name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): व्यक्त व्हा (Express yourself)

व्यक्त व्हा (Express yourself)

व्यक्त व्हा
Express yourself


Express yourself


आपल्या व्यक्त होण्याने 
विवेकानंदाने जिंकले समाजाला,
कोणत्याही क्षेत्राच्या यशासाठी 
किंमत असते व्यक्त होण्याला...

व्यक्त होण्यातून घडते 
लोकांच्या मताचे दर्शन,
सुयोग्य संवादातून व्यक्त होण्याने 
होते लोकांचे हृदयपरिवर्तन...

व्यक्त व्हा वेळेनुसार नेहमी, 
मांडा ठामपणे आपली बाजू,
व्यक्त झालेच पाहिजे तेव्हा 
स्थिर होईल जीवनाचा तराजू...

जन्मल्यानंतर बोलून तर 
व्यक्त होतातच सारे जण,
यशासाठी आवश्यक असतं 
आपलं नियमितपणे व्यक्त होणं...

© दीपक अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...