मायेचा हात...
Maya's hand
मायेचा हात
असावा शिरी,
हीच धनसंपदा
आमची खरी...
मायेचा हात
प्रेमाने मिळावा,
ज्येष्ठांचा आधार
हाच आमचा धावा...
मायेचा हात
कायम असावा,
त्यातून गाेडवा
कायम पाझरावा...
मायेचा हात
खुटू नये कधी,
भलेही असू द्या
माणसं ती साधी...
@ दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment