name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार 2026 जाहीर : महाराष्ट्रातील 31 मान्यवरांचा सन्मान | Rajiv Gandhi Krushiratna Award 2026 Announced in Maharashtra

राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार 2026 जाहीर : महाराष्ट्रातील 31 मान्यवरांचा सन्मान | Rajiv Gandhi Krushiratna Award 2026 Announced in Maharashtra


राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार 2026 जाहीर : महाराष्ट्रातील 31 मान्यवरांचा शेताच्या बांधावर होणार गौरव

Rajiv Gandhi Krushiratna Award 2026 Announced in Maharashtra


Rajyastariya rajiv gandhi krushi ratna puraskar 2026


  राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, अमरावती यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार सन 2026 ची घोषणा करण्यात आली असून, यावर्षी राज्यभरातील विविध कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 31 प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ञ, कृषी उद्योजक, महिला शेतकरी, कृषी संस्था व कृषी पत्रकारांची निवड करण्यात आली आहे.


     हा पुरस्कार सोहळा 21 मे ते 28 मे 2026 दरम्यान “राजीव गांधी कृषीरत्न शेतकरी सन्मान सप्ताह” म्हणून साजरा होणार आहे. विशेष म्हणजे पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा गौरव त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सन्मान सोहळा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


    यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून 158 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी विविध कृषी प्रवर्गातून निवड समितीने 31 जणांची निवड केली आहे.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी

उत्कृष्ट बैलगाडी व बैलगाडी मालक

श्री. सचिन मोरे – दोनद, जि. अमरावती

उत्कृष्ट तिफणकरी

श्री. ज्ञानेश्वर सराटे – रोहणखेड, अमरावती
श्री. भिमराव गवई – वायगाव, ता. भातकुली

आदिवासी महिला शेतकरी

श्रीमती जिजाबाई डोटले मावस्कर – टिटवा
श्रीमती अरुणा दिनेश बनसोड – कुरुमफळ
श्रीमती प्रेमा नानासाहेब लव्हाळे – अमरावती

उत्कृष्ट महिला शेतकरी

सौ. जयश्रीताई खवले – शिवणगाव
कु. सुशिला बिडकर – पुसदा
मा. बेबी बिडकर – पुसदा

उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकरी

मा. युसुफमुल्ला खलिलमुल्ला – पुसदा
मा. अनिल कडू – धुपगाव
श्री. गोपाल वस्तू – रामगाव
श्री. भाऊराव कोर्डेकर – पुसदा

उत्कृष्ट तूर उत्पादक शेतकरी

श्री. भास्कर हिरगावे – पुसदा

उत्कृष्ट संत्रा उत्पादक शेतकरी

श्री. मंगेशराव कडू – विघोरा

उत्कृष्ट चिया सीड्स उत्पादक शेतकरी

श्री. संतोष रोही – शिरोली बु.

उत्कृष्ट फळबागायतदार

मा. शेर अली अब्दुलभाई लालानी – वाठोणा बाजार

उत्कृष्ट बियाणे उत्पादक शेतकरी

श्री. बबनराव कुटे – घाटा, जि. वाशीम

उत्कृष्ट युवा कृषी उद्योजक

श्री. अजिंक्य तिडके – सोनाळा, जि. बुलढाणा

उत्कृष्ट ब्लॉगर आणि कृषी पत्रकारिता

श्री. दीपक केदू अहिरे – नाशिक

उत्कृष्ट कृषी संस्था

स्नेहवन संस्था, आंबोडी, पुणे
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे

Shri.Vilas shinde, chairman, sahyadri farm
श्री. विलास शिंदे, चेअरमन, सह्याद्री फार्म, नाशिक 

उत्कृष्ट कृषी संस्था व कृषी उद्योजक

सह्याद्री फार्म–नाशिक

उत्कृष्ट रेशीम उत्पादक शेतकरी

अॅड. विवेक लाड पाटील–अहमदनगर

उत्कृष्ट युवा शेतकरी

श्री. विशाल प्रदीप पाटील–तासगाव, सांगली

उत्कृष्ट राजीव गांधी सद्भावना पुरस्कार

श्री. सचिन राजूरकर–चंद्रपूर

उत्कृष्ट गाव विकास

गाव करणारा समूह

उत्कृष्ट कृषी वैज्ञानिक

प्रा.राहुल घोघरे–के.व्ही.के. 
दुर्गापूर, अमरावती

उत्कृष्ट कृषी मित्र कृषी अधिकारी

कु. सीमा उत्तमराव देशमुख – कृषी विभाग, अमरावती

उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी

कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनी – राजुरा


बांधावर होणार सन्मान

   या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा गौरव थेट त्यांच्या गावात व शेताच्या बांधावर जाऊन करण्यात येणार आहे. 21 मे ते 28 मे या कालावधीत अमरावती, वाशीम, बुलढाणा, चंद्रपूर, पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर यासह विविध जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम पार पडणार आहेत.

Shri. Prakash sable, adhyaksha, rajiv gandhi krushi vidnyan pratisthan, amravati

   राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश साबळे यांनी सांगितले की, “शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या कार्यभूमीवर जाऊन सन्मान करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आधुनिक, प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”

Shri. Deepak Ahire, ukrushta blogger va krushipatrakarita puraskar vijete
श्री.दीपक अहिरे, उत्कृष्ट ब्लॉगर व कृषी पत्रकार 

दीपक अहिरे यांची कृषी पत्रकारितेत विशेष छाप

  नाशिक येथील दीपक केदू अहिरे हे डिजिटल कृषियोग या डिजिटल माध्यमातून शेतीविषयक माहिती, बाजारभाव, कृषी योजना, आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, कृषी उद्योजकता आणि शेतकरी मार्गदर्शन सातत्याने करत आहेत. सोशल मीडिया, ब्लॉग आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी लाखो शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली आहे.

    त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कारासाठी “उत्कृष्ट ब्लॉगर आणि कृषी पत्रकारिता” या विभागात त्यांची निवड करण्यात आली आहे. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हाच तो चहा! जागतिक चहा दिन विशेष ब्लॉग | International Tea Day Marathi

हाच तो चहा This is the tea "सकाळची सुरुवात तुझ्याशिवाय होत नाही, आणि तुझ्याशिवाय संध्याकाळची मैफल रंगत नाही..." ​  आपल्या भा...