जेव्हा शेती जाते...
When farming goes
जेव्हा शेती जाते
पावसाच्या पुरात,
भंग होतात स्वप्न
आसवे वाहतात....
जेव्हा शेती जाते
नष्ट हाेते राेगराईत,
जीवापाड जपून
पिकं लाेटतात खाईत...
जेव्हा शेती जाते
येताे अवकाळी फेरा,
निसर्गही काेपताे
उजाड हाेते धरा...
जेव्हा शेती जाते
काळजाचा तुकडा,
कशा राहिल शाबूत
माझा हाे मुखडा...
© दीपक अहिरे,नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा