डाेळ्यात माझ्या स्वप्न...
My Dream in eye
डाेळ्यात माझ्या स्वप्न,
नजर आहे भविष्यावर,
उद्योग व्यवसाय कसा
वाढेल आपला सर्वदूर...
डाेळ्यात माझ्या स्वप्न,
लक्ष आहे विपणनावर,
ग्राहक हित जाेपासून
भर देताे विकासावर...
डाेळ्यात माझ्या स्वप्न,
हाेईल कशी उत्पादनवाढ,
दिवसरात्र करताे विचार
पुरवताे कामगारांचे लाड...
डाेळ्यात माझ्या स्वप्न,
आदर्श उद्योग करण्याचे,
डाेळसपणे घेताे अनुभव
चढ उताराचे हे साचे...
© दीपक अहिरे,नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा