name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची पत्रकार परिषद संपन्न (Rajiv Gandhi Agricultural Science Foundation's press conference concluded)

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची पत्रकार परिषद संपन्न (Rajiv Gandhi Agricultural Science Foundation's press conference concluded)

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची पत्रकार परिषद संपन्न...
Rajiv Gandhi Agricultural Science Foundation's press conference concluded...

Rajiv Gandhi krushi vidnyan pratishthanchi patrakar parishad sampanna


      अमरावती येथील राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानची श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार २०२४-२५ याबाबत माहिती विशद करण्यासाठी पत्रकार परिषद संपन्न झाली. 


   यावेळी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश दादा साबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य अनुला खान, सन्माननीय ज्योतीताई ढोकणे, राहुल तायडे, दत्तात्रय किटुकले, प्रा.सुनील सावळे, प्रवीण वानखडे, प्रा. सतीश काळे, राहुल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २७ एप्रिल २०२५ रोजी पत्रकार परिषद पुणे येथे संपन्न झाली.
    
    २१ मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान विज्ञान क्रांतीचे जनक स्व.राजीव गांधी यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान राज्यस्तरीय राजीव गांधी, कृषीरत्न पुरस्कार देऊन साजरा केला जाणार आहे. 
    
    सन २००७ पासून सातत्याने हा उपक्रम सुरू असून शेतकरी सन्मानाचे सलग १९ वे वर्ष आहे. आजपर्यंत २७० प्रगतशील शेतकरी, कृषी कंपनी, शेतमजूर, कृषी वैज्ञानिक, कृषी उद्योजक, कृषी पत्रकार, महिला शेतकरी यांना सदर पुरस्कार प्रदान केला आहे. राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार प्राप्त १२८ शेतकऱ्यांना आजपर्यंत राज्य शासनाचे कृषी पुरस्कार प्राधान्याने जाहीर झाले आहेत. 
     
  राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार सोहळा २१ मे २०२५ ते २७ मे २०२५ पर्यंत शेतकरी सन्मान सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याची सुरुवात २१ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बैल जोडी पूजनाने होणार आहे.  सदर सोहळा अमरावती तालुक्यातील अंगोळा या गावातून उत्कृष्ट बैल जोडी मालक शेतकऱ्याचा सन्मान व बैलजोडी पूजनाने होईल. सोहळ्याचा समारोप २७ मे २०२५ रोजी राजीव गांधी शेतकरी सद्भावना पुरस्कार देऊन होणार आहे.या सोहळ्याचे आयोजन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती तर्फे होत आहे. 
 
 सदर पुरस्कारासाठी राज्यभरातील विविध प्रांतामधून २१ शेतकरी निवडले जाणार आहे. यामध्ये प्रयोगशील शेतकरी महिला, शेतकरी कृषी वैज्ञानिक, उत्कृष्ट शेतकरी,कृषी उद्योजक फार्मर  कंपनी तसेच कृषी पत्रकारिता प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मधून एक अशा पद्धतीने निवड होणार आहे. यावर्षी विशेष कृषी पुरस्कार देणार देण्यात येणार आहे. ज्यामध्ये शेतकरी सद्भावना मित्र पुरस्कार, दुग्ध उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट कृषी अवजार संस्था, उत्कृष्ट बैल जोडी मालक, उत्कृष्ट शेतकरी मित्र, कृषी अधिकारी, फळबागायतदार, प्रगतशील आदिवासी शेतकरी, बियाणे संशोधक, फुलशेती उत्पादक शेतकरी, वनऔषधी उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट गाव कारभारी सरपंच, उत्कृष्ट मत्स्यपालन व्यवसायी, रानभाजी उत्पादक शेतकरी, सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, युवा शेतकरी अशा प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष कृषी कार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
      
    राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानने शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाच्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी व ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमाताई सवई यांच्या अध्यक्षतेखाली १६ कृषीतज्ञांची शेतकरी निवड समिती नेमली असून ही समिती दिनांक १० मे २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची निवड करणार आहे. 
     
  निवड झालेल्या राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, राजीव गांधी यांची प्रतिमा, मानधन, प्रमाणपत्र, सन्मानाच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय आयोजनामध्ये राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे पुरस्कारासाठी जवळपास ३०० प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. 
      
   सदर शेतकरी सन्मानाचा सोहळा हा स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारा देशभरातील एकमेव कार्यक्रम आहे. कृषीक्षेत्राला विज्ञानाची जोड देऊन देशातील शेतकऱ्यांना प्रगतीचे नवे दालन उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य स्व. राजीव गांधी यांनी केले. तेव्हा या सर्व शेतकरी समाजाच्या वतीने २१ मे ला स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. 

  या शेतकरी सन्मानाच्या कार्यक्रमास राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या भागातील मान्यवर मंडळी, कृषीतज्ञ आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. राज्यभरातील पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी सपत्नीक व सहपरिवार सन्मानित करण्यात येणार आहे. 

  सदर पुरस्कारासाठी आवेदन करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे. सदर पुरस्कार व्हॉट्सॲप, ई-मेल आयडी किंवा खालील शेतकरी निवड समितीच्या सदस्यांच्या पत्त्यावर किंवा ऑनलाईन पाठवावे
   
  पुरस्कारासाठी आवेदन करण्याचा संपर्क व पत्ता व ईमेल आयडी पुढीलप्रमाणे असून पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 श्री. प्रकाश भाऊसाहेब साबळे मु. पो. नया अकोला, ता. जि. अमरावती पिन- ४४४८०१ आहे. मोबाईल क्र.- 9607735913 (व्हॉट्सॲप), ई-मेल आयडी-prakashsable123@gmail.com

  डॉ. दिलीप काळे, अध्यासन प्रमुख, श्री संत गाडगेबाबा अध्यासन, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, डॉ. श्रीकांत जिचकर मेमोरियल हॉल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. मोबाईल नंबर-9423424512

  सौ. पौर्णिमाताई सवाई, मु. पो. टाकरखेडा शंभू , ता.भातकुली जि.अमरावती, व्हाट्सअप नंबर-9766022126


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...