सटाणा येथे रेसिड्यू फ्री कांद्याचे यशस्वी उत्पादनSuccessful production of residue free onion in Satanaश्री.मधुकर मोरे यांनी साधली किमया Mr. Madhukar More achieved alchemy
नाशिक जिल्हा, सटाणा मोरेनगर येथील प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर मोरे यांनी जवळपास ३ हजार क्विंटल रेसिड्यू फ्री (residue free) कांदा उत्पादनाची किमया साधली आहे. विशेष म्हणजे युरोपियन स्टँडर्डला हा कांदा खरा उतरला असून आता युरोपियन देशांमध्ये हा कांदा एक्सपोर्ट होणार आहे.
सध्या एकीकडे कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, दुसरीकडे पावसामुळे कांद्याचे होत असलेले नुकसान यामुळे खरं तर कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र या सगळ्यांवर मात करीत सटाणा तालुक्यातील मोरेनगर येथील श्री. मधुकर मोरे या शेतकऱ्याने ही किमया साधली आहे.
श्री.मधुकर मोरे हे शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने कांदा उत्पादन घेत आहेत. मोरे यांची वडिलोपार्जित शेती असून गेल्या दोन वर्षापासून सेंद्रिय कांदा लागवड करीत आहेत. यंदाही त्यांनी जवळपास ३० एकरवर रब्बी लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत सेंद्रिय खतासोबत सेंद्रिय तसेच जैविक फवारणी घेतली. यामध्ये शेणखत, निंबोळी अर्क, मळी इ. चा वापर केला.
वातावरण बदलानुसार सेंद्रिय, जैविक बुरशीनाशके, कीटकनाशके वापरली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांपेक्षा कांदा उत्पादनात बदल जाणवला. कांदा उत्पादन एकरी १२० ते १३० क्विंटलपर्यंत मिळाले. त्यांचे मध्यंतरी अवकाळी पावसात जवळपास ५ एकरावरील कांद्याचे नुकसानही झाले. मात्र इतर २० एकरांवरील कांद्याला वाचविण्यात त्यांना यश आले. अशा पद्धतीने जवळपास ३ हजार क्विंटल कांदा उत्पादन घेण्यात ते यशस्वी ठरले.
कांदा उत्पादनाविषयी श्री. मधुकर मोरे म्हणाले की, 'मागच्या वर्षी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर केला. त्यावेळी उत्पादन वाढले, मात्र आता जशी कांद्याची क्वालिटी मिळाली तशी मिळाली नाही. म्हणूनच यंदा संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकवला, उत्पादनही वाढले, शिवाय कांद्याची क्वालिटी देखील चांगली आली. तसेच हा कांदा रेसिड्यू फ्री (residue free)असल्याने चवीला उत्कृष्ट आहे.
युरोपियन स्टँडर्डमध्ये श्री.मोरे यांचा कांदा पास झाला. विशेष म्हणजे हा कांदा बिएलक्यू (BLQ) चाचणीसाठी मे महिन्यात पाठवण्यात आला होता. या चाचणीत कांदा पास झाला आहे. लॅब रिपोर्टसहित युरोपियन स्टँडर्ड नुसार BLQ रिपोर्ट आला असून आता युरोपियन देशांमध्ये हा कांदा एक्सपोर्ट करता येणार आहे.
अलीकडे रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. रासायनिक खताशिवाय शेती पिकणार नाही हा शेतकऱ्यांचा गैरसमज दूर व्हायला हवा. दोन वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकवतो आहे. कांदा क्वालिटी आणि साईज अतिशय चांगली आहे. शिवाय दोन महिन्यापासून कांदा चाळीत साठवला असून कांदा जसा आहे, तसाच आहे. कुठेही खराब झालेला नाही. शिवाय चाळीने लेव्हल सोडलेली नाही, पट्टी सोडलेली नाही. सध्या बाजारात कांद्याला हवा तसा भाव नाही. ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत हा कांदा विक्री करणार असल्याचे श्री.मधुकर मोरे यांनी सांगितले.
श्री. मोरे यांना बायोमीचे संचालक डॉ. प्रफुल्ल गाडगे सर तसेच भारत सर व संपूर्ण बायोमी टीम अहिल्यानगर व मे. वाय.जी.मोरे टीम सटाणा यांचे मार्गदर्शन लाभले
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment