शेतकरी पुत्राची अमेरिकेने घेतली दखल
America took notice of the farmer's son
नाशिक : बारामती तालुक्यातील सायंबाची वाडी या छोट्याशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील हरहुन्नरी युवक अमोल भगत याला अमेरिकेच्या मानाच्या असणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय सेटल फिल्म फेस्टिवल वॉशिंग्टन येथील फेस्टिवलमध्ये परीक्षक (ज्युरी) म्हणून निवड करण्यात आली आहे.
अत्यंत बिकट परिस्थितीतून आणि शेतकरी कुटुंबातून अमोल भगतचा खडतर प्रवास सुरू झाला होता. त्याच्या बारा वर्षाच्या भारतीय चित्रपट सृष्टीच्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. आत्तापर्यंत २१ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणून त्याने काम पाहिले आहे.
त्याचा आगामी हिंदी चित्रपट 'पुणे टू गोवा' लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या झालेल्या या सार्थ निवडीने भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये तसेच बारामती व त्याच्या गावातील नागरिकांनी तसेच मित्रांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या आगामी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी अमोल भगत असे म्हणाले की या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मिळालेल्या संधीचे श्रेय मी माझ्या बारामतीकरांना तसेच आई-वडील व मित्र परिवाराला देतो. त्यांच्या खंबीर साथीमुळेच हे शक्य झाले आहे. मी त्यांचा कायम ऋणी राहील व मिळालेल्या संधीचे सोनं करीन. मराठी माणसाचा,महाराष्ट्राचा आणि भारत देशाचा ठसा अमेरिकेत उमटवेल असेही अमोल म्हणाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा