कोंबडी खत (Poultry manure)
कोंबडी खत (Poultry manure) हे एक उत्तम सेंद्रिय खत आहे, जे शेतीमध्ये वापरले जाते. यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारख्या अन्नद्रव्यांचा चांगला स्रोत असतो, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
रासायनिक खतांपेक्षा कोंबडी खत स्वस्त आणि सहज उपलब्ध होते. कोंबडी खत एक नैसर्गिक खत आहे, जे रासायनिक खतांना एक चांगला पर्याय आहे.
🌿🚜 अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक येथील शिवन्या ऍग्रो या कंपनीने कोंबडी खतापासून प्रक्रिया करून तयार केलेले खत बनवले आहे. कोंबडी खतापासून कंपनीने कोंबडी खत कंपोस्ट, पावडर स्वरूपातील कोंबडी खत, पॅलेट स्वरूपातील खत, कोंबडी खत लिक्वीड फॉर्मुलेशन, कोंबडी खत मिश्रित कंपोस्ट खत तयार केले आहे.
🌿🌿🚜कोंबडी खताचे फायदे :
✅ मातीचा कस वाढतो
✅ उत्पादनात 15-20% वाढ
✅ कीटकनाशक वापरण्याची गरज कमी
✅ जमिनीतिल जिवाणूंची वाढ आणि नैसर्गिक संतुलन राखले जाते
✅ जमिनीची सुपीकता वाढवते.कोंबडी खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये (उदा.तांबे, मँगनीज) तसेच इतर पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे पीक जोमाने वाढते.
✅ कोंबडी खतामध्ये असलेल्या अन्नद्रव्यांमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक क्षमता सुधारते
✅ कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते थोडक्यात कोंबडी खतामध्ये नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) ही मुख्य अन्नद्रव्ये असल्याने पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
✅ कोंबडी खत मातीची जलधारण क्षमता वाढवते ज्यामुळे पाण्याची बचत होते.
🌿🚜 कोंबडी खत हे मुख्यतः या पिकांसाठी उपयोगी
👉 ऊस
👉 भाजीपाला – मिरची, टोमॅटो, वांगी
👉 फळझाडं – केळी, पेरू, डाळिंब
👉 आणि डाळीचे पीक – हरभरा, मूग
🌿 🚜 कोंबडी खताचा वापर :
✅ जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या गरजेनुसार कोंबडी खताचा वापर करावा. कोंबडीचे खत कंपोस्टच्या ढिगाऱ्यात घालता येते किंवा थेट मातीत टाकता येते .
✅ तुमच्या बागेत तुम्ही किती कोंबडीचे खत वापरावे हे तुम्ही कोणत्या प्रकारची रोपे वाढवत आहात आणि तुमच्या मातीची स्थिती यावर अवलंबून असते.
✅ कोंबडी खत कंपोस्ट खताच्या ढिगाऱ्यात मिसळून किंवा थेट जमिनीत पसरवूनही वापरले जाते. भाज्यांसाठी, कोंबडी खत बाजूने किंवा वरच्या बाजूने वापरणे चांगले असते.
✅ उभ्या पिकात कोंबडी खत वापरताना, पिकापासून योग्य अंतर ठेवावे. जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी 5 ते 10 बॅग (1 बॅग=40 किलो) खताचा वापर करावा.
🌿🚜 ताजे कोंबडी खत वापरू नये :
✅ ताजे कोंबडी खत थेट जमिनीत मिसळल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते. ते काही दिवस कुजवून किंवा थंड करून मगच वापरावे.
✅ ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळू नये. जर उभ्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे. म्हणजे त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते.
✅ कोंबडी खत कोंबडी खताचा वापर सामान्यतः कुजल्यानंतर केला जातो आणि ते सेंद्रिय पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. कोंबडीच्या विष्ठेमध्ये फॉस्फरस (2.46%–2.82%), नायट्रोजन (4.55%–5.6%), कॅल्शियम (4.52%–8.15%) आणि मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात असतात
🌿🚜 कोंबडी खतापासून कंपोस्ट खत तयार करणे :
✅ कोंबडीचे खत कंपोस्ट कसे बनवायचे हे थोडक्यात असे की कोंबडीचे खत गोळा करा आणि योग्य पातळीपर्यंत म्हणजेच 50% ते 60% आर्द्रता समायोजित करा.
✅ दुसरे म्हणजे समृद्ध सेंद्रिय कचरा जसे की भूसा, लाकडाचे तुकडे, पेंढ्याची पावडर इ. गोळा करा आणि ते कोंबडीच्या खतामध्ये समान प्रमाणात मिसळा. कोंबडी खताचा वापर कंपोस्ट खत (Compost) तयार करण्यासाठी देखील केला जातो, ज्यामुळे खताची गुणवत्ता सुधारते. कोंबडी खतात योग्य प्रमाणात कंपोष्ट खत मिसळूनही वापर करतात.
🌿🚜 शिवन्यां ऍग्रो या कंपनीतर्फे कोंबडी खतामध्ये एनपीके या घटकाबरोबर सेंद्रिय कार्बन आणि एकूण सहा घटक टाकले जातात. ते म्हणजे लिंबोळी, तंबाखू, जीप्सम, मळी, राख, कोळसा आणि ऑरगॅनिक ह्यूमिक हे घटक टाकून त्यापासून दाणेदार, कांडी, लिक्वीड अशा स्वरूपात खत बनवले जाते. हे खत त्यांच्याकडे योग्य दरात विक्री केले जाते. अधिक माहितीसाठी 8484823814 / 8600901681 या नंबरवर संपर्क साधावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment