name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): April 2024

सारथी करणार उद्योगांसाठी मदत (Sarthi will help industries)

सारथी करणार उद्योगांसाठी मदत
SARTHI will help industries

SARTHI

    सारथीतर्फे सरसेनापती संताजी  घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रमातून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

     यात अर्ज करण्यासाठी दिलेली मुदत वाढविण्यात आली आहे. या माध्यमातून नवउद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी चालना मिळणार आहे.

SARTHI

संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास  योजना

   छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) आता उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील भाऊ इनक्युबेशन संस्थेमार्फत सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) योजना कार्यान्वित झाली आहे. या माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील नवउद्योजकांची निवड केली जाणार आहे. 

सहा जिल्ह्यांमध्ये  प्रशिक्षण

    राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हे प्रशिक्षण होईल. यासाठी उमेदवाराकडे स्वतःची तंत्रज्ञान व्यवसाय कल्पना असावी तसेच त्याचे रुपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये करणे आवश्यक आहे. यातून सारथीने निवडलेल्या नवउद्योजकांना इनक्युबेटर्स सेंटरमध्ये एक वर्षाकरिता मार्गदर्शनासाठी पाठविले जाईल.

शेतकरी उत्पादक कंपनीसाठी क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रम

   छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनीतील लक्षित गटातील शेतकरी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सारथी संस्थेच्या प्रायोजकत्वाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांचे मार्फत व त्यांच्या अधिपत्याखालील राज्यातील विविध ठिकाणी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

योजनेच्या अधीक माहितीसाठी.   sarthi-maharashtragov.in या लिंकवर संपर्क करावा

शेतकरी पुत्राची अमेरिकेने घेतली दखल (America took notice of the farmer's son)

शेतकरी पुत्राची अमेरिकेने घेतली दखल
America took notice of the farmer's son


Shetkari putrachi amerikene ghetali dakhal


नाशिक : बारामती तालुक्यातील  सायंबाची वाडी या छोट्याशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील हरहुन्नरी युवक अमोल भगत याला अमेरिकेच्या मानाच्या असणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय सेटल फिल्म फेस्टिवल वॉशिंग्टन येथील फेस्टिवलमध्ये परीक्षक (ज्युरी) म्हणून निवड करण्यात आली आहे. 

  अत्यंत बिकट परिस्थितीतून आणि शेतकरी कुटुंबातून अमोल भगतचा खडतर प्रवास सुरू झाला होता. त्याच्या बारा वर्षाच्या भारतीय चित्रपट सृष्टीच्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. आत्तापर्यंत २१ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणून त्याने काम पाहिले आहे. 

Shetkariputrachi amerikene ghetali dakhal


   त्याचा आगामी हिंदी चित्रपट 'पुणे टू गोवा' लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या झालेल्या या सार्थ निवडीने भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये तसेच बारामती व त्याच्या गावातील नागरिकांनी तसेच मित्रांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या आगामी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

   यावेळी अमोल भगत असे म्हणाले की या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मिळालेल्या संधीचे श्रेय मी माझ्या बारामतीकरांना तसेच आई-वडील व मित्र परिवाराला देतो. त्यांच्या खंबीर साथीमुळेच हे शक्य झाले आहे. मी त्यांचा कायम ऋणी राहील व मिळालेल्या संधीचे सोनं करीन. मराठी माणसाचा,महाराष्ट्राचा आणि भारत देशाचा ठसा अमेरिकेत उमटवेल असेही अमोल म्हणाला. 

देश विदेशातील फुलझाडे आणि त्यांची वैशिष्ट्य (Flowers in the country and abroad and their characteristics)

देश विदेशातील फुलझाडे आणि त्यांची वैशिष्ट्य 
Flowers in the country and abroad and their characteristics

Petuniya, Arjentina (Brazil)

१) पेटूनिया, अर्जेंटिना (ब्राझील) : 'सोलेनेसी' कुटुंबातील ही वनस्पती असून या फुलाच्या चार प्रजाती असून प्रत्येक रंगात हे फुल आढळते. तुतारीच्या आकाराचे हे फुल उन्ह्याळात फुलते. विविध आकारात असणारे हे फुलझाडं ६⁶ इंच ते ४ फूट उंचीपर्यंत वाढते. 

२) साल्व्हिया (मेक्सिको) : ही एक परदेशी औषधी वनस्पती असून इटालियन खाद्यपदार्थात हिचा वापर होतो. या वनस्पतीच्या पानांना विशिष्ट वास असून काहीशी तीक्ष्ण व तिखट चव असते. साल्व्हिया फुले पांढरी, गुलाबी आणि जांभळी रंगाची असून ही  वनस्पती जेमतेम दोन फुट उंचीपर्यंत वाढते. 

३) टोरेनिया (व्हिएतनाम) : 'लिंडरनियासी' कुटुंबातील ही वनस्पती असून अनेकदा फुलांना विशबोन, ब्लुविंग्स फुले म्हणून ओळखतात. या फुलांचा रंग पिवळा, पांढरा, व्हायलेट, निळा, कोबाल्ट, लव्हेंडर, जांभळा असा असतो. 

Water lily India and kashmir

४) वॉटर लिली (इंडिया : काश्मीर) : या फुलाच्या मुख्य जातीत ईस्टर लिली, पांढरी लिली आणि टायगर लिली या प्रजातीचा समावेश होतो. या फुलाचा चार हजारापेक्षा अधिक जाती आहेत. या फुलांचा आकार लहान असून सुंदर, आकर्षक असणारी ही फुले वसंत ऋतूमध्ये बहरतात. 

५) सेलोसिया (आफ्रिका) : हे फूल कोंबड्याच्या डोक्यासारखे दिसते म्हणून सामान्यतः याला 'कॉक्सकॉम्ब' म्हणून ओळखले जाते. ही झाडे प्रतिकूल वातावरणात घरात किंवा बाहेरही चांगली वाढतात. ही फुले सजावटीला वापरतात. याची पाने आणि फुले भाजी म्हणून वापरता येतात. दक्षिण आफ्रिकेत हे अन्न म्हणून घेतले जाते. 

६) झिनिया (यू.एस.ए.- मेक्सिको) : 

हे उत्तर अमेरिकेचे स्थानिक असलेले फुलझाड असून ऍस्टरसी कुटुंबातील वनस्पती आहे. झिनिया फुले तीन प्रकारात येतात. त्यात एकल, अर्धदुहेरी आणि दुहेरी प्रकारात ही फुले येतात. फुलांच्या पाकळ्यांचा आकार घुमटासारखा असून व्हायोलेट, पांढरा, पिवळा, केशरी, लाल आणि जांभळ्या रंगात ही फुले आढळतात. 

७) बेगोनिया (जपान- चायना) : बेगोनियासी कुटुंबातील ही वनस्पती असून यात सुमारे ९०० जाती आहेत. बेगोनिया फुले पांढऱ्या, गुलाबी, किरमिजी तसेच पिवळ्या रंगाची आकर्षक व मनमोहक रंगात फुलतात. 

Calundela, Israiel, Egypt 

८) कॅलेंडुला (इस्राईल, इजिप्त) : 

डेझी कुटुंबातील ही वनस्पती असून त्याला औषधी झेंडू म्हणूनही ओळखले जाते. ही फुले चमकदार, छान हर्बल परफ्युम असलेली सुंदर असतात. या फुलाचा वापर पाश्चात्य औषधात केला जातो. 

९) क्रायसॅनथेमम् (चायना) : 

शेवंती हे फुल गुलाबानानंतर जगातील दुसरे सर्वात सुंदर मानले जाते. ही सुवासिक फुले हलका गुलाबी, गडद गुलाबी, पिवळा व पांढऱ्या अशा अनेक रंगात येतात. या झाडाची उंची २ फुटापर्यंत होते. 

१०) डहलिया (मेक्सिको) : 

या फुलाचे मूलस्थान मेक्सिको असून जगात जवळ जवळ पन्नास हजारापेक्षा अधिक प्रजाती आढळतात. मोठ्या आकाराचे फुल हे लाल, पांढरे, नारंगी आणि जांभळ्या रंगाचे असते. हे फुलझाड २ ते ३ मीटर उंचीचे असते.

Dianthus, japan, India

११) डायन्थस (जपान,भारत) : 

 हे फुल  सामान्यतः कार्नेशन म्हणून ओळखले जाते. कॅरीओफिलेसी कुटुंबातील या वनस्पतीचे फुले लाल, पिवळी, पांढरी आणि गुलाबी आहे. या फुलांचा व्यास ५ ते ८ से.मी. दरम्यान असतो. पाने अरुंद असून पाकळ्या लहान असतात. हे फुल अतिशय महत्वाचे  असून व्यावसायिक फुलात त्याची गणना होते. 

१२) एम्पेशन्स वाल (केनिया, ब्राझील, झिम्बावे ) : 

प्रामुख्याने आद्र उष्ण कटिबंधीय भागात आढळणारे हे फुल पांढऱ्या, गुलाबी आणि लाल रंगाचे आकर्षक असते. हि एक औषधी वनस्पती असून त्याची उंची जास्तीत जास्त दोन ते तीन फूट असू शकते. 

१३) गेझनिया (साऊथ आफ्रिका) : 

हे एक सुंदर फुलझाड असून याच्या ४० प्रजाती आहेत. या फुलाचे उगमस्थान दक्षिण आफ्रिका आहे. गेझनिया फुले दिवसा सूर्यप्रकाशात उमलतात. व रात्रीच्या वेळी पाकळ्या बंद होतात. यास ट्रेझर फूल असेही म्हणतात. याची झाडे २० ते २५ वाढतात. 

१४) ओस्टेओस्पेरमम् (साऊथ आफ्रिका ) : 

हे फुल घर व बागेचे सौन्दर्य वाढवते. या फुलात सुंदर, आकर्षकपणा असण्यासोबत अनेक आयुर्वेदिक औषधी गुण  आहेत. हे फूल पांढऱ्या, गुलाबी, निळा, जांभळ्या रंगात आढळते. ही वनस्पती जातीनुसार ४ ते ५ फूट उंचीपर्यंत वाढते. 

१५)विनका (मादागास्कर- स्विझर्लंड) : अपोसायनेसी कुळातील अत्यंत काटक फुलझाड असून याच्या ७ प्रजाती आहेत. याची फुले गुलाबी, पांढरी व निळ्या रंगाची असून काही प्रजातीत मध्यभागी गर्द लाल रंगाचा बिंदू असतो. त्यामुळे हे फुल आकर्षक दिसते. ताटवे, किनारी व कुंडीत लावण्यासाठी उत्तम फुलझाड आहे. 

१६) स्टॉक (ग्रीस ) : स्टॉक फुले विशिष्ट सुगंध देतात. ही फुले निळा, लाल, पांढरा, अशा रंगात वसंत ऋतूमध्ये फुलते. हे एक वार्षिक फुलझाड असून कट फ्लॉवर  म्हणून त्याचा उपयोग होतो. या फूलझाडाची उंची १ ते ३ फूट एवढ़ी असते. याची बियांपासून लागवड करतात.

१७) फ्लॉक्स डवार्फ (यू.एस.ए.) : हे एक झुबकेदार शोभिवंत फुलांचे झाड आहे. हे फुलझाड ग्राउंड कव्हर, रॉक गार्डन्स आणि दगडी भिंतीवरही येते. फुलांचा रंग जांभळा, गुलाबी व पांढरा असतो. हि वनस्पती वसंत ऋतूत फुलते. हे फुलझाड ६ ते १२ इंच उंचीचे असते. 

Meri Gold, India- portugal

१८) मेरी गोल्ड (इंडिया- पोर्तुगाल) : मेरीगोल्ड म्हणजे झेंडू होय. हे फुल अतिशय उपयुक्त आणि वाढण्यास सोपे आहे. भारतात सर्वाधिक उगवलेल्या फुलांच्या श्रेणीत हे फुल येते. धार्मिक आणि शोभेचे फुल म्हणून झेंडूला पसंती आहे. ही फुले अनेक रंगाने बहरतात. सर्वसाधारणपणे पिवळी आणि केशरी फुले सर्वाधिक दिसतात.  

१९) गोमफेरणा (पनामा- ग्वाटेमाला ) : अमरेंथेसी कुटुंबातील ही वनस्पती असून गोल आकारात हे फुल फुलते. किरमिजी, जांभळा, लाल, नारिंगी, पांढरा, गुलाबी या रंगात हे फुल येते. हे फुल शरद ऋतूच्या सुरुवातीस फुलते. या झाडाची उंची २४ इंचापर्यंत वाढते. 

२०) अँटीऱ्हीनम (फ्रांस-स्पेन) : "स्क्रोफ्युलॅरीएसी" कुटुंबातील हे बहुवर्षायू फुलझाड आहे. फुलांना मंद सुगंध असून अनेक फुलांचा एकत्रित फुलदांडा असतो. हे फुल मुख्यतः लाल, गुलाबी, नारिंगी, पांढरा, पिवळा, इ. रंगाची असतात. या झाडाची उंची ३-४ फूट असते. 

२१) ग्लेक्सेनिया (ब्राझील) : ही फुलांची वनस्पती 'ग्लेस्नेरियासी' कुटुंबातील असून ही औषधी वनस्पती आहे. याची फुले जांभळ्या, पांढऱ्या व लाल रंगाची असतात. याची लागवड उष्ण कटिबंधीय प्रदेशात केली जाते. या झाडाची उंची फक्त ४० से.मी. इतकी होते. 

२२) हायपोइस्टेस (मलेशिया, थायलंड) : 'अँकेंथेसी" कुटुंबातील ही वनस्पती असून याची पाने गुलाबी किंवा पांढरी असतात. याचे फुल गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचे असते. देठाच्या शेवटी कोंबावर छोटी फुले तयार होतात. हे झाड १२ इंचापर्यंत वाढते. हे एक सदाहरित झुडूप आहे. 

Pansy, England

३) पान्सी (इंग्लंड) : हे फूल व्हायोला वंशाचे असून ज्यात ५०० पेक्षा जास्त विविध प्रकारची फुले आहेत. या फुलांचा रंग पिवळा, गुलाबी, केशरी, किरमिजी, शाही, जांभळा, पांढरा आणि निळ्या रंगाची असतात. पान्सी ब्लॉसम हे अत्यंत सुंदर आणि मोहक आहे. या फुलांच्या रोपाला खूप छान सुगंध येतो. 

२४) पोर्तुंलासा (उरूग्वे) : हे एक छोटेसे  गुलाबासारखे दिसणारे नाजूक फुल असून याला चिनी गुलाब म्हणतात. लाल, पिवळा, केशरी, सफेद, गुलाबी, अशा अनेकविध रंगात हे फुल आढळते. हे वार्षिक फुलझाड असून याचे मूळ उरुग्वे देश आहे. हे झाड ८ इंचापर्यंत वाढते. 

२५) कोलियस (ऑस्ट्रेलिया) : 'लॅमिएसी' कुटुंबातील ही वनस्पती असून याला लहान फुले येतात. पांढरी, निळी, गुलाबी, तसेच जांभळ्या रंगात ही  फुले फुलतात. ही वनस्पती पर्णसंभारासाठी शोभेची वनस्पती म्हणून ओळखली जाते. ही वार्षिक वनस्पती असून ६ ते ३६ इंचापर्यंत वाढते. 

२६) ऍस्टर बोनिटा (ग्रीस) : हे एक दुहेरी आकर्षक रंगाचे फुल असून या फुलाचा व्यास २ इंचाचा असतो. हे कट फ्लॉवर असून वार्षिक वनस्पती प्रकारात मोडते. हे निळा, गुलाबी, लाल, पांढऱ्या रंगात फुलते.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

निमातर्फे दोन दिवसीय स्टार्टअप समिटचे आयोजन (Two day startup summit organized by NIMA)

निमातर्फे दोन दिवसीय स्टार्टअप समिटचे आयोजन
Two day startup summit organized by NIMA

NIMA SUMMIT NASHIK : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या पुढाकाराने २५ व २६ एप्रिल रोजी राज्यातील पहिल्या निमा स्टार्टअप समिटचे आयोजन करण्यात आले आहे. 

Two day startup summit organized by NIMA

महिला नवउद्योजिकांना व्यासपीठ

      या समिटच्या माध्यमातून २५० हून अधिक स्टार्टअप आणि शंभरहून अधिक महिला नवउद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चर्चासत्र व योजनांची माहिती 

      समिटमध्ये दोन दिवसात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्टार्टअप, उद्योग उभारणी, पेटंट नोंदणीची माहिती, बँका व शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

        याप्रसंगी सचिव निखिल पांचाल, सचिव मनिष रावल, उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, आशिष नहार, खजिनदार राजेंद्र वडनेरे, श्रीकांत पाटील हे उपस्थित होते. 

निमा स्टार्टअप हब

       निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे म्हणाले, निमा पॉवर, निमा बँक समिट, बीटूबी, निमा इंडेक्स यासारखे उपक्रम राबवून निमाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या निमा स्टार्टअप हबच्या माध्यमातून निमाने विविध स्तरावर मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले आहे. 

   महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध कार्यशाळा घेऊन महिला उद्योजकांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम जोमाने सुरू असून याच मोहिमेचा पुढील भाग म्हणून या समिटचे आयोजन करण्यात आले असल्याचे बेळे यांनी सांगितले. या समिटमध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजिका आणि स्टार्टअप यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही बेळे यांनी केले.

प्रदर्शन दालन उपलब्ध

 ज्या स्टार्टअपने उत्पादकीय मॉडेल बनविले त्यांच्यासाठी समिटमध्ये प्रदर्शन दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्टार्टअपला आर्थिक सहाय्य देणे, गुंतवणूक करणे, तसेच जॉईंट वेंचर करणे, याबरोबरच फक्त अर्थसहाय्य देण्यासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील दोनशेहून अधिक गुंतवणूकदारांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

समिटच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

   समिटच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस निमाचे रवी श्यामदासानी, कैलास पाटील, राजेंद्र कोठावदे, किशोर राठी, सतीश कोठारी, संजय सोनवणे आदींसह स्टार्ट उपसमितीचे सदस्य व उद्योजक उपस्थित होते. राजेंद्र अहिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार निखिल पांचाळ यांनी मानले.

आंबा उत्पादन आणि निर्यात (Mango production and expor)t

आंबा उत्पादन आणि निर्यात 
Mango production and export


  आंबा हे भारतातील एक महत्त्वाचे फळ पीक आहे आणि त्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते. 

Amba utpadan aani niryat

  भारत हा एक प्रमुख आंबा उत्पादक देश असून, जगाच्या उत्पादनात त्याचा वाटा ४२% आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरवात झाली आहे.  

   ७ हजार ५०० बॉक्समधून २८ टन आंबा हा यूएसएला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी दिली. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. 

Amba utpadan aani niryat

आंब्याचे उत्पादन १४ टक्क्यांनी वाढणार  

  आंब्याचे एकूण उत्पादन २०२२-२३ मध्ये २१ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२३-२४ पीक वर्षात २४ दशलक्ष टनांवर जाऊ शकते. भारताचे एकूण आंबा उत्पादन यावर्षी सुमारे १४% ते २४ दशलक्ष टन वाढू शकते, असे आयसीएआर -सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी. दामोदरन यांनी सांगितले.

उष्णतेच्या लाटेचा परिणाम नाही. 

भारतीय हवामान खात्याच्या एप्रिल-मे कालावधीत उष्णतेच्या लाटेचा अंदाज आंब्याच्या उत्पादनावर लक्षणीय परिणाम करणार नाही, जर शेतकऱ्यांनी फळांची गळती कमी करण्यासाठी मे महिन्यात सिंचनाची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. आपल्या ताज्या अंदाजानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला आहे. जो नेहमीच्या दोन ते चार दिवसांऐवजी १० ते २० दिवस टिकू शकतो. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात सामान्य उष्णतेच्या लाटेचे दिवस येण्याची शक्यता आहे.


 आंब्याची फुले येण्याची प्रक्रिया ही फळे लावण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनुकूल हवामानामुळे आंब्याची फुले जवळजवळ संपली आहेत. परागीभवन सामान्य आहे आणि फळधारणा सुरू झाली आहे. सामान्य उष्णतेच्या लाटा उत्पादनावर परिणाम करू शकत नाहीत परंतु अप्रत्यक्षपणे पिकाला मदत करतात, असे श्री दामोदरन यांनी पीटीआयला सांगितले.

Amba utpadan aani niryat

क्षिण भारतात आंब्याचे उत्पादन बंपर

आंबा पिकाची शक्यता सध्या चांगली आहे. २०२२-२३ मध्ये २१ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२३-२४ पीक वर्षात (जुलै-जून) एकूण उत्पादन २४ दशलक्ष टनांपर्यंत वाढू शकते असे ते म्हणाले. देशाच्या एकूण उत्पादनात ५०% योगदान देणाऱ्या दक्षिण भारतात आंब्याचे उत्पादन बंपर असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी हवामानातील विकृतीमुळे दक्षिणेकडील राज्यांना १५% नुकसान सहन करावे लागले. मात्र यंदा परिस्थिती चांगली आहे असेही ते म्हणाले.

 शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलाव्याचा ताण, किडींचा प्रादुर्भाव यापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. श्री दामोदरन यांच्या मते, हवामान फुलांच्या आणि फळांच्या स्थापनेत भूमिका बजावते. तथापी सामान्य उष्णतेची लाट असल्यास शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि सौम्य सिंचन सुनिश्चित करून जमिनीतील ओलावा तणाव दूर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे फळांची गळती कमी होते.


कोकणचा आंबा लासलगावमार्गे परदेशात

  जगभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारी यंदाही लासलगावमार्गे झाली. आज २८ टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहेत. गेल्या वर्षी एकट्या अमेरिकेत एक हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषक विकिरण केंद्रातून झाली होती. गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच सुरु आहे. 
Amba utpadan aani niryat

लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. 

आंब्यावरची विकिरण प्रक्रिया 

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रिया ही थांबते. 

Amba utpadan aani niryat

कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

© दीपक केदू अहिरे, 

नासिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...