पहाटेचा साज...
Early morning
पहाटेचा साज
सजली धरणी,
धुक्याची चादर
धुंद हाेते मनाेमनी...
पहाटेचा साज
पक्ष्यांचा किलबिलाट,
किती सुंदर दिसते
हिरवीगार ही वाट...
पहाटेचा साज
लागते गुलाबी थंडी,
हळूच बिलगते अंगाला
भरते बघा हुडहुडी...
पहाटेचा साज
आकाश निरभ्र सजले,
पायी चालून बागेत
व्यायामासाठी मी सज्ज झाले...
© दीपक अहिरे,नाशिक
No comments:
Post a Comment