शेती, काव्य आणि सकारात्मक विचारांनी बहरलेला ‘स्व-काव्यांकुर’ हा मराठी ब्लॉग आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, प्रेरणादायी लेख व लोकोपयोगी माहितीचा आस्वाद घ्या. ‘Swa-Kavyankur’ is a Marathi blog enriched with agriculture, poetry, and positive thoughts. Explore practical agricultural guidance, inspirational articles, and useful information.”
चाळीतील कांदा नुकसान टाळण्यासाठी गोदाम इनोव्हेशन्स यंत्र (To prevent onion damage Godam Innovations Yantra)
चाळीतील कांदा नुकसान टाळण्यासाठी
To prevent onion damageगोदाम इनोव्हेशन्स यंत्र
Warehouse Innovations Machine
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ नाशिकमध्ये आहे. चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण खूप आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. ते टाळण्यासाठी नाशिक येथील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चाळीतील खराब कांद्याची माहिती मिळणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.
कांदा खराब होण्याची सुरुवात झाल्याचे शेतकऱ्यांना खूप उशीरा समजते. तोपर्यंत मोठ्या प्रमाणत कांदा सडून खराब झालेला असतो. कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू होताच शेतकऱ्यांना कळाले तर नुकसान वीस टक्क्यावरच थांबवता येईल असा विचार करून नेमक्या याच प्रश्नावर कल्याणी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केले. कल्याणीने शोधलेल्या 'अरली स्टेज स्टार्टअप लेवरीजेस इंटरनेट ऑफ टिंग टेकनॉलॉजी' या तंत्रज्ञानामुळे सडलेल्या कांद्यातून बाहेर पडणारा विशिष्ट वायू शोधून त्याची पूर्वकल्पना देऊन शेतकऱ्यांना सावध केले जाते. ही पूर्वकल्पना मिळाल्यानंतर शेतकरी सडलेला कांदा चाळीतून बाहेर काढतात. त्यामुळे उर्वरित कांदा चांगला राहतो. याशिवाय कांदा चाळीतील तापमान, आद्रतेची माहिती रियल टाईम डाटा सिस्टीमद्वारे कंपनीच्या मुख्य केंद्रात एकत्र केली जाते. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना सावध केले जाते. त्यानंतर शेतकरी तापमान, आद्रता कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी तात्काळ विविध उपाययोजना करू शकतात. ज्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टाळता येते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक परिसरातील शेतकरी चाळीतील कांदा सुरक्षित ठेवत आहेत. साधारणपणे सात ते आठ टनाच्या चाळीसाठी एक डीव्हाईस पुरेसे आहे.
© दीपक केदू अहिरे,नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
भाजीपाला विक्रेते ते अमेझ ग्रुपचे डायरेक्टर (vegetable seller to Amaze group directer )
भाजीपाला विक्रेते ते अमेझ ग्रुपचे
डायरेक्टर इंजि..अक्षय काटकर
(vegetable seller to Amaze group directer)
कोरोना कालावधीत अनेकांचे
रोजगार गेले. सर्व क्षेत्रातील उद्योग ठप्प पडले. अशावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील इंजिनियर अक्षय अशोक काटकर यांनी अमेझ ग्रुपची स्थापना केली. अमेझ ग्रुपमध्ये आर्किटेक्चर प्लानिंग, थ्रीडी डिझाईन, स्टक्चरल डिझाईन, इंटेरियर डिझाईन,सर्वेयिंग, मोजणी,लैन्डस्केपींग व कन्सल्टिंग इंजिनीअरिंगमधील होणारी सर्व कामे ते करतात.आज अमेझ ग्रुपनी अल्पावधीतच मोठी उलाढाल केली आहे. भाजीपाला विक्रेते बेरोजगार इंजिनीअर ते अमेझ ग्रुपचे डायरेक्टर म्हणून त्यांनी आज वेगळी ओळख आपल्या कामातून निर्माण केली. त्यांची घेतलेली ही खास मुलाखत...
नाशिक येथे आयोजित सेवाह आंत्रप्रीनर्स कोनक्लेव २०२० मध्ये इंजीनीयर असलेले
श्री. अक्षय काटकर यांची ओळख करून देण्यात आली. तळागाळातून आलेले बेरोजगार तरुण,
भाजीपाला विक्रेते म्हणून काम केलेले श्री.काटकर आज कोट्यवधीची उलाढाल अमेझ
ग्रुपतर्फे करतात त्यांच्याशी ओळख करून घेत मी त्यांची उद्योजकसाठी मुलाखत घेतली.
त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतला. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारले
असता ते म्हणाले कि, माझा जन्म औरंगाबाद
जिल्ह्यातील गंगापूर येथे झाला आहे. माझे आईवडील हे दोघेही शेती करतात. माझे
प्राथमिक शिक्षण गंगापूर तालुक्यातील जाखमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.
त्यानंतर मी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गंगापूरच्या न्यू हायस्कूलमध्ये घेतले.
नंतर बी.ए.पदवी घेतली. त्याचवेळेस मी औरंगाबादच्या हायटेक कॉलेजमध्ये डिप्लोमा
सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. मला बांधकाम क्षेत्रात रस असल्यामुळे मी
हे शिक्षणाचे क्षेत्र निवडले.
माझे सर्व शिक्षण मराठी शाळेमध्ये झाल्यामुळे डोक्यावरून सगळी इंग्लिश गेली
असल्याचे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणजे मी पहिल्याच वर्षी नापास झालो. हायटेक
कॉलेजनंतर मी पुन्हा नव्याने एम. आय. टी. इंजीनीअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमासाठी
प्रवेश घेतला. घरच्या गरीब परीस्थितीची जाणीव होती व परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास
करण्याची गरज आहे असे मनोमन वाटू लागले म्हणून शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला. कॉलेजची
फी व इतर बाबींसाठी मी गंगापूर शहरातील नामवंत विधिज्ञ बी.पी. जोशी यांच्याकडे
संगणक टायपींग करीत असे. शालेय शिक्षण घेत असताना सुद्धा मी आणि माझा लहान भाऊ
गौरव भाजीपाला विकत असू. हेच ते उद्योगाचे बाळकडू मला लहान वयातच मिळाले असल्याचे
श्री काटकर यांनी स्पष्ट केले.
इंजीनिअरिंग झाल्यानंतर मी लगेच इंटरनेट कैफे चालू केला. माझे चुलते व
आतेभावाचे प्रिंटींग प्रेस असल्यामुळे मी त्यांच्याकडेही काम केले. थोड्या पैशाची
बचत केली. त्यावेळी इंटरनेट हे लोकांची गरज बनले होते हे ओळखून मी नेट कैफे
गंगापूर शहरात टाकला. एका मित्रासोबत केलेला हा बिझनेस दोन महिन्यानंतर बंद पडला.
अपयश काय असते याचा पूर्ण धडा घेतला. पैशाची चणचण भासू लागल्यामुळे नोकरी करणे भाग
पडले. अनेक वेळा विचार करायचो कि मी चांगले टायपिंग करतो तर हा व्यवसाय करून
पाहावा म्हणून गंगापूर दिवाणी न्यायालयासमोर संगणक टायपिंगचा व्यवसाय चालू केला.
त्यावेळेस सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजि. वाय.टी.कंगणकर साहेब, वकील
मनोरकर, पानकडे साहेब यांची खूप मोलाची मदत मिळाली. माझा संगणक टायपिंगचा बिझनेस
चांगला व्यवस्थित स्थिरस्थावर होत असताना टपरी मालक यांनी त्रास द्यायला सुरवात
केली. ते माझ्याकडून जास्त भाडे आकारू लागले. मला त्यांचे बोलणेही सहन होत नसे. या
जाचातून सुटका व्हावी म्हणून मी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मी पुहा जोशी
साहेबांकडे नोकरी करण्यास सुरुवात केली. व्यवसायातून नोकरी आणि नोकरीतून व्यवसाय
असा प्रवास वारंवार घडू लागला असल्याचे श्री.काटकर यांनी सांगितले.
जोशी साहेबांकडे अनेक नामवंत उद्योजक, बिल्डर येत असत. ते पाहून मला असे
वाटायचे कि आपण नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हायचे. पण ते कसे शक्य आहे.
ती काय जादूची कांडी आहे काय? असे विचार येऊ लागले. परंतु मला माहित होते कि मनी
वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे काम करत राहिलो. घरची परीस्थिती बेताची
असल्यामुळे झगडत राहिलो. मिळेल ते काम करत राहिलो. कारण मला माझं उद्योजक व्हायचं
स्वप्न होत. मध्ये मध्ये याला तपासायचो पण हाती काहीच लागत नव्हत. वडिलांना
त्यावेळी काही लोक म्हणायची कि याला ट्रक्टर ड्रायव्हर करा. पण मला काहीतरी वेगळे
करायचे होते. माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा करायचा होता म्हणून मी आलेल्या
परिस्थितीला तोंड द्यायला शिकलो. पण समस्या काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यातच
माझ्या वडिलांचा भयंकर अपघात झाला. त्यांचा पाय निकामी झाला.
प्रत्येकवेळी नवीन संकट माझ्यासमोर ठाण मांडत असे.त्यामुळे पैशाची खूपच कमतरता
भासत असे. अनेकवेळा वाटायचे कि आत्महत्या करावी. पण घरच्या जबाबदारीमुळे मी पुन्हा
जगण्याचा निर्णय घ्यायचो. अशातच मला पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली. स्वामी
विवेकानंदाचे कर्मयोग पुस्तक मी वाचले आणि माझे जीवनच बदलवून टाकण्याचा मी निर्णय
घेतला. पुस्तक घेण्यासाठीहि पैसे नसायचे. पण अडीअडचणीतून मार्ग काढून मी पुस्तक
वाचत राहिलो. सध्या माझ्याकडे एक हजार पुस्तके संग्रही आहेत. पुस्तकांनी मला
माझ्या जगण्याचा मार्ग सुकर केला असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.
दरम्यान मला चांगल्या पगाराची एम.एन.सी. कंपनीत नोकरी लागली. थोडा पैसा जास्त
मिळू लागला. बचतीची सवय जोपासली. मी माझे पैसे वाचवून छोट्या मोठ्या बिझिनेस
सेमिनारला जात असू यात मला खुप माहिती मिळत गेली. व्यवसाय कसा करावा, का करावा
याचे शास्त्र मला कळले. विविध संस्थाना भेटी दिल्या. काही बिझिनेस संदर्भात
प्रशिक्षण घेतले. यात एम.सी.ई.डी.,सेवाह एज्युकेशन हब यांना भेटी दिल्या. सेवाह
एज्युकेशन नाशिकच्या आश्विनी धुप्पे यांना माझ्या सर्व परिस्थितीविषयी सांगितले.
त्यांनी बिझिनेस संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मी २००८ ते २०२० पर्यंत नोकरी
व्यवसाय अशा व्यापात अडकलो होतो. आता मी माझ्या व्यवसायाच्या, उद्योगाचे स्वप्न
पूर्ण करण्यास सज्ज झालो.
इंजिनीअर असलेल्या श्री. अक्षय काटकर यांनी सुमूहर्तावर अमेझ ग्रुपची स्थापना
केली. दिनांक २८/०८/२०२० रोजी लाकडाऊनमध्ये अमेझ ग्रुपचे पहिले ऑफिस गंगापूर शहरात
सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे इंजिनियर मित्र मंगेश नरोडे याचे मोलाचे
मार्गदर्शन मिळाले. श्री. नरोडे यांस १२ वर्षाचा स्टक्चरल अनुभव आहे. त्यांच्या
अनुभवाचा फायदा मिळवण्यासाठी मी त्यांच्याशी भागीदारी केली. औरंगाबाद येथे सुद्धा
आम्ही ऑफिस चालू केले आहे. आजमितीला अमेझ ग्रुपमध्ये आर्किटेक्चर प्लानिंग, थ्रीडी
डिझाईन, स्टक्चरल डिझाईन, इंटेरियर डिझाईन, सर्वेयिंग, मोजणी, लैन्डस्केपींग व
कन्सल्टिंग इंजिनीअरिंगमधील होणारी सर्व कामे केली जातात.
अमेझ ग्रुपची अनेक वैशिष्ट काळानुरूप सिद्ध झाली आहेत. त्यांच्याकडे २ आर्किटेक्ट आणि ६ सिव्हिल इंजिनीअर अशी अनुभवी टीम आहे. आजमितीला त्यांच्या २५० साईटस चालू आहेत. पिंपरी चिंचवड,औरंगाबाद,बीड, सुरत, गुजरात, उत्तराखंड, यवतमाळ, जालना, बुलढाणा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये त्यांची कामे चालु आहेत. त्यांचे सर्व प्लान हे नाविन्यपूर्ण असून संपूर्ण स्टक्चरल डिझाईनसह आहेत. प्रत्येक कामाची टेक्निकल टेस्टिंग केली जाते. प्रत्येक कामाचा प्लान विंडो, डोअर व अनेक प्लान ग्राहकास दिले जातात. प्रत्येक धर्माच्या वास्तुशास्रासह हे दिले जाते. ग्राहकांचा प्रत्येक महिन्याला फिडबैक, प्रतिसाद हा घेतला जातो. शंभर टक्के पारदर्शी काम, २१ साईट व्हिजीट व जोब कार्ड असे अनेक प्रकारची गुणविशेष सांगता येतील. या आधुनिक युगात नाविन्यपूर्ण काय आणि कशा प्रकारच्या सेवा देता येतील याविषयी आम्ही नेहमीच अग्रेसर राहत असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.
या कॉक्रीटच्या युगामध्ये झाडांची संख्या खुप कमी होत आहे त्यासाठी त्यांनी एक घर एक झाड हा उपक्रम सुरु केला आहे त्यासाठी त्यांनी प्रोत्साहनपर सन्मानचिन्हही दिले जात असल्याचे सांगितले. सामाजिक कार्याची आवड लहानपणापासून जोपासल्यामुळे आपण समाजाचे काही देणे लागतो या कार्यासाठी क्रीएटीव्ह युथ फौंडेशनची स्थापना केली आहे. श्री. काटकर ज्या जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकले त्या शाळेला त्यांनी संगणक भेट दिली आहे. दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेची, विद्यार्थाची गुणवत्ता कशी वाढीस लागेल यासाठी श्री काटकर यांनी सहकार्य केले आहे. पुढेही करत राहणार. वृक्षारोपणाची चळवळ व्यापक करून वृक्षाचे जतन करण्यासाठी नेहमी त्यांचा कटाक्ष असतो. या सर्व कार्यात त्यांचे मित्र रवींद्र एरंडे, अड मानसी जोशी, प्रसाद चव्हाण, संतोष भिंगारे यांचा सक्रीय सहभाग असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले. अशा उपक्रमशील उद्योजकास मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करून मी त्यांची रजा घेतली.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
भरड धान्य प्रक्रिया उद्योगातून घडलेले यश : समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ. सरोजिनी फडतरे यांची प्रेरणादायी कथा I Multigrain Processing Success Story – Sau. Sarojini Fadtare
भरड धान्य प्रक्रिया उद्योगातून घडलेले यश : समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ. सरोजिनी फडतरे यांची प्रेरणादायी कथा
Multigrain Processing Success Story – Sau. Sarojini Fadtare
"कृषिमू्ल ही जीवनम्" या उक्तीनुसार भारतीय संस्कृती विकसित झाली आहे. म्हणूनच शेती ही भारतातील शेतकऱ्याची जीवनशैली म्हणून ओळखली जाते. भारताला वैविध्यपूर्ण हवामानाच्या देणगीमुळे भारत नेहमी कृषीप्रधान देश राहिला आहे. भरड धान्याचा विचार करता भारतामध्ये ८०पेक्षा जास्त जाती आपल्या आहाराचा भाग आहेत. हरितक्रांतीच्या काळामध्ये भरड धान्याची लागवड मागे पडली. त्यावेळी आव्हान होते ते म्हणजे जनतेची भूक भागविणे. याच काळात तांदूळ आणि गहु आयात करण्यात येवून त्याला सरकारचे धोरणात्मक सहकार्य मिळाले. यामुळे भरड धान्य आहारातून हळु हळू मागे पडले. गहु आणि तांदूळ याच्यावरील संशोधन, जागरूकता, खप, उत्पादन विकास जसा झाला तसा इतर भरड धान्याचा झाला नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गहु आणि तांदूळ यांच्यासाठी पूरक झाली. त्यामुळे भरड धान्य ही गरिबांचा सामाजिक सामना करीत राहिली. हळू हळू भरडधान्याची लागवडही मंदावत गेली.
पोषक धान्ये
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
शेतीत क्रांती घडवण्यासाठी ड्रोनचा वापर | Smart Farming Drone Technology | Krishi Drone Yojana 2024–25
🌾 शेतीत क्रांती घडवण्यासाठी ड्रोनचा वापर | Drone For Smart Farming
तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात शेती मागे राहिली नाही. आज कृषी क्षेत्रात “डिजिटल क्रांती” घडवणारा सर्वात प्रभावी बदल म्हणजे कृषी ड्रोनचा वापर.
आजचा शेतकरी हवामान, कीडरोग, अनिश्चितता आणि वाढते उत्पादन खर्च या सर्वांशी सामना करत असताना, ड्रोन त्याच्या हाताला नवी उंची देत आहेत.
शेतीतील फवारणी, सर्वेक्षण, पिकनियोजन, सिंचन व्यवस्थापन, रोग-निदान, उत्पादन अंदाज यांसाठी ड्रोन हे आधुनिक, सुरक्षित आणि अत्यंत उपयुक्त साधन बनले आहे.
🌤️ आधुनिक शेतीतील नवी क्रांती: Drone Enabled Smart Farming
पूर्वीच्या काळात शेतातील कामे पूर्णपणे मेहनतीवर अवलंबून होती. पण आज शेतकरी डिजिटल शेतीकडे वाटचाल करत आहेत.ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकरी काही मिनिटांत:
-
शेताचा संपूर्ण हवेतून आढावा
-
पिकांच्या वाढीचे विश्लेषण
-
कीडग्रस्त भाग ओळख
-
खत/औषधांची समान फवारणी
-
पाण्याच्या गरजांची मोजणी
सहजपणे करू शकतात.
शेताचा संपूर्ण हवेतून आढावा
पिकांच्या वाढीचे विश्लेषण
कीडग्रस्त भाग ओळख
खत/औषधांची समान फवारणी
पाण्याच्या गरजांची मोजणी
🌱 ड्रोन म्हणजे काय? आणि शेतीत त्याचा वापर कसा होतो?
ड्रोन हे मानवरहित हवाई यंत्र (UAV) आहे जे कॅमेरे, सेन्सर आणि फवारणीची टाकी घेऊन हवेत उडते.
हे पूर्णपणे मोबाईल अॅप, रिमोट किंवा AI ऑटोपायलटवर चालते.
ड्रोनची शेतीत प्रमुख कामे:
-
स्मार्ट फवारणी (Spraying)
-
Livestream सर्वेक्षण
-
NDVI Vegetation Analysis
-
पिकांच्या रोगांची ओळख
-
कीडराईत ग्रस्त क्षेत्र शोधणे
-
जलव्यवस्थापन विश्लेषण
-
जमिनीचे नकाशे तयार करणे
यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि वेळेची मोठी बचत होते.
स्मार्ट फवारणी (Spraying)
Livestream सर्वेक्षण
NDVI Vegetation Analysis
पिकांच्या रोगांची ओळख
कीडराईत ग्रस्त क्षेत्र शोधणे
जलव्यवस्थापन विश्लेषण
जमिनीचे नकाशे तयार करणे
🌾 ड्रोनमुळे पिकनियोजन आणि डेटा विश्लेषण सुलभ
कृषी क्षेत्रात हवामान बदल मोठे आव्हान आहे. पावसाची अनिश्चितता, उष्णता वाढ, गारपीट आणि दुष्काळामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.
ड्रोनद्वारे मिळालेला डेटा शेतकऱ्याला दाखवतो:
-
पिकाची वाढ
-
पानांचा पिवळेपणा
-
पाण्याची कमी/जास्ती
-
कीडराईत
-
खताचा अभाव
यावर आधारित शेतकरी अचूक वेळेत योग्य निर्णय घेऊ शकतो.
✈️ ड्रोनने फवारणी: उत्पादन वाढीसाठी मोठा गेम-चेंजर
पारंपारिक फवारणीत औषधे शरीरावर येणे, असमान फवारणी आणि जास्त रसायन वापर ही मोठी समस्या होती.
ड्रोन फवारणीचे फायदे:
-
4–6 एकर/तास फवारणी क्षमता
-
सुरक्षित आणि एकसमान फवारणी
-
रसायनांचा मानवी संपर्क नाही
-
30–40% औषधांची बचत
-
उत्पादन आणि गुणवत्ता वाढ
-
वेळेची बचत
अनेक देशांनी असमान फवारणीमुळे भारताचे कृषी उत्पादन परत केले आहे. ड्रोन फवारणीने हे टळते.
पिकाची वाढ
पानांचा पिवळेपणा
पाण्याची कमी/जास्ती
कीडराईत
खताचा अभाव
4–6 एकर/तास फवारणी क्षमता
सुरक्षित आणि एकसमान फवारणी
रसायनांचा मानवी संपर्क नाही
30–40% औषधांची बचत
उत्पादन आणि गुणवत्ता वाढ
वेळेची बचत
💧 ड्रोनद्वारे सिंचन व्यवस्थापन
ड्रोनमधील प्रगत सेन्सर:
-
सिंचनातील गळती शोधतात
-
पाण्याचे तलाव/ओले-कोरडे भाग दाखवतात
-
पिकांना किती पाणी हवे ते सांगतात
यामुळे पाण्याची बचत व पिकाचे नुकसान टाळता येते.
सिंचनातील गळती शोधतात
पाण्याचे तलाव/ओले-कोरडे भाग दाखवतात
पिकांना किती पाणी हवे ते सांगतात
📡 डिजिटल शेतीचे भविष्य: डेटा + ड्रोन + AI
ड्रोनने मिळालेला डेटा AI (Artificial Intelligence) आणि GIS सॉफ्टवेअरमध्ये दिल्यास:
-
मातीचे विश्लेषण
-
खतांचा योग्य डोस
-
हवामान आधारित अंदाज
-
रोगराई आधीच ओळखणे
-
उत्पादनाचा अंदाज
हे सर्व शेतकऱ्याला 24/7 मोबाईलवर मिळते.
मातीचे विश्लेषण
खतांचा योग्य डोस
हवामान आधारित अंदाज
रोगराई आधीच ओळखणे
उत्पादनाचा अंदाज
🛰️ डिजिटल बॉक्स एरोस्पेस – नाशिकचे खास औषध फवारणी ड्रोन
डिजिटल बॉक्स एरोस्पेस (Nashik) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष Spraying Drone विकसित केला आहे.
✔ उपलब्ध टाकी क्षमता:
-
5 लिटर
-
10 लिटर
-
16 लिटर
5 लिटर
10 लिटर
16 लिटर
✔ किंमत (बेस मॉडेल):
₹ 3 लाख – ₹ 25 लाख
✔ सुविधा:
-
कस्टमायझेबल EMI
-
1 वर्ष फ्री सर्विस
-
ड्रोन विमा उपलब्ध
-
FPO / संस्थांसाठी विशेष अनुदान
-
FTO डेमो उपलब्ध
-
डीलरशिप व फ्रेंचायझी उपलब्ध
संपर्क:
कस्टमायझेबल EMI
1 वर्ष फ्री सर्विस
ड्रोन विमा उपलब्ध
FPO / संस्थांसाठी विशेष अनुदान
FTO डेमो उपलब्ध
डीलरशिप व फ्रेंचायझी उपलब्ध
🏛️ नवीनतम Krishi Drone Yojana 2024–25 (Latest Updated)
सरकार ड्रोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे अनुदान पुरवत आहे.
📌 1) कृषी ड्रोन सब्सिडी – केंद्र शासन (100% Subsidy)
-
कृषी संस्था, FPO, ICAR संस्थांना
-
₹10 लाख–₹15 लाख पर्यंत 100% अनुदान
कृषी संस्था, FPO, ICAR संस्थांना
₹10 लाख–₹15 लाख पर्यंत 100% अनुदान
📌 2) वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी ड्रोन अनुदान (50% Subsidy)
-
लहान व मध्यम शेतकऱ्यांना
-
ड्रोन किमतीच्या 50% किंवा ₹5 लाख (यापैकी जे कमी)
लहान व मध्यम शेतकऱ्यांना
ड्रोन किमतीच्या 50% किंवा ₹5 लाख (यापैकी जे कमी)
📌 3) SC/ST/महिला शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान
-
70–80% सब्सिडी
-
4–6 लाखांपर्यंत मदत
70–80% सब्सिडी
4–6 लाखांपर्यंत मदत
📌 4) FPO ला ड्रोन वापरासाठी 75% सब्सिडी
FPO ने 1 ड्रोन घेतल्यास
-
75% पर्यंत घटक अनुदान
-
प्रशिक्षण मोफत
75% पर्यंत घटक अनुदान
प्रशिक्षण मोफत
📌 5) PM Kisan Scheme + Drone Yojana (Combined Initiative)
-
ड्रोन प्रशिक्षण
-
ड्रोन ऑपरेटर कोर्स
-
फवारणीसाठी प्रति एकर मदत
-
कृषी स्टार्टअपसाठीही अनुदान
ड्रोन प्रशिक्षण
ड्रोन ऑपरेटर कोर्स
फवारणीसाठी प्रति एकर मदत
कृषी स्टार्टअपसाठीही अनुदान
🚁 शेतीतील ड्रोन वापराचे 5 सर्वात महत्त्वाचे फायदे
-
समान फवारणी = पिके तंदुरुस्त
-
डेटा अॅनालिटिक्स = स्मार्ट निर्णय
-
उत्पादन वाढ 20–30%
-
रासायनिक संपर्क टाळतो
-
श्रम बचत + खर्च कमी
समान फवारणी = पिके तंदुरुस्त
डेटा अॅनालिटिक्स = स्मार्ट निर्णय
उत्पादन वाढ 20–30%
रासायनिक संपर्क टाळतो
श्रम बचत + खर्च कमी
🎯 निष्कर्ष (Conclusion)
शेतीत ड्रोनचा वापर म्हणजे फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर एक नवी डिजिटल शेती क्रांती आहे.ड्रोनने फवारणी, सिंचन, निरीक्षण, रोग विश्लेषण या सर्व गोष्टींमध्ये एकाचवेळी वेग, अचूकता आणि सुरक्षितता मिळते.
सरकारचे Drone Subsidy Yojana शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. ड्रोन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवू शकतो, वेळ वाचवू शकतो आणि उत्पादनाची गुणवत्ता उंचावू शकतो.✍️ काव्यरूप ओळी
स्मार्ट शेतीसाठी ड्रोन
शेतीच्या डिजिटल परिवर्तनासाठी
ड्रोन घटक महत्त्वाचा,
शेतीसाठी ड्रोन वापरणे
हा मार्ग स्मार्ट शेतीचा...
पिकांवर लक्ष, फवारणीसाठी
ड्रोन सर्वदूर वापरावा,
सिंचन व्यवस्था, उत्पादनाचा अंदाज
याचा घेता येतो मागोवा...
शेतीत क्रांती घडवण्यासाठी
करा ड्रोनचा वापर,
याला मिळते अनुदान
अनेक फायदे याचे सुपर...
आज विविध उद्योगात
वापर महत्वाचा ड्रोनचा,
डिजिटल बॉक्स एरोस्पेसचा
ड्रोन घ्यावा औषध फवारणीचा...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com******************************************Telegram :******************************************Facebook :******************************************Instagram : ******************************************YouTube :
******************************************Quora :******************************************Koo :******************************************Pintrest:******************************************Share chat :******************************************Twitter :@DeepakA86854129******************************************Website :
******************************************
www.ahiredeepak.blogspot.com
करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine
करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...
-
यशस्वी उद्योजिका : सौ. मनीषा धात्रक आणि वरुण ॲग्रोचा जागतिक झेप घेणारा प्रवास Manisha Dhatrak: Success Story of Varun Agro शेती आणि उद्...
-
कन्नडच्या नैसर्गिक शेतीचा दरवळ चेन्नईपर्यंत; शेतीमालाला होतेय मोठी मागणी! Fragrance of Kannada's Natural Farming Reaches Chennai; Succ...
-
नारोळ्या ते केळदोडी: माझ्या गावच्या रसाळ आठवणी Memories of Gavran Mangoes माझं गाव आनंदपूर! तसं तर गाव खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध असेल, पण...







