तरेल माझी नाव...

© दीपक अहिरे, नाशिक

वृत्तपत्राचे महत्त्व (Importance of newspaper)

वृत्तपत्राचे महत्त्व
 Importance of newspaper

Importance of newspaper

वृत्तपत्राचे महत्त्व
आहे जगती खास,
राेजच्या जगण्याचा
ताे झालाय श्वास..

वृत्तपत्राचे महत्त्व
जाणती लहान-थाेर,
बातम्या, वृत्तलेख
साहित्य हे पानापानावर.. 

वृत्तपत्राचे महत्त्व
स्पर्धा परीक्षार्थी जाणतात, 
दैनंदिन वाचन करून
जगाचा अभ्यास करतात.. 

वृत्तपत्राचे महत्त्व
लाेकशिक्षणाचे एक साधन, 
त्याव्दारे जनजागृती
हाेते खरे संदेश वहन... 

© दीपक अहिरे, नाशिक


चित्रकार (The painter)

चित्रकार
The Painter


Painter

चित्रकार काढताे
चित्र भावभावनांचे,
करा काैतुक त्याच्या
अभिनव कुंचल्याचे... 

चित्रकार ओतताे
चित्रात सारा जीव,
बघणार्याला वाटते
आहे कसे ते सजीव...
Painter

चित्रकार टिपताे
रंग रेषा मनस्वी,
दाद द्या काैतुकाने
चित्रांचा ताे तपस्वी...

चित्रकार आहे
चित्रसृष्टीचा नियंता,
नमस्कार त्याला माझा
या कुंचल्याचा भगवंता...

© दीपक अहिरे, नाशिक
Painter

सांग सांग भाेलानाथ (Sang Sang Bholanath)

सांग सांग भाेलानाथ
Sang sang Bholanath

Bholanath

सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल का... 
नुसतं आभाळ झाकाेळून हुलकावणी देताेय का... 

सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल का... 
किती पडेल पाऊस ही खाेटी आशा दावताेय का... 

सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल का... 
आभाळाकडे डाेळं लावून तुझी वाट पाहायची का... 

सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल का... 
गरजताे पण बरसत नाही असं तू करताेय का... 

© दीपक अहिरे, नाशिक

गैरसमज (Misunderstanding)

गैरसमज 
Misunderstanding

Misunderstanding

गैरसमज असतात अळवावरचं निसटतं पाणी, 
गैरसमज वेळीच काढा वाजतील सामंजस्याची गाणी

गैरसमज करतात मनाचा भ्रमनिरास, 
त्याला कुठेही लागतात संशयाचा अघाेरी वास

गैरसमज नका पसरवू आहे तसं स्विकारा, 
वेळच्यावेळी करत चला गैरसमजाचा निचरा

गैरसमजाने भरवू नका मनाचा कप्पा, 
नाहीतर निर्वेधपणे पडणार नाही समजाचा टप्पा

© दीपक अहिरे, नाशिक

फुलपाखरू (Butterfly)

फुलपाखरू
Butterfly

Butterfly

फुलपाखरूचे आयुष्य जेमतेम दिवसाचे,
संदेश देते आपल्याला मुक्तपणे जगण्याचे...

फुलपाखरू ठेवतं स्वतःला भिरभिरत,
फुलांच्या फांदीवर बसतं परत परत...

फुलपाखरासारखे करावे आपण भ्रमण,
चिंता व्याधी साेडून गुंतवावे ध्यानात मन...

फुलपाखरासारखे असावे आपण स्वच्छंदी,
तरच मन रहिल नितळ आणि आनंदी...

© दीपक अहिरे, नाशिक

झळ... (Burn)

झळ
Burn

Burn


झळ किती साेसावी

आली आता कळ,

आता उरले नाही

माझ्या पायात हे बळ...


झळ साेसून साेसून

शरीर आता थकले,

कसे चढवू आता मी

माझ्या स्वप्नांचे मजले..


झळ साऱ्या जन्माची

तू मला कशी दिली,

आली नाही कणव

हाेतेय आता काहिली...


झळ उभ्या आयुष्यात

साथी साथीने आल्या,

हाेता हाेता स्वप्नपूर्ती

आठवणी त्या उरल्या..

© दीपक अहिरे, नाशिक

भरारी...(Bharari)

भरारी
  Bharari 

Bharari

घेण्या भरारी

बळ पंखात भरावे,

दृढ इच्छाशक्तीने

विहार करीत रहावे...


घेण्या भरारी

सक्षम तु व्हावे,

जबाबदारीचे भान

तू लिलया पेलावे...


घेण्या भरारी

संधी ती मिळावी,

पादाक्रांत करावी

क्षेत्र नव- नवी...


घेण्या भरारी

शक्ती व्हावी प्रदान,

सर्वोत्तम  होण्याचा

तुला मिळावा मान...


© दीपक अहिरे, नाशिक

ओसाड माझे घर (Desolate my house)

ओसाड माझे घर 
Desolate my house

Desolate my House

ओसाड माझे घर
कसे म्हणता आपण,
निसर्गाच्या सानिध्यात
जपताे मी माणूसपण...

ओसाड माझे घर
दूर माळरानावर,
प्राणी पक्ष्यांच्या संगतीत
जीवन चालले बराेबर...


ओसाड माझे घर
माेठ्या मनाचे स्वागत,
कायमच असते साेबतीला
भाकरी ठेच्याची पंगत...

ओसाड माझे घर
आतिथ्य माझे साधे भाेळे,
साेबतीला रानमेवा
बहरणारे रानमळे...

©दीपक अहिरे, नाशिक


माझ्या दारी (My door)

माझ्या दारी
    My door

My door

माझ्या दारी
फुलली आंब्याची बाग
विविध फळफुलझाडांना 
लागलाय भरघोस लाग...

माझ्या दारी
रान तुळस फुलल्या,
झुपकेदार मंजिरी
बघा कशा आल्या...

माझ्या दारी
फुलला गुलाब,
फळझाडांची ठेवताे
निगा आणि आब...

माझ्या दारी
फुलवली बाग छाेटेखानी,
तीच देते आनंद
वेळ लागतो सत्कारणी...

© दीपक अहिरे, नाशिक

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...