देश विदेशातील फुलझाडे आणि त्यांची वैशिष्ट्य
Flowers in the country and abroad and their characteristics
Petuniya, Arjentina (Brazil) |
१) पेटूनिया, अर्जेंटिना (ब्राझील) : 'सोलेनेसी' कुटुंबातील ही वनस्पती असून या फुलाच्या चार प्रजाती असून प्रत्येक रंगात हे फुल आढळते. तुतारीच्या आकाराचे हे फुल उन्ह्याळात फुलते. विविध आकारात असणारे हे फुलझाडं ६⁶ इंच ते ४ फूट उंचीपर्यंत वाढते.
२) साल्व्हिया (मेक्सिको) : ही एक परदेशी औषधी वनस्पती असून इटालियन खाद्यपदार्थात हिचा वापर होतो. या वनस्पतीच्या पानांना विशिष्ट वास असून काहीशी तीक्ष्ण व तिखट चव असते. साल्व्हिया फुले पांढरी, गुलाबी आणि जांभळी रंगाची असून ही वनस्पती जेमतेम दोन फुट उंचीपर्यंत वाढते.
३) टोरेनिया (व्हिएतनाम) : 'लिंडरनियासी' कुटुंबातील ही वनस्पती असून अनेकदा फुलांना विशबोन, ब्लुविंग्स फुले म्हणून ओळखतात. या फुलांचा रंग पिवळा, पांढरा, व्हायलेट, निळा, कोबाल्ट, लव्हेंडर, जांभळा असा असतो.
Water lily India and kashmir |
४) वॉटर लिली (इंडिया : काश्मीर) : या फुलाच्या मुख्य जातीत ईस्टर लिली, पांढरी लिली आणि टायगर लिली या प्रजातीचा समावेश होतो. या फुलाचा चार हजारापेक्षा अधिक जाती आहेत. या फुलांचा आकार लहान असून सुंदर, आकर्षक असणारी ही फुले वसंत ऋतूमध्ये बहरतात.
५) सेलोसिया (आफ्रिका) : हे फूल कोंबड्याच्या डोक्यासारखे दिसते म्हणून सामान्यतः याला 'कॉक्सकॉम्ब' म्हणून ओळखले जाते. ही झाडे प्रतिकूल वातावरणात घरात किंवा बाहेरही चांगली वाढतात. ही फुले सजावटीला वापरतात. याची पाने आणि फुले भाजी म्हणून वापरता येतात. दक्षिण आफ्रिकेत हे अन्न म्हणून घेतले जाते.
६) झिनिया (यू.एस.ए.- मेक्सिको) :
हे उत्तर अमेरिकेचे स्थानिक असलेले फुलझाड असून ऍस्टरसी कुटुंबातील वनस्पती आहे. झिनिया फुले तीन प्रकारात येतात. त्यात एकल, अर्धदुहेरी आणि दुहेरी प्रकारात ही फुले येतात. फुलांच्या पाकळ्यांचा आकार घुमटासारखा असून व्हायोलेट, पांढरा, पिवळा, केशरी, लाल आणि जांभळ्या रंगात ही फुले आढळतात.
७) बेगोनिया (जपान- चायना) : बेगोनियासी कुटुंबातील ही वनस्पती असून यात सुमारे ९०० जाती आहेत. बेगोनिया फुले पांढऱ्या, गुलाबी, किरमिजी तसेच पिवळ्या रंगाची आकर्षक व मनमोहक रंगात फुलतात.
Calundela, Israiel, Egypt |
८) कॅलेंडुला (इस्राईल, इजिप्त) :
डेझी कुटुंबातील ही वनस्पती असून त्याला औषधी झेंडू म्हणूनही ओळखले जाते. ही फुले चमकदार, छान हर्बल परफ्युम असलेली सुंदर असतात. या फुलाचा वापर पाश्चात्य औषधात केला जातो.
९) क्रायसॅनथेमम् (चायना) :
शेवंती हे फुल गुलाबानानंतर जगातील दुसरे सर्वात सुंदर मानले जाते. ही सुवासिक फुले हलका गुलाबी, गडद गुलाबी, पिवळा व पांढऱ्या अशा अनेक रंगात येतात. या झाडाची उंची २ फुटापर्यंत होते.
१०) डहलिया (मेक्सिको) :
या फुलाचे मूलस्थान मेक्सिको असून जगात जवळ जवळ पन्नास हजारापेक्षा अधिक प्रजाती आढळतात. मोठ्या आकाराचे फुल हे लाल, पांढरे, नारंगी आणि जांभळ्या रंगाचे असते. हे फुलझाड २ ते ३ मीटर उंचीचे असते.
Dianthus, japan, India |
११) डायन्थस (जपान,भारत) :
हे फुल सामान्यतः कार्नेशन म्हणून ओळखले जाते. कॅरीओफिलेसी कुटुंबातील या वनस्पतीचे फुले लाल, पिवळी, पांढरी आणि गुलाबी आहे. या फुलांचा व्यास ५ ते ८ से.मी. दरम्यान असतो. पाने अरुंद असून पाकळ्या लहान असतात. हे फुल अतिशय महत्वाचे असून व्यावसायिक फुलात त्याची गणना होते.
१२) एम्पेशन्स वाल (केनिया, ब्राझील, झिम्बावे ) :
प्रामुख्याने आद्र उष्ण कटिबंधीय भागात आढळणारे हे फुल पांढऱ्या, गुलाबी आणि लाल रंगाचे आकर्षक असते. हि एक औषधी वनस्पती असून त्याची उंची जास्तीत जास्त दोन ते तीन फूट असू शकते.
१३) गेझनिया (साऊथ आफ्रिका) :
हे एक सुंदर फुलझाड असून याच्या ४० प्रजाती आहेत. या फुलाचे उगमस्थान दक्षिण आफ्रिका आहे. गेझनिया फुले दिवसा सूर्यप्रकाशात उमलतात. व रात्रीच्या वेळी पाकळ्या बंद होतात. यास ट्रेझर फूल असेही म्हणतात. याची झाडे २० ते २५ वाढतात.
१४) ओस्टेओस्पेरमम् (साऊथ आफ्रिका ) :
हे फुल घर व बागेचे सौन्दर्य वाढवते. या फुलात सुंदर, आकर्षकपणा असण्यासोबत अनेक आयुर्वेदिक औषधी गुण आहेत. हे फूल पांढऱ्या, गुलाबी, निळा, जांभळ्या रंगात आढळते. ही वनस्पती जातीनुसार ४ ते ५ फूट उंचीपर्यंत वाढते.
१५)विनका (मादागास्कर- स्विझर्लंड) : अपोसायनेसी कुळातील अत्यंत काटक फुलझाड असून याच्या ७ प्रजाती आहेत. याची फुले गुलाबी, पांढरी व निळ्या रंगाची असून काही प्रजातीत मध्यभागी गर्द लाल रंगाचा बिंदू असतो. त्यामुळे हे फुल आकर्षक दिसते. ताटवे, किनारी व कुंडीत लावण्यासाठी उत्तम फुलझाड आहे.
१६) स्टॉक (ग्रीस ) : स्टॉक फुले विशिष्ट सुगंध देतात. ही फुले निळा, लाल, पांढरा, अशा रंगात वसंत ऋतूमध्ये फुलते. हे एक वार्षिक फुलझाड असून कट फ्लॉवर म्हणून त्याचा उपयोग होतो. या फूलझाडाची उंची १ ते ३ फूट एवढ़ी असते. याची बियांपासून लागवड करतात.
१७) फ्लॉक्स डवार्फ (यू.एस.ए.) : हे एक झुबकेदार शोभिवंत फुलांचे झाड आहे. हे फुलझाड ग्राउंड कव्हर, रॉक गार्डन्स आणि दगडी भिंतीवरही येते. फुलांचा रंग जांभळा, गुलाबी व पांढरा असतो. हि वनस्पती वसंत ऋतूत फुलते. हे फुलझाड ६ ते १२ इंच उंचीचे असते.
Meri Gold, India- portugal |
१८) मेरी गोल्ड (इंडिया- पोर्तुगाल) : मेरीगोल्ड म्हणजे झेंडू होय. हे फुल अतिशय उपयुक्त आणि वाढण्यास सोपे आहे. भारतात सर्वाधिक उगवलेल्या फुलांच्या श्रेणीत हे फुल येते. धार्मिक आणि शोभेचे फुल म्हणून झेंडूला पसंती आहे. ही फुले अनेक रंगाने बहरतात. सर्वसाधारणपणे पिवळी आणि केशरी फुले सर्वाधिक दिसतात.
१९) गोमफेरणा (पनामा- ग्वाटेमाला ) : अमरेंथेसी कुटुंबातील ही वनस्पती असून गोल आकारात हे फुल फुलते. किरमिजी, जांभळा, लाल, नारिंगी, पांढरा, गुलाबी या रंगात हे फुल येते. हे फुल शरद ऋतूच्या सुरुवातीस फुलते. या झाडाची उंची २४ इंचापर्यंत वाढते.
२०) अँटीऱ्हीनम (फ्रांस-स्पेन) : "स्क्रोफ्युलॅरीएसी" कुटुंबातील हे बहुवर्षायू फुलझाड आहे. फुलांना मंद सुगंध असून अनेक फुलांचा एकत्रित फुलदांडा असतो. हे फुल मुख्यतः लाल, गुलाबी, नारिंगी, पांढरा, पिवळा, इ. रंगाची असतात. या झाडाची उंची ३-४ फूट असते.
२१) ग्लेक्सेनिया (ब्राझील) : ही फुलांची वनस्पती 'ग्लेस्नेरियासी' कुटुंबातील असून ही औषधी वनस्पती आहे. याची फुले जांभळ्या, पांढऱ्या व लाल रंगाची असतात. याची लागवड उष्ण कटिबंधीय प्रदेशात केली जाते. या झाडाची उंची फक्त ४० से.मी. इतकी होते.
२२) हायपोइस्टेस (मलेशिया, थायलंड) : 'अँकेंथेसी" कुटुंबातील ही वनस्पती असून याची पाने गुलाबी किंवा पांढरी असतात. याचे फुल गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचे असते. देठाच्या शेवटी कोंबावर छोटी फुले तयार होतात. हे झाड १२ इंचापर्यंत वाढते. हे एक सदाहरित झुडूप आहे.
Pansy, England |
२३) पान्सी (इंग्लंड) : हे फूल व्हायोला वंशाचे असून ज्यात ५०० पेक्षा जास्त विविध प्रकारची फुले आहेत. या फुलांचा रंग पिवळा, गुलाबी, केशरी, किरमिजी, शाही, जांभळा, पांढरा आणि निळ्या रंगाची असतात. पान्सी ब्लॉसम हे अत्यंत सुंदर आणि मोहक आहे. या फुलांच्या रोपाला खूप छान सुगंध येतो.
२४) पोर्तुंलासा (उरूग्वे) : हे एक छोटेसे गुलाबासारखे दिसणारे नाजूक फुल असून याला चिनी गुलाब म्हणतात. लाल, पिवळा, केशरी, सफेद, गुलाबी, अशा अनेकविध रंगात हे फुल आढळते. हे वार्षिक फुलझाड असून याचे मूळ उरुग्वे देश आहे. हे झाड ८ इंचापर्यंत वाढते.
२५) कोलियस (ऑस्ट्रेलिया) : 'लॅमिएसी' कुटुंबातील ही वनस्पती असून याला लहान फुले येतात. पांढरी, निळी, गुलाबी, तसेच जांभळ्या रंगात ही फुले फुलतात. ही वनस्पती पर्णसंभारासाठी शोभेची वनस्पती म्हणून ओळखली जाते. ही वार्षिक वनस्पती असून ६ ते ३६ इंचापर्यंत वाढते.
२६) ऍस्टर बोनिटा (ग्रीस) : हे एक दुहेरी आकर्षक रंगाचे फुल असून या फुलाचा व्यास २ इंचाचा असतो. हे कट फ्लॉवर असून वार्षिक वनस्पती प्रकारात मोडते. हे निळा, गुलाबी, लाल, पांढऱ्या रंगात फुलते.
- deepakahire1973@gmail.com
- www.ahiredeepak.blogspot.com
- www.digitalkrushiyog.com
- digitalkrushiyog@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा