name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): June 2024

बचत समूहातील उत्पादनांची ऑनलाइन विक्री ( Online sale of Bachat group products)

बचत समूहातील उत्पादनांची ऑनलाइन विक्री
Online sale of Bachat group products

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग :'गोदाव्हॅलीकार्ट'वर उपलब्ध
First experiment in the District : Available on 'Goda Valley Cart'


Goda valley cart

नाशिक : ग्रामीण भागातील महिला बचत समूहाकडून तब्बल तीनशे प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियान नाशिकच्या वतीने 'गोदा व्हॅली कार्ट' हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

Goda valley cart
Ashima mittal CEO zillha parishad 


जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांचे आवाहन

  या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक गृहोपयोगी वस्तू याठिकाणी रास्त दरात खरेदी करता येतील. या संकेतस्थळाचा वापर करून वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
      उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सर्वांगीण जीवनमान उंचवावे, आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम व्हाव्यात, यासाठी त्यांचे उद्योग सुरू करून त्यांना स्थानिक, शहरी बाजारपेठ मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

Goda valley cart


गोदा व्हॅली कार्ट' या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती

शासनाच्या वतीने विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, मोफत प्रशिक्षण देणे, उद्योग सुरू करण्यासाठी ग्रामसंघ-प्रभाग संघाकडून अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करून देणे, बँकेकडून कर्ज मिळवून देणे, तसेच त्यांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'गोदा व्हॅली कार्ट' या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.

Goda valley cart


उत्पादित वस्तूंचा दर्जा व गुणवत्ता उत्तम

बचत गटांकडून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तूंचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असून, खाद्यपदार्थामध्ये उद्योग करणाऱ्या उद्योग समूहांची संख्या शंभराच्या वर आहे तर विविध प्रकारची पापड उद्योग करणाऱ्या समूहांची संख्या दोनशे पेक्षा जास्त आहे. या सर्व उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून ग्रामीण महिलांना त्यांच्या उद्योगवाढीस चालना मिळेल या उद्देशाने हे व्यावसायिक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

Goda valley cart

'तत्त्व' या ब्रँडअंतर्गत उत्पादित विविध उत्पादने

'तत्त्व' या ब्रँडअंतर्गत उत्पादित होणाऱ्या आकर्षक कलाकुसरीच्या साड्या, बेडशीट, लेडिज कुर्ता, दुपट्टा, पाटीलकी ब्रँडच्या माध्यमातून पैठणी, ज्वेलरी व पैठणी साड्या, मिक्स मास्टर अंतर्गत तब्बल ६९ प्रकारचे प्रिमिक्स, इटवायझली या ब्रँडखाली नागली कुकीज, नागली इडली, डोसा,उत्तप्पा, अप्पे, प्रीमिक्स, तर बाँडिंग स्टोरीज या ब्रँडच्या माध्यमातून चॉकलेट, राख्या, किचेन अशा अनेक ब्रँडेड वस्तू उपलब्ध आहे.

वेबसाइटवर खरेदी

ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या या वस्तू आपल्या उपयोगाच्या आहेत. त्या गोदा व्हॅली कार्ट https://godavalleykart.com या वेबसाइटवर खरेदी करता येणार आहे.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube


Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :

पर्यटन विभागाच्या 'आई' योजनेंतर्गत १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज (15 lakhs interest free loan under Tourism Department's 'Aai' scheme)


पर्यटन विभागाच्या 'आई' योजनेंतर्गत १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
15 lakhs interest free loan under Tourism Department's 'Aai' scheme

Aai scheme


नाशिक : राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'आई' महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले आहे.

नवी कर्ज योजना सुरू

या धोरणाअंतर्गत महिला उद्योजकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.

बिनव्याजी कर्ज उपलब्ध

पर्यटनक्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत.

Aai scheme

पर्यटन धोरणाची पंचसूत्री

महिला उद्योजकता विकास, पायाभुत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

व्यवसायासाठी या बाबी आवश्यक

पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे, हा व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेला असला पाहिजे, हॉटेल / रेस्टॉरंट्सची मालकी ही महिलांची आणि ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिलाच आवश्यक, टूर आणि ट्रॅवल्स एजन्सीमध्ये ५०% कर्मचारी महिला आवश्यक आहे.  पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.
Aai scheme

या व्यवसायासाठी मिळणार कर्ज :

पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन, बी  अँण्ड बी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, टेंट, ट्री हाउस, हॉटेल, पर्यटन व्हिला, वूडन कॉटिजेस, कॅरॅव्हॅन, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल)  महिला चलित कॉमन किचन, टुरिस्ट ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर, मेडिकल टुरिझम व इतर पर्यटन व्यवसाय अशा स्वरूपाचे ४१ प्रकारच्या व्यवसायांचा समावेश आहे

ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज करा

महिलां अर्जदारांना पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्जासाठी ५० रुपये शुल्क असून सध्या ऑफलाइन अर्ज देखील पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या योजनेच्या जनजागृतीवर भर देण्यात येणार असून बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही कळविण्यात येणार आहे.

प्लास्टीक पिशवी (plastic bag)


प्लास्टीक पिशवी
Plastic bag 


Plastic bag


प्लास्टीक पिशवी

धोकादायक पर्यावरणासाठी, 

३ जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टीक पिशवी मुक्त दिन 

प्लास्टीक विरोधात जनजागृतीसाठी...


प्लास्टीक पिशवी 

शेकडो वर्ष कुजण्यासाठी लागतात, 

पर्यावरणासाठी 

गंभीर समस्या निर्माण करतात.


प्लास्टीक पिशवी 

प्रथम प.युरोपमध्ये वापर बंद केला 

बॅग्ज फ्री वर्ल्ड ऑर्गनायझेशन संस्थेने 

आंतरराष्ट्रीय प्लास्टीक पिशवी मुक्तीदिन सुरू केला


प्लास्टीक पिशवी

भारतामध्ये प्लास्टीक पिशवीवर बंदी 

जगभरात लोकप्रिय हा दिवस

पर्यावरण वाचवण्याची हीच नामी संधी


© दीपक केदू अहिरे, नाशिक 

Plastic bag

 3 July - International plastic bag free day

आंतरराष्ट्रीय योग दिन (International yoga day)


Antarrashtriya yoga din

आंतरराष्ट्रीय योग दिन 
International yoga day 

Antarrashtriya yog din
मराठी स्व-काव्यांकुर 


२१ जूनला साजरा होतो 
आंतरराष्ट्रीय योग दिन,  
या दिवशी दिवस मोठा,रात्र लहान 
भगवदगीतेत योग संस्कृतेची विण... 


योगाच्या माध्यमातून आपण  
शरीर आणि मन ठेवा तंदुरस्त, 
तन-मन यांचा एकत्रित व्यायाम 
योगाच्या अंतर्भावाने करू दुरुस्त... 


सामाजिक व आध्यात्मिक गरजा 
पूर्ण करण्यासाठी योग हे साधन, 
तणाव कमी होण्यासाठी 
साधावे मानसिक संतुलन... 


योगामुळे धैर्य आणि शांतता 
आत्मविश्वास वाढीस लागते, 
चिंता अणि नैराश्य दूर होऊन 
शारीरिक क्षमता आणि सतर्कता वाढते...


© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

Antarrashtriya yoga din
हिंदी स्व-काव्यांकुर 

अंतर्राष्ट्रीय योग दिवस  
International yoga day 


21 जून को मनाया जाता है 

अंतर्राष्ट्रीय योग दिवस,  

इस दिन दिन बड़ा और रात छोटी होती है। 

भगवद्गीता में योग और संस्कृत का समन्वय... 


योग के माध्यम से आप  

अपने शरीर और मन को स्वस्थ रखें, 

शरीर और मन का संयुक्त व्यायाम 

आइये योग की मदद से इसे ठीक करें... 


सामाजिक और आध्यात्मिक आवश्यकताएं 

योग एक साधन है, जो इच्छाओं की पूर्ति करता है। 

तनाव कम करने के लिए 

मानसिक संतुलन प्राप्त करें... 


योग साहस और शांति लाता है 

आत्मविश्वास बढ़ने लगता है, 

चिंता और अवसाद दूर हो जाते हैं। 

शारीरिक क्षमता और सतर्कता बढ़ती है...


© दीपक केदू अहिरे, 

नासिक 

Antarrashtriya yoga day
इंग्लिश स्व-काव्यांकुर 

International Yoga Day 
आंतरराष्ट्रीय योग दिन 


June 21 is celebrated as 

International Yoga Day, 

On this day, the day is long, the night is short 

Yoga culture is woven in the Bhagavad Gita


Through yoga, we can 

keep our body and mind healthy, 

exercise the body and mind together 

with the content of yoga, we can correct 


Yoga is a tool to fulfill 

social and spiritual needs, 

to reduce stress

achieve mental balance


Yoga increases courage and peace 

Self-confidence increases, 

Anxiety and depression are eliminated, 

Physical ability and alertness increase


© Deepak Kedu Ahire

Nashik

Antarrashtriya yoga din

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनविणारी "थेंगा कोको" कंपनी (Thenga Coco" company making sustainable, eco-friendly handicrafts from coconut shell)


नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनविणारी "थेंगा कोको" कंपनी
"Thenga Coco" company making sustainable, eco-friendly handicrafts from coconut shell

असे उपक्रमशील उद्योजक : मारिया कुरियाकोस


Thenga coco

  कोट्यधीश बनण्यासाठी कष्ट आणि मेहनत घेण्याची तयारी लागते. आज आम्ही तुम्हाला अशा उपक्रमशील महिलेबाबत सांगणार आहोत, जिने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या नारळाच्या कवचापासून कमाईचं नवं साधन शोधलं. या महिलेचं नाव आहे मारिया कुरियाकोसे

Thenga coco

थेंगा कोको नावाच्या कंपनीची स्थापना

 मारियानं २०१९ मध्ये थेंगा कोको नावाच्या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Thenga coco

नारळाचे कवच गोळा करण्यास सुरुवात

 २०१९ मध्ये मारिया कुरियाकोस यांनी केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात नारळाचे कवच गोळा करण्यास सुरुवात केली. मारियाने हे कवच चांगल्यारितीने स्वच्छ केले. त्यानंतर त्यावर सँडपेपरचा वापर करून त्याचा पृष्ठभाग अतिशय सुबक केला. मारिया यांनी स्थानिक प्रक्रिया युनिटमध्ये नारळाची टरफले जाळली किंवा टाकून दिल्याचे पाहिल्यानंतर हा टिकाऊ उपक्रम सुरू केला.

नारळाच्या कवचापासून हस्तकला

 मारियाची दृष्टी नारळाच्या भुसा आणि टरफल्यांसाठी नाविन्यपूर्ण वापर शोधणे ही होती. यातून काही हस्तकला तयार करता येईल का? असा नेहमी ती विचार करत असे. जे प्रामुख्याने महागड्या हस्तकलेमध्ये बदलले होते, ज्यांना त्यांच्या श्रम-केंद्रित स्वभावामुळे कुशल कारागीरांची आवश्यकता होती. मारियाने कप, सॉसर, साबण डिशेस आणि कटलरी यांसारख्या व्यावहारिक वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले, ज्यांचे उत्पादन करणे आव्हानात्मक असले तरी, पारंपारिक हस्तकलेच्या कलात्मक कौशल्याची मागणी होती. ती तिने विविध उत्पादने बाजारात आणून तयार केली. नारळाच्या कवचाचा उपयोग कचऱ्यातून टाकाऊपासून टिकाऊ, पर्यावरणासाठी चांगले आणि हस्तनिर्मित घरगुती वापरासाठी तयार होणाऱ्या उत्पादनासाठी करण्यात आला. मारियाने या व्यवसायाला थेंगा कोको असं नाव दिलं आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होता.

Thenga coco

घड्याळ, मॅरेथॉनचे पदक इ. वस्तू बनवल्या

 नारळाचं झाड खास असते. त्याला कल्पवृक्षही म्हटलं जाते. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगाचा असतो. मग ते झाडाचे खोड, फळे, मुळे असोत, मारिया यांना या उपयोगी भागातून प्रयोगशील आयडिया सुचली. थेंगाचे हाताने बनवलेले घड्याळ हे एक उत्पादन असून नैसर्गिक नारळाच्या कवचाच्या चौकोनी तुकड्यांचे बनलेले जे कोडे सारखे एकत्र येतात. परिणाम म्हणजे एक सुंदर आणि मातीचा तुकडा जो तुमच्या बेडसाइड टेबल्स आणि ऑफिसच्या कोनाड्यांना सुशोभित करण्यास योग्य आहे.
थेंगाने नारळाच्या कवटीपासून  मॅरेथॉनचे पदकही बनवले. या  शाश्वत पदकांना प्रोत्साहन द्यावे आणि आपण निर्माण करत असलेला धातूचा कचरा कमी करू या.

Thenga coco

समुदायाचे मानले आभार

 “मला यशाच्या सूत्राबद्दल खात्री नाही. माझ्या मते, प्रत्येक व्यक्ती स्वत: च्या यशाचा अर्थ आणि व्याख्या तयार करू शकते. प्रत्येकाची स्वतःची ताकद आणि कमकुवतता असते, त्यांची काम करण्याची क्षमता असते, ते गोष्टी कशा घडवतात त्यावर ते अवलंबुन असते  असे  मारियाने एका मुलाखतीत नमूद केले. 
     त्या पुढे असेही म्हणाल्या की आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी आमच्या समुदायाचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी आम्हाला केरळमध्ये कारागीरांना कामावर ठेवण्यास आणि नारळाच्या टरफल्यांचा पुन्हा वापर करून कचरा कमी करण्यात मदत केली आहे.

Thenga coco

नोकरीपेक्षा व्यवसायाला पसंती

  २०१६ मध्ये मारियानं मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती स्पेनला गेली. मारियानं २०१७ मध्ये मुंबईच्या एऑन हेविट इथं सल्लागार म्हणून काम केले. नोकरीपेक्षा व्यवसाय बरा हा विचार तिच्या मनात कायम होता. पर्यावरण, समाजाला फायदा होईल असं काहीतरी वेगळे करण्याचं तिच्या डोक्यात होतं. त्यानंतर १ वर्षात मारिया यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून मैना महिला फाउंडेशनचं काम सुरू केले.

Thenga coco

शेतकरी आणि कुशल कामगारांचे नेटवर्क

 मारियानं सुरु केलेल्या उद्योगात केरळमधील विविध क्षेत्रातील शेतकरी आणि कुशल कामगारांचे नेटवर्क आहे. त्यात कोट्टायम, कोंडुगल्लूर, मेट्टुपालयम आणि एलेप्पी यांचा समावेश आहे. त्यांच्या कंपनीत ३० हून अधिक लोक काम करतात त्यातील ८० टक्के महिला आहेत. या महिला कामगारांना दरमहिना २० ते २५ हजार पगार आहे.

Thenga coco

देशात, परदेशात वाढती मागणी

 चेन्नई, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मारिया यांच्या कंपनीनं तयार केलेल्या उत्पादनांची मागणी आहे. त्यासोबतच डेनमार्क,स्पेन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारख्या देशातही भरपूर मागणी आहे. अलीकडेच देशातंर्गत मागणीपेक्षा परदेशातील मागणी वाढली आहे.
  थेंगा कोको त्यांच्या इको-फ्रेंडली प्रोडक्टची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांची उत्पादन श्रेणी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube


Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :

उपक्रम : 'हरित नाशिक'साठी पुढाकार (Activities : Initiative for 'Green Nashik')

 उपक्रम :  'हरित नाशिक'साठी पुढाकार
Activities :  Initiative For 'Green Nashik'

Green nashik

 यंदा नाशिकचे तापमान ४२ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आगामी काळात पुन्हा तापमानवाढीचे संकट निर्माण होण्याचे संकट लक्षात घेता 'हरित नाशिक'साठी नाशिककर पर्यावरणप्रेमी सरसावले आहे. 

देशी प्रजातींच्या वृक्षलागवडीचा संकल्प

 याचमुळे हरित नाशिक' अंतर्गत शहरात १० हजार देशी प्रजातींच्या वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वृक्षलागवडी पुरता मर्यादित न राहता पुढील तीन वर्षे वृक्षसंवर्धनाची  जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.

नाशिककर पर्यावरणप्रेमी सरसावले

  शहराच्या वाढत्या विस्तारामुळे शहरातील वृक्षसंपदा झपाट्याने कमी होत आहे. याचा विपरीत परिणाम शहराच्या वातावरणावर होत आहे. या प्रकारामुळे यंदा प्रथमच उन्हाळ्यात ४२ अंशांपर्यंत तापमान पोहोचले होते. तसेच दिवसेंदिवस वातावरणात वाढत असलेल्या उकाड्यामुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता शहराला पुन्हा हरित नाशिक करण्यासाठी नाशिककर पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत.

 वृक्षलागवडीचा संकल्प

 या मोहिमेंतर्गत शहरात १०००० हून अधिक वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांना आपल्या परिसरात, मनपाच्या मोकळ्या जागेत किंवा कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी वृक्ष लावायचे आहेत. त्यांना या मोहिमेंतर्गत मोफत वृक्ष देण्यात येणार आहे. 

नागरिकांमध्ये जनजागृती

 वृक्षतोडीमुळे व वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणात होत असलेला असमतोलाने जनसामान्यांना विविध समस्या व आजारांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन करणे ही याबाबत या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. याचसाठी नागरिकांनी 'झाडे लावा, झाडे जगवा' या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभागी करून घेतले जाणार आहे. मोहीम यशस्वितेसाठी मनपा उपायुक्त संतोष पिल्ले, सचिन पवार, धनंजय लोखंडे, प्रवीण पवार आदी विशेष प्रयत्न करत आहे.

Green nashik

रोपांसाठी  संपर्क

 पर्यावरण संवर्धनासाठी १० हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत नागरिकांना मोफत वृक्ष देण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ज्या नागरिकांना वृक्ष लावायचे आहेत. त्यांनी ९३७२४११११५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सहभागाचे आवाहन

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी यासाठी यंदा १० हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नागरिकांनी देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प संयोजक सचिन पवार यांनी केले आहे.
Green nashik

चैतन्यफार्म कडून आंब्याच्या झाडांचे वाटप

 नाशिकचे पर्यावरण प्रेमी, सायकल प्रेमी चैतन्य फार्मचे संचालक दीपक भोसले गेल्या २५ वर्षापासून पर्यावरण संदर्भात जनजागृती करीत आहे गेल्या २५ वर्षापासून त्यांनी परिसरामध्ये अनेक झाडे लावली व त्यांचे त्यांनी संगोपनही केले आहे. आज ती झाडे फळे द्यायला सुरुवात झाली आहे. 

पर्यावरणाच्या संदेशातून जनजागृती

पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस यानिमित्ताने दीपक भोसले यांनी चैतन्य फार्म या परिसरातील शेतकऱ्यांना २०० च्या वर आंब्याच्या रोपांचे वाटप केले. 'पर्यावरणाशी करूया मैत्री, जीवन अधिक सुंदर बनवूया 'हा संदेश देत त्यांनी वृक्ष वाटप केले.  याही पुढे भविष्यात ते सतत वृक्ष लागवड व वृक्ष वाटप नियमितपणे करणार आहेत.

पर्यावरणाविषयी जागरूकता

 पर्यावरण दिन ते मोठ्या उत्साहात साजरा करतात.  गंगापूर बॅक वॉटर परिसरामध्ये दीपक भोसले हे नियमितपणे साफसफाई करत असतात.  त्यांना पर्यावरणाविषयी खूप जागरूकता आहे. ते प्रत्येक मित्राला वाढदिवसाला आग्रह करत असतात की केक, पार्टी इतर खर्च करण्यापेक्षा तो खर्च झाडे घेऊन आपल्या मित्र परिवाराला द्या. हा संदेश नियमितपणे ते देत असतात. 
 जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त दीपक भोसले यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम केल्याबद्दल परिसरातील नागरिक त्यांचे कौतुक करत आहे

नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण

   नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे कॉलेज रोड परिसरातील कृषि नगर, सायकल ट्रॅक येथे हे वृक्षारोपण करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या प्रेरणेने १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सुनील बागुल, स्वप्नील शिनकर, अनिल नहार इ. उपस्थित होते

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube


Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :

रामोजी फिल्मसिटी, रामोजी राव आणि मी (Ramoji Filmcity, Ramoji Rao and Me)

रामोजी फिल्मसिटी, रामोजी राव आणि मी
Ramoji Filmcity, Ramoji Rao and Me


Ramoji rao
रामोजी राव 

  रामोजी फिल्मसिटीचे सर्वोसर्वा रामोजी राव यांचे ५ जून रोजी निधन झाल्याचे कळले. खूप वाईट वाटले. माझा रामोजी फिल्मसिटी मधला प्रवास डोळ्यासमोर तरळला. मी रामोजी फिल्मसिटीमध्ये अन्नदाता मासिकाचा सहसंपादक म्हणून काम केले.
    
मी पहिल्यांदाच हैदराबादमध्ये गेलो तेव्हा फक्त त्यांच्या साम्राज्याविषयी वरवर माहिती होती.  पण प्रत्यक्ष जेव्हा रामोजी फिल्मसिटीमध्ये एसपीटू या कॉर्पोरेट बिल्डिंगमध्ये गेलो तेव्हा रामोजीराव यांच्या प्रचंड कारभाराची जाणीव झाली.  सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रामोजी राव यांनी असामान्य कामगिरी केली. ते रामोजी फिल्मसिटीचे अनभिषिक्त सम्राट होते. जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ संकुल म्हणून रामोजी फिल्म सिटीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. पहिल्यांदा मी जेव्हा  सहसंपादक म्हणून रुजू झालो तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो. 

ऑफिस कसले तो एक महालच भासत होता. कोनेच्या लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. रामोजीराव यांनी शांत नजरेने माझ्याकडे बघितले. मी हाताने अभिवादन केले. माझ्यासमवेत माझे वरिष्ठ साहेब रंगाराव होते. ते तेलगुत रामोजीराव त्यांच्याशी बोलले.  मी दुसऱ्या दिवसापासून रुजू झालो.

Ramoji filmcity
  दीपक अहिरे 

रामोजी फिल्मसिटी मध्ये माझ्या निवासाची व्यवस्था पॉश रूममध्ये करण्यात आली.  इतरही काही सहकारी मित्र तेथे होते.  सकाळी ते ड्युटीला गेले होते. मी प्रवास केला होता. दुपारी जेवण केले. जेवण करून झोपलो. संध्याकाळीच उठलो. वातावरण प्रसन्न होतं. माझ्या मनात प्रचंड कुतुहल होते. मी थोडा बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलो तर सिक्युरिटीने हटकवले. "साहब, बाहर मत जाओ. आपके पास आयडी कार्ड नही हैl प्रॉब्लेम हो जायेगा" म्हणून मी रूममध्ये आलो आणि टीव्ही पाहत बसलो. 

तेवढ्यात रूममधील इतर सहकारी आले. त्यांच्याशी ओळख करून घेतली. ते दुसऱ्या डिपार्टमेंटला होते. एक अमरावतीचा निलेश अतकरे व दुसरा चंद्रपूरचा होता. दुसऱ्या दिवशी ऑफिस जॉईन केले. आठवड्यात आयडी कार्ड, कॅन्टीन कूपन, चहा, नाश्ता कूपन मिळाले. आणि रामोजी फिल्मसिटीच्या सह संपादक नोकरीचा अध्याय सुरू झाला. कामात वक्तशिरपणा आला. तेलुगु भाषेचे अडचणीमुळे बरेच वेळा समज गैरसमज झाले. पण काम मराठीत असल्यामुळे कुठलीच कसूर ठेवली नाही. 

महाराष्ट्रातील आठ-नऊ जण होते.  सर्वांशी हळूहळू ओळखी झाल्या. ऑफिसात रुळलो. मी ज्या ठिकाणी राहायचो त्याच्या थोडा पुढे मोठा डोंगर होता त्या डोंगरावर रामोजीराव यांचा भव्य दिव्य बंगला होता. डोंगराच्यावर एक भव्य लाईट लागलेला असायचा. मी कुतुहलाने सहकाऱ्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, रामोजीरावांना त्या  डोंगरावरून सर्व काही पाहता येते. हे सर्व माझ्यासाठी कुतूहलजनक होते. मग हळूहळू त्यांच्याविषयी माहिती मिळायला लागली. तेथे चालत असलेल्या काही शूटिंगही आम्ही पाहिल्या.
   
रामोजीराव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात झाला. त्यांचे आई वडील व्यंकट सुब्बाराव आणि व्यंकट सुब्बांमा यांची यांनी आजोबांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव "रामय्या" ठेवले. मात्र नंतर त्यांनी हे नाव बदलून "रामोजी" ठेवले. राव यांनी गुडीवाढा म्युनीसिपल हायस्कूल मधून शिक्षण घेतले. त्यानंतर गुढीवाडा कॉलेजमधून बीएससी पदवी मिळवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले पण आपल्या प्रतिभेच्या, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ "रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली. तब्बल दोन हजार एकरपेक्षा अधिक परिसरात असलेल्या फिल्मसिटीमध्ये एकाच वेळी १५ ते २० चित्रपटांचे चित्रीकरण होऊ शकते. 
Ramoji filmcity Letter
       
रामोजी फिल्मसिटी मध्ये नेहमीच अनेक कामे अनेक वेळा सुरू असल्याने आम्हाला हैदराबादमध्ये रूम शोधायला लावली.  आम्ही मग हैदराबादच्या "वनस्थलीपुरम" या भागात राहायला गेलो. सकाळी आठ वाजता थांब्यावर गाडी उभी राहायची. वेळेत गेले तर बस भेटायची अन्यथा ती निघून जायची.  पहिल्यांदा तर एक-दोन वेळेला गाडी चुकली. वेळेच्या बाबतीत येथील लोक खूप "पंक्चुअल" असत. मी सहजच एका सहकाऱ्याला विचारले की गाडी वेळेत आपण रस्त्यावरून हात दिला तरी गाडी थांबत नाही तर तो हसून म्हणाला की खुद्द रामोजीराव जरी हजर झाले तरी तो ड्रायव्हर थांबणार नाही एवढी शिस्त येथील व्यवस्थापनाला आहे.  एवढ्या विस्तीर्ण रामोजी फिल्मसिटीमध्ये कुठेच कचऱ्याचा कागद आढळणार नाही की प्लास्टिक नाही. इतकी स्वच्छता येथे ठेवली जाते. "ईटीव्हियंनस्" या मुखपत्राव्दारे कर्मचाऱ्यांचे वाढदिवस,सेमिनार, ॲक्टिव्हिटी कळत असे. मी फिल्मसिटीच्या भव्य लायब्ररीमध्ये संध्याकाळी जाऊन बसायचो. मराठी वृत्तपत्रे व मासिके वाचायचो.
     
रामोजीराव यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर असामान्य कामगिरी केली. त्यांनी दिल्लीतील एका जाहिरात एजन्सीसाठी कलाकार म्हणून काम सुरू केले. १० ऑगस्ट १९७४ रोजी राव यांनी विशाखापटनममध्ये तेलुगु दैनिक ईनाडूची स्थापना केली. या वृत्तपत्राने चार वर्षात एवढी भरारी घेतली कि एक प्रमुख दैनिक बनले. ऑगस्ट २०२४ मध्ये ते पन्नासावा वर्धापन दिन साजरा करेल. 
       
रामोजी राव यांनी वृत्तपत्र प्रकाशनाबरोबरच सर्वात मोठया रामोजी फिल्मसिटीची स्थापना केली. नंतर टेलिव्हिजन चॅनलच्या ईटीव्ही नेटवर्कचेही नेतृत्व केले. रामोजी राव हे मार्गदर्शी ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी मार्गदर्शी चिट फंड, प्रिया फुड्स आणि कालांजली यासह विविध व्यवसायांवर देखरेख केली होती. अशा या सर्वसमावेशक नेतृत्वाच्या हाताखाली मला काम करायला मिळाले याचा मला अभिमान आहे.
    
'कृषक बंधू" प्रकाशनाच्या वेळेस मी ईटीव्हीच्या बातम्यांमध्येही झळकलो. एक दिवशी माझ्या ऑफिसमध्ये द्राक्षाच्या दोन पेट्या आल्य.  मी विचारणा केल्यावर रामोजी राव यांच्या द्राक्ष बागेच्या होत्या. त्याबरोबर इंग्रजीमध्ये एक पत्रही होते. ते मी या ब्लॉगमध्ये प्रसिद्ध केले आहे. 
ramoji filmcity Letter

हंगाम सुरू करण्यापूर्वी ते ऑफिसला "वानोळा" देत होते. कर्मचाऱ्यांना त्यांनी नेहमीच आपुलकीची वागणूक दिली. शिस्त, संयमीपणा, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता.
  
रामोजी राव यांना  २०१६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन...!!

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...