उध्वस्त
उध्वस्त संसार
कसा मी सांधायचा,
निसर्गाचा प्रकाेप
कुठे मी मांडायचा...
उध्वस्त केले आम्हा
नाही वाचले कुणी,
कशा नशीबाचा फेरा
काेसताे मनाेमनी...
उध्वस्त झाले
सारे डाेळ्यासमाेर,
जीव कसा वाचवू
युद्ध आमचे घनघोर..
उध्वस्त झालाे आम्ही
धीर कुणा द्यायचा,
प्रत्येकाचा सुटला संयम
हात कसा हातात घ्यायचा...
@ दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा