name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): बाजारपेठ सर्वेक्षण (Market Survey)

बाजारपेठ सर्वेक्षण (Market Survey)

बाजारपेठ सर्वेक्षण
Market Survey
तरुणांसाठी संधी, उद्योजकांसाठी फायदा
Opportunities for youth, benefits for entrepreneurs

Bajarpeth sarveykshan

आज हजारो तरुण-तरुणी नोकरीच्या पाठीमागे धावतात, नोकऱ्या मिळत नाही. आज उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बाजारपेठ सर्वेक्षणाला (Market Survey) अतिशय महत्त्व आहे. या क्षेत्रात तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तरुणांनी बाजारपेठेचे सर्वेक्षण करण्याची कला आत्मसात केली तर त्यांच्या दृष्टीने संधी होईल तर या सर्वेक्षणाचा उपयोग करून उत्पादनाचा खप वाढण्याचा मार्ग सापडल्यास उद्योजकांसाठी फायदा होईल. अशा या बाजारपेठ सर्वेक्षणाबद्दल माहितीचा ब्लॉग : 


बाजारपेठ सर्वेक्षणात (Market Survey)नव्याने एखादे उत्पादन बाजारात आणायचे असेल तर त्यापूर्वी बाजाराच्या स्थितीचा सांगोपांग अभ्यास करावा लागतो. नव्याने येणाऱ्या उत्पादनाला बाजारात आधीपासून असलेली स्पर्धा, नव्याचा टिकाव लागण्याची शक्यता, जुन्या उत्पादनांची वैशिष्ट्ये व त्यातील त्रुटी त्यानुसार आपल्या उत्पादनात करायचे बदल व किंमत या गोष्टी बाजारपेठ सर्वेक्षणात येतात.

Bajarpeth sarveykshan

भारतात शहरी व ग्रामीण अशा दोन बाजारपेठा आहेत. त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. बाजारपेठेच्या दुनियेत घडणारे बदल सर्वेक्षण केल्याशिवाय समजू शकत नाहीत. भारतीय जाहिरातीत बाजारपेठ संशोधनाचा (Market Survey)अभाव आहे. केवळ एकांगी जाहिरात सफल होऊ शकत नाही. 


जाहिरातींच्या यशस्वीतेसाठी बाजारपेठ संशोधन करणे महत्त्वाचे आहे. एखादी वस्तू बाजारात सर्व प्रकारची काळजी घेऊनही टिकू शकत नसेल तर 'बाजारपेठ सर्वेक्षण' (Market Survey) तिच्या मदतीला येते. ते बाजाराचा सर्वांगीण मागोवा घेऊन या अपयशाची कारणे शोधून काढते. आजची पत्रकारिता ही बाजारपेठप्रधान पत्रकारिता बनली आहे. आधुनिक जाहिरात बाजारपेठ संशोधन (Market Survey)आणि वृत्तपत्राचे स्वरूप एक नवा प्रवाह पुढे येत आहे. संपादकापेक्षाही भारतात आता व्यवस्थापन व विक्री तज्ज्ञास अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.


बाजारपेठ सर्वेक्षणाचं (Market Survey)उदाहरण घ्यायचं ठरलं तर 'एनर्जी' या नावाने लोकप्रिय असलेलं पेय खूप पूर्वी 'आरे दूध' या नावाने ओळखलं जायचं पण त्याला त्यावेळी फारसा उठाव नव्हता. सर्वेक्षणाअंती लक्षात आलं की, या पेयाचं नाव अत्यंत गद्य असून ते ग्राहकांना फारसं आकर्षित करत नाही. इतर अनेक सूचनांबरोबर या उत्पादनाचं नाव बदलावं अशी सूचनाही केली गेली. काही नावंही सुचविली गेली त्यात 'एनर्जी' हे एक नाव होतं. नवीन स्वरूपात नवं नाव धारण करून या दुधाच्या, बाटल्या बाजारात आल्या. त्याने नंतर किती मार्केट जिंकल हे तर माहीतच आहे. हे सर्व ग्राहकांच्या आवडीनुसार जाहिराती बनवल्या गेल्या, सर्वेक्षण केले गेले, त्यामुळे हे शक्य झालं.

Bajarpeth sarveykshan

आपल्याकडे फार पूर्वापार म्हणजे अगदी प्राचीन काळापासून लोक जाहिरातीशी संबंधित आहेत. राजे-महाराजांच्या काळापासून जाहिरातींची प्रथा आपल्याकडे होतीच. आता जाहिरातींपेक्षा प्रसार माध्यमांतील जाहिरातीना अधिक महत्त्व आले. रेडिओ, टी.व्ही. आणि नंतर खाजगी वाहिन्या (सॅटेलाईट मिडिया) ते अलीकडे थेट इंटरनेटवरसुद्धा आपल्या उत्पादनाच्या जाहिराती झळकताना दिसतात. बाजारपेठ सर्वेक्षणात (Market Survey)जाहिरात तयार करणं यात येत नाही पण; त्यासाठी आवश्यक सूचना मार्केट रिसर्चमधून मागवल्या जातात. 


जाहिरातीत मांडलेली एखादी गोष्ट लोकांपर्यंत नीट पोहचत का नाही? त्यात काय अडचणी येतात ? संभाव्य ग्राहकांना कशा प्रकारची जाहिरात 'अपील' होईल या गोष्टी मार्केट रिसर्चमध्ये (Market Survey) येतात. जाहिरातीच्या मजकुरामध्ये आकर्षक मथळ्याचं महत्त्व वाढलं. काही नव्या शब्दप्रयोगांची कल्पक निर्मितीही होऊ लागली. मिनर्व्ह मुव्हीटोनचे प्रसिद्धी प्रमुख अनंत हरी गद्रे हे कल्पक शब्द प्रयोगाचे आद्यप्रणेते 'हाऊस फुल्ल' हा अत्यंत समर्पक शब्द पद्धतशीरपणे त्यांनी प्रचारात आणला आणि अजरामर केला. आजही तो तितकाच लोकप्रिय आहे.


'जाहिरात' हे आजच्या बाजाराचे मुख्य लक्षण असून त्याच्या विविध अंगासाठी बाजार सर्वेक्षणाची (Market Survey) आवश्यकता आहे. जाहिरात कशी आहे, तिने ग्राहकांना किती आकर्षून घेतले हे तर झाले; पण काही वेळा जाहिरातीतून दिलेला 'मेसेज' अत्यंत चुकीच्या पद्धतीने नकळतपणे ग्राहकांपर्यंत पोहचत असेल तर असे सर्वेक्षण वेळीच उत्पादकाला सावध करते. त्यामुळे संभाव्य नुकसान टळते, अशी उदाहरणेही घडलेली आहेत.


बाजाराचे असे सांगोपांग सर्वेक्षण करणे, शेकडो लोकांना 'प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्या मुलाखती घेणे, समूह-चर्चा आयोजित करणे व त्यापासून नेमका निष्कर्ष तयार करणे यासाठी हुशार, कल्पक व मेहनती व्यक्तींची गरज असते. तरुण-तरुणी हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांच्या सळसळत्या, उत्साही, तरुण वयामुळे त्यांना बाजारात सर्वत्र चांगला प्रतिसादही मिळू शकतो. तरुणांसाठी बाजारपेठ सर्वेक्षण (Market Survey) आव्हानात्मक क्षितीज खुले झाले आहे. 'करियर' म्हणून तरुणांनी त्याचा जरूर विचार करावा.


आजकाल दूरदर्शनवरून सर्वजण 'एक्झिट पोल' पाहतात. निवडणुकांच्या निकालासंदर्भात केलेले सर्वेक्षण असते. पाच वाजता मतदान संपलं की पाच मिनिटांतच त्यांचे अंदाज बाहेर येऊ लागतात. ते जवळजवळ तंतोतंत बरोबर ठरतात. ही कल्पक सर्वेक्षणाची फलश्रुती असते. मत देऊन बाहेर आलेल्या माणसाला 'मत कुणाला दिलं?' असा प्रश्न विचारून हे अंदाज तयार केलेले असतात. अर्थात मतदान करून बाहेर येणाऱ्या माणसाला असा थेट प्रश्न विचारल्यास तो नीट किंवा खरं उत्तर देईलच याची खात्री नसते, हे कुणीही सांगेल इथे 'फिल्ड वर्क' करणाऱ्यांची खरी कसोटी असते. तो थेट प्रश्न न विचारता खुबीने समोरच्या माणसाकडून ते उत्तर काढून घेतो. बाजारपेठ सर्वेक्षणात (Market Survey) हेच महत्त्वाचे आहे.


वर्तमानपत्रातही मार्केट रिसर्च केला जातो. आपल्या वाचकांना काय लागतं, जाहिराती का कमी झाल्या? वर्तमानपत्राचा खप कसा वाढेल? या सर्व अंगाने वर्तमानपत्रात बाजारपेठ सर्वेक्षण (Market Survey) केले जाते. उदा. सकाळ वृत्तपत्राने उत्तर महाराष्ट्र आवृत्तीसाठी बाजारपेठ सर्वेक्षण केले, वाचकांची मते समजावून घेतली. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात बदल करून वाचकांचा सहभाग जास्तीत जास्त प्रमाणात घेतला. आज सकाळ आपले स्थान टिकवून आहे.


बाजारपेठ सर्वेक्षणाला (Market Survey) मुक्त आर्थिक धोरण व अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा आपल्या देशात झालेला प्रवेश यामुळे अधिक महत्त्व आले आहे. उद्याच्या बाजाराला, नव्या उत्पादनाला व तीव्र स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी हे क्षेत्र अधिकाधिक विस्तारीत बनवावे लागेल. हुशार, मेहनती तरुणांनी या क्षेत्रात प्रवेश करायला काहीच हरकत नाही. मराठी तरुणांकडे खरं तर या दोन्ही गोष्टी असतात, पण कारकुनीच्या सुरक्षित मध्यमवर्गीय विचारांचा पगडा त्यांच्यावर इतका असतो की या क्षेत्रात मराठी तरुण फारसे दिसत नाहीत.


पाश्चात्त्य देशांपेक्षा आपल्याकडे मार्केट रिसर्चचं (Market Survey) काम सामाजिक स्थितीमुळे वेगळ्या प्रकारे चालते. तिकडे असं कुणाला घरी किंवा ऑफिसात भेटणं योग्य मानत नाहीत. बऱ्याचशा मुलाखती किंवा समूह-चर्चाही फोनवरूनच चालतात; पण आपल्याकडे मात्र व्यक्तीशः भेटण्यामुळे हे काम अधिक नेमके होऊ शकते. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात त्याला वेगळे महत्त्वही आहे. त्यामुळे हे क्षेत्र विस्तारले आहे. या क्षेत्रात तरुण मंडळी असल्यास सर्वेक्षणाचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.


मार्केट रिसर्चचं (Market Survey)अर्ध वेळ काम करून आपलं उच्च शिक्षण पूर्ण करणारेही तरुण दिसतात. एखादा प्रोजेक्ट किंवा समस्या घेऊन तेवढ्यापुरतं सर्वेक्षणाचं काम सुटीत करणारे व उरलेल्या काळात कॉलेजचे शिक्षण घेणारे तरुण-तरुणीही आहेत. विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची वा तांत्रिक कौशल्याची याला तितकीशी गरज नसते. मात्र, संभाषण कला जरूर लागते, इंग्रजीवर प्रभूत्व लागतं. स्थानिक भाषा, बोली भाषा याचं ज्ञान व मुख्य म्हणजे मेहनतीची तयारी असावी लागते. 


साधारणतः अर्धवेळ हे काम करणाऱ्या म्हणजे शिकत असताना ३ ते ४ तास रोज हे काम करणाऱ्या तरुणांनी, महिन्याला सरासरी पाच-दहा हजार रुपये मिळवत असल्याची माहिती आहे. शिवाय या कामातून मिळणारा आनंद, अनुभवाचे संचित व उज्ज्वल भविष्य आहे. ग्राहक राजाचे मन या सर्वेक्षणातूनच कळू शकते. अशा प्रकारे मार्केट रिसर्च (Market Survey) हे क्षेत्र तरुणांसाठी नवे क्षितीज आहे. त्याचा सुयोग्य वापर करून, बाजारपेठांचा अभ्यास करून आपले उत्पादन विकू शकता. ही सुवर्ण संधी आहे याचा तरुणांनी उपयोग करून घ्यावा.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा | Parasitic Friendly Insect Trichogramma – जैविक किड नियंत्रणातील प्रभावी उपाय

🌱 परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा (Trichogramma)      परोपजीवी मित्रकिटकांपैकी ट्रायकोग्रामा हा एक अत्यंत महत्वाचा मित्रकिटक असून तो ...