शेतमालास किंमत मिळविण्यासाठी हेजिंगचे तंत्रHedging techniques to get the price of agricultural products
शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची किंमत अधिक सुरक्षित करण्यासाठी व अधिक नफा मिळविण्यासाठी आता व्यावसायिक दृष्टिकोन अंगीकारण्याची वेळ आल्याचे मत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी व्यक्त केले. त्यासाठी कमॉडिटी मार्केटमधील हेजिंगचे तंत्र अत्यंत उपयुक्त असून शेतकऱ्याला अपेक्षित किंमत मिळण्यासाठी हे तंत्र परिवर्तन घडविणारे ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेतमाल बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हेजिंग डेस्कमार्फत राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच साखर संकुलमधील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

'हेजिंग डेस्क' म्हणजे काय
भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किंमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा 'हेजिंग' चा मुख्य उद्देश आहे. भविष्यकाळातील वाढणाऱ्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जाऊ शकतो. जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या किंमतीतील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारात सहभागी होण्याकरिता तसेच त्यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी 'हेजिंग डेस्क' (Hedging Desk) सुरु करण्यात आलेला आहे.
बाजारपेठेतील अनिश्चितेपासून वाचवण्यासाठी 'हेजिंग डेस्क'
कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत (Smart Agri) पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी 'हेजिंग डेस्क' सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात.
शेतकरी पिकांचे उत्पन्न घेतो तरी मालाची किंमत ठरवणारा नसतो. हेच लक्षात घेवून वैयक्तिक शेतकरी, मर्यादित संसाधने लक्षात घेवून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील ज्ञान मिळावे, यासाठी हे पाऊल उचलले आहे. या मध्ये कापूस, हळद आणि मका ही पिके पिकवणाऱ्या पट्ट्यांमधील शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात येईल. हिंगोली, वाशिम, सांगली, यवतमाळ, अकोला, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड येथे प्राधान्य देण्यात येणार आहे.
यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या निवडक ५० प्रतिनिधींना कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंगविषयी प्रशिक्षण देण्यात आले. यातून कमॉडिटी एक्सचेंजच्या व्यवहारांबद्दलची माहिती सोप्या भाषेत समजत असल्याबाबत सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
स्टॉक एक्सचेंज किंवा कमॉडिटी मार्केटबद्दल आपल्याकडे पूर्वी अनभिज्ञता होती. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हेजिंगचे तंत्र वापरून शेतमाल किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळणे शेतकऱ्यांना शक्य आहे. हेजिंग डेस्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरच याचा प्रत्यय येईल. असे मत आत्माचे कृषी संचालक अशोक किरनळ्ळी यांनी व्यक्त केले
यावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रेणेचे (आत्मा) कृषी संचालक तथा स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख अशोक किरनळ्ळी, एनसीडीईएक्सचे संचालक अतुल रुंगटा, उपाध्यक्ष नीरज शुक्ला, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, स्मार्टचे कृषी निविष्ठा गुण नियंत्रण तज्ज्ञ बाबासाहेब जेजुरकर व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हेजिंग डेस्कच्या अधिक माहितीसाठी https://www.ncdex.com यावर संपर्क करावा. तसेच hedgingdesk.smart@gmail.com या ईमेल वर संपर्क करावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment