भरकटलेलं मन
भरकटलेलं मन
येत नाही थार्यावर,
कधीही येत राहते
अनाहूत भावनांची सर
भरकटलेलं मन
कधी करतं अविचार,
भरकटलेल्या मनावर
आहेत का खात्रीने उपचार
भरकटलेलं मन
हाेत नाही कधी स्थिर,
विचारांचे वारू
वाहतात कसे भीर भीर
भरकटलेलं मन
बिघडवताे मनाचा ताळेबंद,
कधी येईल का मनात
पूर्वीसारखा निरपेक्ष आनंद
@ दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा