name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): पाेरीच्या रं बापा (Pari's Father)

पाेरीच्या रं बापा (Pari's Father)

पाेरीच्या रं बापा...
Pari's Father


Pari's father


पाेरीच्या रं बापा,

मन ठेव माेठं आता,

शिक्षणदान देवून 

सक्षम बनव तू दाता...


पाेरीच्या रं बापा,

युग तिचंच अवतरलं,

घाबरू नकाे घडीघडी 

तिनंच युगानुयुगे तारलं...


पाेरीच्या रं बापा,

संस्कारक्षम बनव तिला,

आजच्या युगात तुझ्या 

काेण विचारतं संपत्तीला...


पाेरीच्या रं बापा, 

राग मानू नकाे रं,

ऐकताे खूप वाईट 

म्हणून म्हटलं आता बरं...


© दीपक अहिरे, नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...