सारथी करणार उद्योगांसाठी मदत
SARTHI will help industries
सारथीतर्फे सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रमातून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात अर्ज करण्यासाठी दिलेली मुदत वाढविण्यात आली आहे. या माध्यमातून नवउद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी चालना मिळणार आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) आता उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील भाऊ इनक्युबेशन संस्थेमार्फत सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) योजना कार्यान्वित झाली आहे. या माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील नवउद्योजकांची निवड केली जाणार आहे.
सहा जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण
राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हे प्रशिक्षण होईल. यासाठी उमेदवाराकडे स्वतःची तंत्रज्ञान व्यवसाय कल्पना असावी तसेच त्याचे रुपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये करणे आवश्यक आहे. यातून सारथीने निवडलेल्या नवउद्योजकांना इनक्युबेटर्स सेंटरमध्ये एक वर्षाकरिता मार्गदर्शनासाठी पाठविले जाईल.
शेतकरी उत्पादक कंपनीसाठी क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रम
No comments:
Post a Comment