name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा (Progressive Farmer: The Success Story of Mahendra Singh Chhagan Singh Pardeshi)

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा (Progressive Farmer: The Success Story of Mahendra Singh Chhagan Singh Pardeshi)

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा 
Progressive Farmer: The Success Story of Mahendra Singh Chhagan Singh Pardeshi

Pragatshil shetkari mahendrasingh pardeshi yanchi yashogatha
पिंपळनारे(वडनेरभैरव) येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग परदेशी यांची पपई फळबाग 

 चांदवड तालुक्यातील पिंपळनारे येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी या शेतकऱ्याने एक एकर पपईची लागवड केली आहे. पिंपळनारे येथील हे शेतकरी अत्यंत कष्टाळू व आधुनिकतेची कास बाळगलेले शेतकरी म्हणून अवघ्या नाशिक जिल्ह्यात विशेषत: चांदवड, निफाड, दिंडोरी या तीन तालुक्यात तर नक्कीच परिचित आहेत. 


        पूर्वी पिंपळनारे हे नागवेलीच्या पानासाठी अतिशय प्रसिद्ध गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव म्हणजे चांदवड तालुक्यातले काश्मीर म्हणूनही या भागाची पूर्वपार ओळख आहे. याच पिंपळणारे गावातील श्री महेंद्रसिंग परदेशी यांनी द्राक्ष, टोमॅटो शेतीबरोबरच नगदी पीक म्हणून पपई या पिकाची लागवड केली.

       

     पपई या पिकाबाबत फारशी माहिती नव्हती. परंतु लागवडीचा त्यांनी निर्धार केला. नर्सरीतून साधारणत: १० रुपये नगाने "नंबर १५" या पपई पिकाचे हजार रोपे  विकत आणून शेतात लागवड केली. ही लागवड करताना आठ बाय सहा फूट हे अंतर त्यांनी ठेवले ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल नळी टाकून ठिबक सिंचनावरच ही पपईची शेती सुरू केली. पपई रोपे लावल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांच्याकडे पपई उत्पादन सुरू झाले.

        

     पपईचा माल तयार झाल्यानंतर अनेक व्यापारी शेतात येऊन गेले. श्री.परदेशी यांनी स्थानिक मार्केटला   १० रुपयांपासून ते ३५ रुपये किलोपर्यंत पपई विक्री केली आहे. नाशिक मार्केटमध्ये सुद्धा त्यांनी पपईची विक्री केली. साधारणत: एक एकर क्षेत्रात १००० झाडे त्यांनी लावली. संपूर्ण खर्च त्यांचा हा लागवडीपासून मशागत, पावडर यावर सुमारे पन्नास हजार रुपयांच्या आत आलेला आहे तर श्री. परदेशी यांना सरासरी २५ रु. किलो बाजारभावाने एक झाड १०० किलोच्या आसपास बसते यानुसार त्यांना सुमारे साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पादन एक एकरातून मिळालेले आहे.  एक वर्षाची बाग झालेली आहे अजून सहा महिने ही बाग चालेल असे श्री.परदेशी म्हणणं आहे. 

       

   पहिल्यापासूनच परदेशी परिवार हा चिकाटीने शेती करणार असल्याकारणाने या पपई फळबाग शेतीत सुद्धा त्यांना चांगले आर्थिक उत्पादन मिळालेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार द्राक्षबागा आणि टोमॅटो या शेतीमध्ये जितके पैसे होतात. तितकेच पैसे कमी श्रमामध्ये त्या मानाने पपई  शेतीत होत आहे.


     पपईचा किलोचा भाव हा १० रुपयांच्या वरती असला तर आपल्याला काढणी, पॅकिंग आणि मार्केट वाहतूक  परवडते. जेव्हा १० रुपयांच्या आत बाजारभाव आला तेव्हा मी मार्केटमध्ये माल न नेता तो खुडून टाकला. जेव्हा चांगला भाव आला तेव्हा मी मार्केटमध्ये माल घेऊन जायला लागलो असल्याचे श्री.परदेशी म्हणतात. आता मात्र भाव चांगले आहे. सरासरी १० रु. ते जास्तीत जास्त ३५ रुपये किलोपर्यंत मला बाजारभाव मिळाला असल्याचे श्री. परदेशी यांनी स्पष्ट केले. मशागतीच्या बाबतीत द्राक्षबाग आणि टोमॅटोची शेती पेक्षा पपई शेतीला कमी श्रम लागतात.तुलनेने कमी श्रमात तितकेच पैसे या प्लॉटने मला दिलेले असल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. 


     वडनेरभैरव  परिसरात आता द्राक्ष व टोमॅटो या पिकाबरोबरच अनेक तरुण शेतकरी हे डाळिंब, पेरू आणि पपई पिकाकडे वळलेले आहे ही स्थित्यंतराची पहिली पायरी मानली जाते. कारण वडनेरभैरव सह परिसरातील गावे ही द्राक्ष बागांसाठी व टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जगाच्या अनेक देशात इथली द्राक्ष व टोमॅटो त्याचबरोबर कांदा निर्यात केला जातो. सध्या तरी पपई या पिकाला देशांतर्गतच मार्केट बाजारभाव मिळाल्याने निर्यातीबाबत तसा विचार केला नसल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. 

Pragatshil shetkari mahendrasingh pardeshi yanchi yashogatha
पिंपळनारे (वडनेर भैरव) येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांच्या पपई फळबाग भेटी प्रसंगी श्री. नितीन माळी, श्री.संतोष पवार, श्री.सुरेश सलादे व श्री. मिस्तरी

श्री. नितीन दौलतबाबा माळी यांचे मनोगत

  मी फळे व भाजीपाला वाहतूक करणारा शेतकरी असून श्री. परदेशी परिवार हा शेतीनिष्ठ परिवार असून नवीन प्रयोग शेतीमध्ये करणाऱ्यांपैकी ते एक आहेत 

    श्री. महेंद्रसिंग परदेशी यांनी पपई फळबाग उभी केली त्याचा त्यांना नक्कीच चांगला आर्थिक लाभ देखील झालेला आहे. द्राक्षशेती ही आता भूषणावह शेती म्हणून प्रसिद्ध आहे. 

श्री. संतोष आबा पवार यांचे मनोगत

   आज महेंद्रसिंग परदेशी यांच्या पपई फळबागेला भेट दिली. झाडांची उत्पादनक्षमता आणि मिळालेला भाव यामुळे त्यांना त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. तरुण शेतकरी हे आता विविध व्यापारी तत्त्वावर फळबागांकडे वळत आहे. नक्कीच हा बदल शेती मधला सकारात्मक बदल म्हणता येईल. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दोन पैसे शेतकऱ्याच्या हातात मिळण्यास नक्कीच पपई फळबाग उपयोगी पडेल असे जाणवले. 


     पपई फळबाग उत्पादक श्री. महेंद्रसिंग परदेशी पिंपळनारे, वडनेरभैरव परिसरात आमच्याकडे द्राक्षबाग व टोमॅटो आणि कांदे यासारखे नगदी पिकं आम्ही घेत असतो एक प्रयोग म्हणून एक एकर शेतात पपई या फळबागेची लागवड केली. फारसा अनुभव त्यात नव्हता परंतु असे जाणवत आहे की द्राक्ष, टोमॅटो या बागेपेक्षा कमी मेहनतीत योग्य बाजारभाव मिळाला तर नक्कीच या पिकाला चांगले दिवस आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा (Progressive Farmer: The Success Story of Mahendra Singh Chhagan Singh Pardeshi)

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा  Progressive Farmer: The Success Story of Mahendra Singh Chhagan Singh Pardeshi प...