ओझे
Burden
ओझे जन्माजन्माचे,
वाहून ते न्यायचे,
अधिक ते जमा करायचे,
निरपेक्षपणे वाहायचे...
ओझे अपेक्षेचे
स्नेहाने वागवायचे,
जनमाणसात मिरवायचे
डोक्यावर ते घ्यायचे...
ओझे निरर्थक प्रश्नाचे
उत्तरे ते सोडवायचे,
कोड्यात मग पाडायचे
निर्विकार बघत राहायचे...
ओझे समाजमनाचे
वागवत असे राहायचे,
आयुष्यभर ओझ्याखाली
दबून असे राहायचे...
© दीपक अहिरे,
नाशिक


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा