झळ
Burn
झळ किती साेसावी
आली आता कळ,
आता उरले नाही
माझ्या पायात हे बळ...
झळ साेसून साेसून
शरीर आता थकले,
कसे चढवू आता मी
माझ्या स्वप्नांचे मजले..
झळ साऱ्या जन्माची
तू मला कशी दिली,
आली नाही कणव
हाेतेय आता काहिली...
झळ उभ्या आयुष्यात
साथी साथीने आल्या,
हाेता हाेता स्वप्नपूर्ती
आठवणी त्या उरल्या..
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment