उपक्रम : 'हरित नाशिक'साठी पुढाकारActivities : Initiative For 'Green Nashik'
यंदा नाशिकचे तापमान ४२ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आगामी काळात पुन्हा तापमानवाढीचे संकट निर्माण होण्याचे संकट लक्षात घेता 'हरित नाशिक'साठी नाशिककर पर्यावरणप्रेमी सरसावले आहे.
देशी प्रजातींच्या वृक्षलागवडीचा संकल्प
याचमुळे हरित नाशिक' अंतर्गत शहरात १० हजार देशी प्रजातींच्या वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वृक्षलागवडी पुरता मर्यादित न राहता पुढील तीन वर्षे वृक्षसंवर्धनाची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.
नाशिककर पर्यावरणप्रेमी सरसावले
शहराच्या वाढत्या विस्तारामुळे शहरातील वृक्षसंपदा झपाट्याने कमी होत आहे. याचा विपरीत परिणाम शहराच्या वातावरणावर होत आहे. या प्रकारामुळे यंदा प्रथमच उन्हाळ्यात ४२ अंशांपर्यंत तापमान पोहोचले होते. तसेच दिवसेंदिवस वातावरणात वाढत असलेल्या उकाड्यामुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता शहराला पुन्हा हरित नाशिक करण्यासाठी नाशिककर पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत.
वृक्षलागवडीचा संकल्प
या मोहिमेंतर्गत शहरात १०००० हून अधिक वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांना आपल्या परिसरात, मनपाच्या मोकळ्या जागेत किंवा कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी वृक्ष लावायचे आहेत. त्यांना या मोहिमेंतर्गत मोफत वृक्ष देण्यात येणार आहे.
नागरिकांमध्ये जनजागृती
वृक्षतोडीमुळे व वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणात होत असलेला असमतोलाने जनसामान्यांना विविध समस्या व आजारांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन करणे ही याबाबत या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. याचसाठी नागरिकांनी 'झाडे लावा, झाडे जगवा' या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभागी करून घेतले जाणार आहे. मोहीम यशस्वितेसाठी मनपा उपायुक्त संतोष पिल्ले, सचिन पवार, धनंजय लोखंडे, प्रवीण पवार आदी विशेष प्रयत्न करत आहे.
रोपांसाठी संपर्क
सहभागाचे आवाहन
चैतन्यफार्म कडून आंब्याच्या झाडांचे वाटप
पर्यावरणाच्या संदेशातून जनजागृती
पर्यावरणाविषयी जागरूकता
नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण
deepakahire1973@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा