name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): October 2021

पाेरीच्या रं बापा (Pari's Father)

पाेरीच्या रं बापा...
Pari's Father


Pari's father


पाेरीच्या रं बापा,

मन ठेव माेठं आता,

शिक्षणदान देवून 

सक्षम बनव तू दाता...


पाेरीच्या रं बापा,

युग तिचंच अवतरलं,

घाबरू नकाे घडीघडी 

तिनंच युगानुयुगे तारलं...


पाेरीच्या रं बापा,

संस्कारक्षम बनव तिला,

आजच्या युगात तुझ्या 

काेण विचारतं संपत्तीला...


पाेरीच्या रं बापा, 

राग मानू नकाे रं,

ऐकताे खूप वाईट 

म्हणून म्हटलं आता बरं...


© दीपक अहिरे, नाशिक


माझ्या भावनांचे डाेह.... (My Feelings)

माझ्या भावनांचे डाेह...
My Feelings 

My Feelings


माझ्या भावनांचे डाेह, 
आहेत खूप खाेल, 
कधी कधी सुटताे 
माझा अंतरंगी हा ताेल.. 

माझ्या भावनांचे डाेह, 
नाहीत वरवर, 
भावना समजून मला 
वाटतं खूप बरं..

माझ्या भावनांचे डाेह, 
नका दाटवू उमाळे, 
तुमच्यामुळे मी संयमी 
अंगी येते हे बळे.. 

माझ्या भावनांचे डाेह, 
तरंग उठती ह्दयावर, 
नका ओढू ओरखडे 
ताबा आहे माझा मनावर.. 

© दीपक अहिरे, नाशिक

प्रत्येक शब्द (Every word)

प्रत्येक शब्द...
Every word


Every word

प्रत्येक शब्द 

माझा असताे खरा, 

बाेलल्यापेक्षा 

न बाेललेलाच बरा...


प्रत्येक शब्द

सत्याची झालर त्याला,

खरा उतरताे

भिडतात शब्द मनाला...


प्रत्येक शब्द

माझा ताेलूनमापून,

ढवळताे अंतरंग

येताेय ताे हृदयातून...


प्रत्येक शब्द

बसते थेट सांगड,

शब्दाच्या या झाडाला

शब्द फळांचीच लगड...


© दीपक अहिरे, नाशिक


खाेट्या आसवांचा (Fake Tears)

खाेट्या आसवांचा...
Fake Tears 


Fake tears


खाेट्या आसवांचा 
आला मला कंटाळा, 
अशा आसवांनी का 
तुम्हास येताे कनवाळा... 

खाेट्या आसवांचा 
खाेटेपणा लपत असताे, 
खूप वेळा ताे आपण 
पडद्याआड जपताे... 

खाेट्या आसवांचा 
संबंध असताे भावनेशी, 
का खेळ खेळतात 
आपण आपल्या मनाशी... 

खाेट्या आसवांचा 
चित्रपट का चालताे, 
कलाकार आपलेच 
आपल्याला बाेल लावताे... 

© दीपक अहिरे,नाशिक

तुझी जागा (Your place)

तुझी जागा...
Your place


Your place


तुझी जागा, 

वसते ह्दयात,

मिळताे मान, 

          मला जगात...            

      

तुझी जागा,

आहे दीपस्तंभ,

माझ्या मनात,

आठवणींचा कुंभ...


तुझी जागा, 

ध्रुवपद अढळ,

तुझ्या नावाने,

         अंगी येते बळ...   

             

तुझी जागा, 

नाही काेणी घेणार,

तुझेच माझ्या ह्दयात, 

अढळपद राहणार...


© दीपक अहिरे,नाशिक










जेव्हा शेती जाते (when farming goes)

जेव्हा शेती जाते...
When farming goes

When farming goes


जेव्हा शेती जाते 
पावसाच्या पुरात, 
भंग होतात स्वप्न 
आसवे वाहतात.... 

जेव्हा शेती जाते 
नष्ट हाेते राेगराईत, 
जीवापाड जपून 
पिकं लाेटतात खाईत... 

जेव्हा शेती जाते 
येताे अवकाळी फेरा, 
निसर्गही काेपताे 
उजाड हाेते धरा... 

जेव्हा शेती जाते 
काळजाचा तुकडा, 
कशा राहिल शाबूत 
माझा हाे  मुखडा... 

© दीपक अहिरे,नाशिक

पहाटेचा साज ( Early morning)

पहाटेचा साज...
Early morning


Early morning

पहाटेचा साज 
सजली धरणी, 
धुक्याची चादर 
धुंद हाेते मनाेमनी... 

पहाटेचा साज 
पक्ष्यांचा किलबिलाट, 
किती सुंदर दिसते 
हिरवीगार ही वाट... 

पहाटेचा साज 
लागते गुलाबी थंडी, 
हळूच बिलगते अंगाला 
भरते बघा हुडहुडी... 

पहाटेचा साज 
आकाश निरभ्र सजले, 
पायी चालून बागेत 
व्यायामासाठी मी सज्ज झाले... 

© दीपक अहिरे,नाशिक

माझ्या जखमा (My Wounds)

माझ्या जखमा...
My Wounds 


My wounds

माझ्या जखमा,

नका आता विचारू,

जखमाच आता गाय,

जखमाच वासरू

माझ्या जखमा,

आहेत भरपूर खाेल,

नाही वरची मलमपट्टी,

मनसंवादाने साधेल ताेल

माझ्या जखमा,

मानसिक संतुलनाचा उपचार,

करावा प्रत्येकाने,

आवश्यक ताे विचार

माझ्या जखमा, 

काढू नका ढपली,

माझी जखम सावळते, 

आतल्या आत निमाली

© दीपक अहिरे, नाशिक


धडपड....(struggle)

धडपड
Struggle


Struggle


धडपड माणसाची 

जगण्यासाठी चालली,

भाषा माणुसकीची 

त्याने विकसित केली...

धडपड प्रत्येकाची 

प्रयत्नाला यश मिळावे,

हाताला हात मिळवून 

हे जीवन गाणे गावे...

धडपड करा अवश्य 

कशाला मागे खेचायचे,

जीवन हे खुले रंगमंच 

खुलेपणाने खेळ खेळायचे...

धडपडीला मिळावा न्याय 

गुणवंताची करा कदर,

खरेपणाचा आव आणून 

खाेटे रेटणाऱ्याला हे सादर...

© दीपक अहिरेनाशिक


काळजात उगवते (Grow in the heart)

काळजात उगवते...
Grow in the Heart

Grow in the heart

काळजात उगवते 

उद्याची पहाट,

धस्स भरतं आता 

येईल काेणती लाट...

काळजात उगवते 

विचार अनाथांचा,

द्यावी घाेंगडी आता 

हात सहकार्याचा...

काळजात उगवते 

विचार शेतकर्यांचा,

दुष्काळानं मारलं 

हप्ता द्यावा भरपाईचा...

काळजात उगवते 

राजकीय सुंदोपसुंदी,

मती जाते चक्रावून 

आहे महागाईची मंदी...

© दीपक अहिरे, नाशिक


चेहेरे खरे (Face true)

चेहेरे खरे...
Face True

Face True

चेहेरे खरे,
नाही खाेट्याचा मुखवटा, 
कितीही येवू द्या 
संकटाच्या लाटा...

चेहेरे खरे, 
दिसतेच ते चेहर्यावर, 
फसवणुकीचे चेहरे 
दिसतात ओळखण्यावर...

चेहेरे खरे,
डाेळ्यात डोळे भिडतात, 
चेहर्यावरून आजकाल 
भविष्यही वर्तवतात... 

चेहेरे खरे, 
गर्दीतही ओळखू येतात, 
शांत संयमी चेहरा 
न्याय खरा मागतात... 

© दीपक अहिरे,नाशिक

डाेळ्यात माझ्या स्वप्न.... (My Dream in eye)

डाेळ्यात माझ्या स्वप्न...
My Dream in eye
 
My Dream in eye

डाेळ्यात माझ्या स्वप्न, 
नजर आहे भविष्यावर, 
उद्योग व्यवसाय कसा 
वाढेल आपला सर्वदूर... 

डाेळ्यात माझ्या स्वप्न,
लक्ष आहे विपणनावर, 
ग्राहक हित जाेपासून 
भर देताे विकासावर... 

डाेळ्यात माझ्या स्वप्न, 
हाेईल कशी उत्पादनवाढ, 
दिवसरात्र करताे विचार 
पुरवताे कामगारांचे लाड... 

डाेळ्यात माझ्या स्वप्न, 
आदर्श उद्योग करण्याचे, 
डाेळसपणे घेताे अनुभव 
चढ उताराचे हे साचे... 

© दीपक अहिरे,नाशिक

चंद्र काेजागिरीचा (Chandra Kojagiri's)

     चंद्र काेजागिरीचा... 
Chandra Kojagiri's

Chandra kojagiris

Chadra kojagiris


चंद्र काेजागिरीचा
हाेते निरव जागरण,
मसाला दूध रबडी
     आनंदाने करू प्राशन... 

चंद्र काेजागिरीचा 
शरद ऋतूत येताे,
पृथ्वीवर भ्रमण लक्ष्मीचे
      जागर विशेष घडताे...

चंद्र काेजागिरीचा 
विविध गुणांनी अमृतमयी,
किरणे अंगावर घेऊन 
नाश हाेते राेगराई...

चंद्र काेजागिरीचा 
पूर्णत्वाचा अविष्कार,
मनसाेक्त घ्यावा आनंद
जागवा हृदयी ओमकार...

© दीपक अहिरे, नाशिक



प्रकाशवाटा ( Light Path)

प्रकाशवाटा...
Light Path

Light Path


अंधारातून प्रकाशवाटा
धुंडाळित मी राहताे, 
पाण्यासारखे प्रवाही 
स्वच्छंदी जीवन जगताे... 

किती कमवली मालमत्ता
कमीच ती पडणार,
शाबूत ठेवताे नितीमत्ता
माणसं ती कमावणार... 

प्रकाशवाटा स्वभावाच्या
निखारीत मी चालताे,
न्यायाच्या व सत्याच्या बाजूने
मी नेहमी वागताे... 

काय केले किती केले 
मांडू नका लेखाजोखा,
स्वार्थाच्या बाजारात
जागाेजागी बसलेत बाेका... 

© दीपक अहिरे,नाशिक

तुला जपणार आहे (will protect you)

तुला जपणार आहे...
Will protect you 


Will protect you


तू माझी नाजूकशी कळी,

विकसित हाेणार आहे

माझ्या जगाची शान तू, 

मी तुला जपणार आहे

बाेबडे बाेल ऐकून तुझे, 

उर माझा भरून येताे

फुलासारखी तू परी, 

तळहातासारखे मी जपताे


हाेशील तू जाणती, 

मला कधी नाही विसरणार

फेडशील कर्ज दुधाचे, 

तुझ्या बाळलीला स्मरणार

तुझ्या जगातच माझे, 

जग सर्व सामावले

तुझ्या आनंदातच माझे सुख, 

कसे बळ एकवटले

© दीपक अहिरे, नाशिक

तीच वाट जुनी ( same old way)

तीच वाट जुनी...
Same old way


Same old way

तीच वाट जुनी
ताेच रस्ता जुना
मळवला मी रस्ता
जीव माझा रमेना

तीच वाट जुनी
हाेती ओळखीची
रस्त्याची पायधूळ 
मला लागायची

ताेच रस्ता जुना
पेहराव बदलला
बदलली माणसं
घेतात आता बदला

ताेच रस्ता जुना
खुणावताे मला
तीच वाट जुनी
हाेताे ह्दयाचा काला

© दीपक अहिरे, नाशिक

निसर्गाचे वरदान... (Nature's gift)

निसर्गाचे वरदान...
Nature's gift

Nature's gift


निसर्गाचे वरदान जन्मताच लाभले, 
निसर्गामुळे जगणं सुकर असे झाले... 

निसर्गाचे वरदान आमच्यावर हात, 
मिळते निसर्गाची जन्माेजन्मी साथ... 

निसर्गाचे वरदान जगण्याचा श्वास, 
त्यामुळे टिकते प्रत्येकाची आस... 

निसर्गाचे वरदान मिळते आम्हां सदा, 
जपा निसर्गाला आजन्म देताे वादा... 

© दीपक अहिरे, नाशिक

विजयाचा दिवस (victory day)

विजयाचा दिवस...
victory day


Victory



विजयाचा दिवस आज, 
विजय हाेताे सत्याचा, 
दसऱ्याचे सिमाेल्लंघन, 
विजय हाेताे सद्गुणांचा... 

विजयाचा दिवस आज,
पराजयावर करावी मात, 
सुंदर विचारांचे साेने लुटून,
टाकूया जुनी कात... 

विजयाचा दिवस आज, 
प्रतीत व्हावा सद्वर्तनाने, 
अवघे मिळू सारेजण, 
गावू आनंदाचे गाणे... 

विजयाचा दिवस आज, 
पेरूया समाजात सद् विचार, 
ह्दयात वसू द्या राम, 
जगण्याचा व्हावा ताेच हुंकार... 

© दीपक अहिरे, नाशिक

माझं डाेकं (My Head)

माझं डाेकं...
My Head


Head


माझं डाेकं इतके चपळ,
संगणकाइतके आहे मला बळ...

माझं डाेकं कल्पनांचा पेटारा,
आवश्यक गोष्टींचा करताे मी मारा...

माझं डाेकं कल्पनेपेक्षाही पुढे,
पडतात चांगल्या विचाराचे सडे...

माझं डाेकं अफलातून विचार,
असूया कधी नसते, विचार सारासार...

© दीपक अहिरे, नाशिक

भुतकाळाचं ओझं (Burden of the past)

भुतकाळाचं ओझं...
Burden of the past

Burden of the past


भुतकाळाचं ओझं वागवून जगणं थांबवू नका,

भविष्यकाळाचा वेध घेवून मागे हटू नका,


भुतकाळात केलेल्या चुका वर्तमानात सावरत जा,

सत्याचाच आधार घेऊन चुकीचं दर्शवणं खाेडत जा,


भुतकाळात विसरलेत सारे वर्तमानात आठवण करा,

जरी तुमचे ताणले संबंध तरीही चांगल्या गोष्टी स्मरा,


भूतकाळात न रंगता भविष्यकाळ करा सुखाचा,

मिळवा आनंद, समाधानी व्हा काया नी वाचा...


© दीपक अहिरे, नाशिक



मंद हवेचा नाद... (Gentle Breeze)

मंद हवेचा नाद...
Gentle Breeze

Gentle Breeze

मंद हवेचा नाद
पहाटे झाेंबताे, 
सकाळी सकाळी 
काेंबडा आरवताे... 

मंद हवेचा नाद
खुलतेय शरीर, 
व्यायाम करून
वाटतेय हवेशीर... 

मंद हवेचा नाद
करताे चिंतामुक्त, 
पहाटेच्या गारव्याने
म्हणावे श्री सुक्त... 

मंद हवेचा नाद
अनुभवावा प्रत्येकाने, 
ह्दयस्थ व्हावे मनन
चिंतन व्हावे डाेक्याने... 

© दीपक अहिरे, नाशिक

एक सवय (A habit)

एक सवय
A habit 

A habit

एक सवय नाही बदलत,
जडत असते कळत नकळत...

एक सवय कसी बदलावी,
परीणामकारकता अशी ती शाेधावी...

एक सवय तत्वांचा परिपाक,
परिवर्तनासाठी सवयीचा धाक...

एक सवय यशासाठी आवश्यक,
रहस्यभेद व्हावा असते ती संरक्षक...

© दीपक अहिरे, नाशिक



सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...