name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): महत्वाच्या औषधी वनस्पती ( Important Medicinal Plants)

महत्वाच्या औषधी वनस्पती ( Important Medicinal Plants)

महत्वाच्या औषधी वनस्पती
Important Medicinal Plants

  काही महत्वाच्या औषधी वनस्पतीत शतावरी, गुळवेल, ब्राम्ही, वेखंड, अर्जुन, बिब्बा, गुडमार या वनस्पतीचा समावेश होतो. या औषधी वनस्पतीचे लागवड आणि फायद्याविषयी ब्लॉग...👇

Mahtvachya ausadhi vanaspati
शतावरी

१) शतावरी : Asparagus

 
 शतावरीचा समावेश वेलवर्गीयमध्ये होतो. तिच्या दांड्यावर उलटे काटे असतात. पाने सपाट, शेपुच्या पानासारखी बारीक असून फांद्यावर किंचीत वाकडे काटे असतात.
  शतावरीची मुळे औषधात वापरतात. मुळांची पावडर मुत्राशयाचे रोग, प्रदर रोग, शुक्राणु वाढीसाठी तसेच स्तनदा मातेचे दुध वाढीसाठी अतिउत्तम समजली जाते.
  शतावरी लागवड १x१ मिटर अंतरावर सऱ्या पाडून करावी. लागवड बियांपासून किंवा कंदाने करता येतो.

Mahtvachya ausadhi vanaspati
गुळवेल 

२) गुळवेल :Gulvel

  
  गुळवेल बहुवर्षायुवेल असून ती झाडाच्या आधाराने वाटोळी चढत असते. वेलीची पाने गुळगुळीत व चकाकणारी हृदयाच्या आकाराची व आंतरसाल हिरव्या रंगाची असते.
 रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संधीवात व मधुमेहात या वनस्पतीच्या खोडाचा वापर करतात. जुलाब, हगवण, कृमी या विकारात गुणकारी आहे.
  गुळवेलाची लागवड प्रामुख्याने कडुलिंबाच्या लागवडीत आंतरपिक म्हणून करावी. गुळवेलाची अभिवृद्धी बियांपासून अथवा शाकिय पद्धतीने करता येते.

Mahtvachya ausadhi vanaspati
ब्राम्ही 

३) ब्राम्ही : Brahmi

 
  ब्राम्ही ही पानथळ जागेवर पसरणारी वनस्पती आहे. कांड्यापासून मुळ्या फुटतात व पेरांवर पाने येतात. फुले देठ असलेली पांढरट व जांभळट रंगाची असतात.
  ब्राम्ही रस व तीळाचे तेल एकत्र करुन सिद्ध केलेले तेल डोक्यास लावल्यास मेंदु थंड असतो. स्मृती वाढते व केसांची निगा चांगली राखता येते. मनशांतीसाठी तसेच शांत झोप लागण्यासाठी ब्राम्ही अत्यंत उपयोगी आहे.

Mahtvachya ausadhi vanaspati
वेखंड

४) वेखंड :Vekhand

 
  वेखंड हे पाणथळ जमिनीत वाढणारे झुडूप असून वनस्पतीची पाने २-४ से.मी. रुंद भाल्यासारखी असतात. पाने गडद हिरवी असून कंदाचा रंग तपकिरी व आतून पांढरा असतो.
 भूक लागत नसल्यास वेखंडाची पूड मधातून देतात, वेदना व सुज कमी करणे, डोकेदुखीवर उत्तम, कफ व खोकला, गळ्याची सुज व आवाज बसणे. इ. विकारावर गुणकारी आहे.
  वेखंडाची पावडर तांदळात मिसळल्यास तांदळात किड होत नाही. बारीक पावडर तांदळात मिसळू नये, त्यामुळे कर्करोग होण्याचा संभव असतो. वेखंडाच्या वाळलेल्या कंदामध्ये १.५ ते ३.५ टक्के पिवळ्या रंगाचे सुगंधी तेल असते या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यांसाठी होतो.

Mahtvachya Audadhi vanaspati
अर्जुन

५) अर्जुन : Arjun 

  
  अर्जुन हा २० ते २७ मी. उंच वाढणारा बहुवार्षिक वृक्ष आहे. त्याला लांबट कोनाकृती व गोलाकार पाने असतात व खोड पांढरे असते.
  वृक्षांची साल हृदयाला उत्तेजन देणारी आहे. शिवाय मुत्रमार्गातील खडे दूर करणारी व पाचकरस वाढवणारी आहे. अर्जुनसालीचे चुर्ण मधातून घेतल्यास हाडे बळकट होतात. जुलाब व आग पडणे यावर १५ ते ३० ग्रॅम चुर्ण पाण्यात मिसळून केलेला काढा घ्यावा.
 सालीचा काढा जखमा धुण्यासाठी वापरतात तसेच हाड जोडणे, जखमेवर, हृदयविकारावर उत्तम, लघवी करताना जळजळत असल्यास या वनस्पतीचा वापर करुन, जळजळ कमी करता येते.

Mahtvachya Audadhi vanaspati
बिब्बा 

६) बिब्बा : Bibba 

    
   बिब्बा हे बहुवार्षिक झाड ७ ते ८ मी. उंच असते. बुंध्याची साल राखी धुरकट रंगाची असून पाने फांद्याच्या टोकापासून निघतात. 
   फुले पिवळी, कच्चे फळ हिरवे व पक्व झाल्यावर काळ्या रंगाचे होते. दम्यावर बिब्बा प्रभावी औषध आहे. आमवात, पक्षपात, सायटीका व अशक्तपणा यावर गुणकारी आहे.

Mahtvachya Audadhi vanaspati
गुडमार 

७) गुडमार :

  
  गुडमार ही वेलवर्गीय वनस्पती असून पानावर लव असते. फुले लहान गर्द पिवळी असून झुपक्याने येतात. शेंगा मुगाच्या शेंगेप्रमाणे ७ ते ८ से.मी. लांब असतात.
  या वनस्पतीचे खास वैशिष्ठ्य म्हणजे याची पाने तोंडात चघळल्यास तोंडाचा स्वाद घेण्याची शक्ति काही वेळापर्यंत नाहीसी होते.
 याची पाने एक मिनीट चघळल्यानंतर कुठलाही गोड पदार्थ खाल्ल्यास गोडीची चव लागत नाही. हा परिणाम ३ ते ४ तास असतो. या कारणामुळे ह्या वनस्पतीचा उपयोग मधुमेहावर औषध बनविण्यास मोठ्या प्रमाणावर करतात तसेच या वनस्पतीचा उपयोग शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करणे व रक्त पातळ करण्यासाठी होतो.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...