name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): जानेवारी 2025

साईदत्त संस्थानतर्फे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ( Idol Pranpratistha and Kalsharohana ceremony organized by Saidatta Sansthan from 7th to 10th February )


साईदत्त संस्थानतर्फे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा 
Idol Pranpratistha and Kalsharohana ceremony organized by Saidatta Sansthan from 7th to 10th February 

Murti pranpratishta aani kalasharohan

नाशिक : साईनगर येथील साईदत्त संस्थानतर्फे  शिव पिंड मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान अमृतधाम, साईबाबा मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती साईदत्त संस्थानकडून देण्यात आली आहे. 

 शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दु. ४ ते १० वाजेपर्यंत साईनगर परिसरातून मूर्तीची सवाद्य भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत अघोरी पथक, छ. शिवाजी महाराज व मावळे, गोल्डन बॅण्ड, नाशिक ढोल ताशा पथक, डि.जे., पावरी नृत्य, लेझिम पथक यांचा सहभाग असणार आहे. 

  शनिवार ८ फेब्रुवारी रोजी स. ८ वा. मानसी पाटील यांच्या गणेश वंदना, दत्त संगीत, शिव भजन याने सुरूवात होणार असून स. ९ ते १ पर्यंत व दु. ३ ते ७ पर्यंत महापूजा व रात्री ८ ते १० बाळू गायकवाड यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. 

   सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी स. ९ ते १ व दु. ३ ते ७ महापूजा व रात्री ८ वाजता ह.भ.प. सोपान महाराज यांचे व्याख्यान व १२ ते ४ पर्यंत महाप्रसाद देण्यात येणार आहे. प. पु. श्री. संत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य प.पु. श्री. माधवगिरी महाराज व प. पु. श्री संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन पूजा होईल. 

   परिसरात होत असलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी नागरिकांनी भरभरून सढळ हाताने आर्थिक व अन्नदानासाठी  मदत करण्याचे आवाहन साईदत्त संस्थान व ओम साई फ्रेंड सर्कल यांनी केले आहे.

Murti pranpratishta va kalasharohan

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

विविध सन्मान मिळविणारे ग्लोबल फार्मर : गणेश नानोटे (Global Farmer with various honors : Ganesh Nanote)


विविध सन्मान मिळविणारे ग्लोबल फार्मर : गणेश नानोटे
Global Farmer with various honors : Ganesh Nanote

Global farmer

 अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंभारा येथील श्री. गणेश शामराव नानोटे यांना यंदाचा कृषीथॉन आदर्श शेतकरी सन्मान मिळाला आहे.  


श्री. नानोटे यांनी शेतीक्षेत्रात संशोधन आणि माहिती विस्ताराचे काम केले आहे. ते शेतात कापूस, केळी, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू तसेच जवस पिके घेतात.

कमी मशागत तंत्र

"जमिन श्रीमंत तर शेतकरी श्रीमंत" याचा आधार घेत आणि विविध समस्यांचा विचार करून ते संवर्धित शेती करतात. मागील पंधरा वर्षांपासून शेतातील कचरा, पीक अवशेष शेतातच कुजवत असून खोल नांगरटीस बगल दिली आहे. त्यांनी कमी मशागत तंत्र अवलंबले असल्याचे श्री. नानोटे यांनी स्पष्ट केले. 

जैविक खतांचा वापर

  त्यांच्या शेतीच्या बाबतीत ते म्हणाले कि, 'जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे शेतीचा प्राण आहे. तो मी वाढवला असून जमीन भुसभुशीत पाण्याचा निचरा चांगल्याप्रकारे सुधारला असून त्यामुळे जमिनीची होणारी धूप आणि वाहून जाणारे पाणी संवर्धन करण्यास कमालीची मदत झाली. श्री नानोटे हे जैविक खतांचा वापर करून पिकाचे उत्पादन घेतात. जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला असून याच्या परिणामाने पीक उत्पादन वाढले आहे. 

जमिनीतील जैविक घटक वाढवले

 जमिनीची भौतिकता सुधारल्याने पावसाचा प्रत्येक थेंब जागेवर जिरविणे शक्य झाले. पाणी आणि जमिनीची होणारी प्रचंड प्रमाणातील धूप थांबली. जमिनीतील जैविक घटक वाढण्यास मदत झाली. यामुळे पीक उत्पादनात शाश्वतता आली. दुष्काळी परिस्थिती असतांना सुद्धा पिकांच्या वाढीवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के पर्यंत वाढ दिसून आली. 

तंत्रज्ञानाचा अवलंब प्रत्यक्ष शेतात

  श्री. नानोटे हे देशातील आणि विविध राज्यातील वेगवेगळी संशोधन केंद्र, विद्यापीठे, कृषी प्रदर्शने, प्रकल्प यांना भेटी देऊन माहिती व तंत्रज्ञान समजून त्यांचा अवलंब प्रत्यक्ष शेतात करतात. त्याबरोबरच ते इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवून त्याचा अवलंब कसा करता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून ते सर्व प्रयोग त्यांच्या शेतावर करून घेतले आहेत. त्यांच्या शेतावर विविध पिकांवर आधारित शिवार फेरीचे आयोजन केले जाते.. विविध पिकांवर सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले जाते. विविध दैनिके, आकाशवाणी आणि टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून श्री. गणेश नानोटे यांच्या यशोगाथा प्रकशित झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  शाश्वत आणि संवर्धित शेतीचा अवलंब श्री. नानोटे यांनी शेतीत केला असून इतर शेतकऱ्यांना त्यांनी संवर्धित शेतीकरिता प्रोत्साहित केले आहे. कृषी विद्यापीठातील एम.एस.सी तसेच पी.एच.डी.करीता सुरु असलेल्या शेती पद्धतीवर प्रयोग करण्यास ते मदत करतात. कृषी विभागामार्फत येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. 

जागतिक पातळीवर ग्लोबल फार्मर म्हणून दखल

  श्री. गणेश नानोटे यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर ग्लोबल फार्मर म्हणून आहे. शेती क्षेत्रात स्वतःची प्रगती करत असताना इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. 

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :

*******************************************
Facebook :

*******************************************
Instagram : 

*******************************************
YouTube :


*******************************************
Quora :

*******************************************
Koo :

*******************************************
Pintrest:

*******************************************
Share chat :

*******************************************
Twitter :

@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************


अग्रिस्टॅक प्रकल्पाच्या 'युनिक फार्मर आयडी'मुळे शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ (Agristack Project's 'Unique Farmer ID' Farmers will get benefit of various schemes)

अग्रिस्टॅक प्रकल्पाच्या 'युनिक फार्मर आयडी'मुळे 
शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ
Agristack Project's 'Unique Farmer ID' 
Farmers will get benefit of various schemes


Shetkari olakhpatra

 देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र निर्माण करून देण्यासाठी आधारकार्डप्रमाणेच 'युनिक फार्मर आयडी' देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा उभारणे हा अग्रिस्टॅक उपक्रमाचा (Agristack Farmer Registration Maharashtra) उद्देश आहे

योजनेची अंमलबजावणी सुरू

  कृषी व महसूल विभागाकडून आयडीचे काम सुरू झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील सीएसी सेंटर चालकांनाही यात समाविष्ट करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. 

  सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत हा आयडी मिळणार आहे. शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी प्रत्येकवेळी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. या युनिक आयडी मुळे शेतकऱ्यांचा मनःस्ताप कमी होणार आहे.

 जिल्ह्यातील १३ लाख ८७ हजार २३० शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत हा आयडी मिळणार आहे. यासाठी कृषी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व सीएससी सेंटरचालकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

Shetkari olakhpatra

युनिक फार्मर आयडीचे फायदे

  • युनिक फार्मर आयडीचा उपयोग पीएम किसान योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी होईल. 
  • किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी या आयडीचा उपयोग होईल. 
  • पीकविमा काढणे तसेच त्याअंतर्गत परतावा मिळवण्यासाठी  याचा उपयोग होणार आहे. 
  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून जाहीर पिकांची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आयडीचा वापर करता येणार आहे. 
  • पीक कर्ज तसेच शेती विकासासाठी मिळणारे कर्जासाठी याचा वापर करता येईल. 
  • शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती, कृषी निविष्ठा, विपणन, कृषी तज्ज्ञ यांच्याकडून मार्गदर्शनासाठी या युनिक आयडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 
  • जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. 
  • पीक व शेतीविषयक सर्वेक्षण करून घेणे, शेतमालाची एमएसपीच्या दराने विक्री करण्यासाठी युनिक आय डी आवश्यक ठरणार आहे. 
  • जिओ रेफरन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होणार आहे. 

Shetkari olakhpatra

लागणारे कागदपत्रे

 फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांचा ७/१२, आधारकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड संलग्न मोबाइल क्रमांक, जमिनीचा गट क्रमांक, सव्हें नंबर, पत्याचा पुरावा, इ-मेल आयडी अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. 

 ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे महसूल विभागाकडे नोंद नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावावर असलेल्या शेतजमिनींचा ७/१२ आधारकार्ड संलग्न असलेला मोबाइल क्रमांक यासह इतर कागदपत्रे संबंधित कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावे लागणार आहे.

 नोंदणी व अधिक माहितीसाठी https://developer.agristack.gov.in यावर संपर्क करावा. 



© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

पुनीत भूमी नाशिक : आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाची पावन नगरी I Puneet Bhoomi Nashik: A Sacred Land of Spiritual, Cultural & Historical Heritage

 

पुनीत भूमी नाशिक : आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाची पावन नगरी
Puneet Bhoomi Nashik: A Sacred Land of Spiritual, Cultural & Historical Heritage


पुनीत भूमी

पुनीत भूमी नाशिक | Puneet Bhoomi Nashik | रामायणातील पवित्र स्थळांची कथा

नाशिक हे फक्त एक शहर नाही, तर रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटना ज्याठिकाणी घडल्या त्या पवित्र भूमीचा वारसा आहे. प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या पवित्र चरणांनी स्पर्शलेली ही नगरी म्हणून नाशिकाला “पुनीत भूमी” असे गौरवाने संबोधले जाते.


नाशिक – प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने
नाशिक आहे पुनीत भूमी,
वनवासाचा काळ आणि सीताहरण
घडले याच श्रीक्षेत्र नाशिक धामी...


दंडकारण्याचा भाग – पंचवटीचे पौराणिक महत्त्व

रामायणातील दंडकारण्याचा
भाग आहे आताचे "पंचवटी",
तपोवनजवळील क्षेत्रात आहे
लक्ष्मणाने बांधलेली "पर्णकुटी"...

पंचवटी हे नावच पंच (पाच) वटी (वडाची झाडे) यांच्या उपस्थितीवरून पडले असे मानले जाते. आजही हा परिसर निसर्ग आणि अध्यात्माने ओथंबलेला आहे.


सीताहरणाची घटना – सीतागुंफा आजही साक्षीदार

सीताहरणाचे जे स्थान आहे
ते मोडते "तपोवन" पंचवटी भागात,
काळाराम मंदिराजवळील परीसरात
"सीतागुंफा" आजही वसली दिमाखात...

सीतागुंफा हे आज नाशिकचे प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ आहे. सीतेने येथेच रावणाला प्रथम पाहिले असा जनविश्वास आहे.


नाशिक नावाची उत्पत्ती – शूर्पणखेची कथा

सीतेबद्दलच्या वाईट वक्तव्यामुळे
लक्ष्मणाने कापले शुर्पणखेचे नाक,कान,
या घटनेमुळे जनस्थान भागाला
मिळाला "नाशिक" नावाचा मान...

“नाक + शिखा = नाशिक” असा लोकमान्य अर्थ सांगितला जातो. त्यामुळे या घटनेमुळेच शहराला नाशिक हे नाव मिळाले.


रामकुंड – श्रीरामांनी केलेले पिंडदान

नाशिकला श्रीरामकुंडात केले श्रीरामांनी
आपल्या वडिलांचे श्राध्द,
आजही तेथे आहेत
"सीताकुंड","लक्ष्मणकुंड" प्रसिद्ध...

गोदावरी नदीच्या काठावर वसलेले रामकुंड हे नाशिकचे हृदय आहे. लाखो भाविक येथे पवित्र स्नानासाठी येतात.


लक्ष्मणरेषा मंदिर – पवित्र परिघाचे प्रतीक

सीतेच्या संरक्षणासाठी लक्ष्मणाने
लक्ष्मणरेषा काढली पर्णकुटीभोवती,
आजही लक्ष्मणरेषा मंदिर
दिमाखाने उभे आहे पंचवटी सभोवती...

लक्ष्मणरेषा ही मर्यादा, संरक्षण आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. पंचवटी परिसरातील हे ठिकाण आजही भक्तांनी गजबजलेले असते.


निष्कर्ष

नाशिक ही फक्त पर्यटन नगरी नसून रामायणातील प्रत्येक पैलू जिवंत ठेवणारी अध्यात्मिक पुनीत भूमी आहे. पंचवटी, सीतागुंफा, रामकुंड, लक्ष्मणरेषा यांसारखी ठिकाणे आजही त्या पवित्र घटनांची साक्ष देतात.
निसर्ग, अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आणि इतिहास यांचा अद्वितीय संगम म्हणजे पुनीत भूमी नाशिक.

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने 
नाशिक आहे पुनीत भूमी, 
वनवासाचा काळ आणि सीताहरण 
घडले याच श्रीक्षेत्र नाशिक धामी... 

रामायणातील दंडकारण्याचा 
भाग आहे आताचे "पंचवटी", 
तपोवनजवळील क्षेत्रात आहे 
लक्ष्मणाने बांधलेली "पर्णकुटी"... 


Poonit bhoomi


सीताहरणाचे जे स्थान आहे
ते मोडते "तपोवन" पंचवटी भागात, 
काळाराम मंदिराजवळील परीसरात 
"सीतागुंफा" आजही वसली दिमाखात... 

सीतेबद्दलच्या वाईट वक्तव्यामुळे 
लक्ष्मणाने कापले शुर्पणखेचे नाक,कान, 
या घटनेमुळे जनस्थान भागाला  
मिळाला "नाशिक" नावाचा मान...


Poonit bhoomi

नाशिकला श्रीरामकुंडात केले श्रीरामांनी  
आपल्या वडिलांचे श्राध्द,
आजही तेथे आहेत 
"सीताकुंड","लक्ष्मणकुंड" प्रसिद्ध... 


पुनीत भूमी


सीतेच्या संरक्षणासाठी लक्ष्मणाने 
लक्ष्मणरेषा काढली पर्णकुटीभोवती, 
आजही लक्ष्मणरेषा मंदिर 
दिमाखाने उभे आहे पंचवटी सभोवती...


© दीपक केदू अहिरे

नासिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*****************************************
Telegram :
*****************************************
Facebook :
*****************************************
Instagram : 
*****************************************
YouTube :

*****************************************
Quora :
*****************************************
Koo :
*****************************************
Pintrest:
*****************************************
Share chat :
*****************************************
Twitter :
@DeepakA86854129
*****************************************
Website :

*****************************************

पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिक उद्घाटन | Piu'j Heart Sanjeevani Clinic Opened


पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिक उद्घाटन | Piu'j Heart Sanjeevani Clinic Opened

piyuj hrudya sanjivani ridam cliniche udghatan

नाशिक :  पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचे नुकतेच उद्घाटन निफाडचे चिरडे बाबा यांच्या हस्ते करण्यात आले असून या हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रोफिजियोलॉजी स्टडी या नवीन प्रकारच्या सेवेसह पर्मनंट पेसमेकर, कंडक्शन सिस्टीम पेसींग, कार्डियाक रेसिन्सीक्रोनायझेशन थेरपी (सी.आर.टी.), इंट्राकार्डियाक डिफिब्रिलेटॉर (आय.सी.डी.), ईसीजी, एको, स्ट्रेस टेस्ट, हॉल्टर मॉनिटरिंग, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी  या वैविध्यपूर्ण सेवा देण्यात येणार असल्याची माहिती पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिकचे  हृदयरोगतज्ज्ञ डॉ. निखिलकुमार पटेल यांनी पत्रकार  परिषदेत दिली. 

  ते पुढे म्हणाले कि, नाशिकमध्ये प्रथमच ही उपचार पद्धती या क्लीनिकमध्ये उपलब्ध आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रथमच स्थायिक असणारी ही सेवा नाशिकमध्ये आली असल्याचे डॉ. निखिलकुमार पटेल यांनी माहिती दिली. त्यांच्यासोबत बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार पटेल, आहार तज्ज्ञ डॉ. सिमरन पटेल हे उपस्थित होते. 


piyuj hrudya sanjaivani ridam clinic udghatan


     क्लिनिकमध्ये देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेची माहिती देतांना डॉ. निखिलकुमार पटेल यांनी सांगितले कि इलेक्ट्रोफिजियोलॉजी अभ्यास (ईपी अभ्यास) ही एक चाचणी असून जी तुमच्या हृदयाच्या विद्युत प्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि असामान्य हृदय लय तपासण्यासाठी वापरली जाते. 

      नैसर्गिक विद्युत आवेग हृदयाच्या वेगवेगळ्या भागांच्या आकुंचनांचे समन्वय साधतात. यामुळे हृदयाचे ठोके किंवा हृदय लय तयार होते आणि रक्त जसे हवे तसे वाहते.ईपी अभ्यासादरम्यान, हृदयाच्या लयीतील तज्ञ किंवा इलेक्ट्रोफिजियोलॉजी तज्ञ प्रत्येक ठोक्यादरम्यान हृदयाच्या विद्युत आवेगांच्या प्रसाराचे मॅपिंग देखील करू शकतात. असामान्य हृदयाच्या ठोक्याचे स्रोत शोधण्यात मदत करण्यासाठी हे केले जाऊ शकते. 

     कायमस्वरूपी पेसमेकर (पीपीएम) हे एक लहान उपकरण आहे जे तुमच्या छातीच्या त्वचेखाली घातले जाते जेणेकरून हृदयाचे ठोके नियमित लयीत चालतील. पीपीएममध्ये दोन भाग असतात: बॅटरी व सॉफ्टवेअर असणारा एक लहान पेसमेकर आणि तुमच्या हृदयाशी जोडलेले लीड्स असतात. 

     ड्युअल चेंबर पेसमेकर हृदयाच्या वरच्या चेंबर (अ‍ॅट्रिया) आणि खालच्या चेंबर (व्हेंट्रिकल्स) च्या वेळेचे समन्वय साधण्यास मदत करू शकते.  दीर्घकालीन पेसींग केल्याने हृदयाची पंपिंग कमी होऊ शकते. एकूण मृत्युदरात वाढ होऊ शकते. आता उजव्या वेंट्रिकल एपिकल पेसिंगचा पर्याय म्हणून कंडक्शन सिस्टम पेसिंग वाढत्या प्रमाणात होत आहे. 

     कार्डियाक रीसिंक्रोनायझेशन थेरपी (सीआरटी) ही हृदयाच्या ठोक्यांची सामान्य लय पुनर्संचयित करण्यात मदत करणारी उपचारपद्धती आहे. सीआरटी म्हणजे बाय व्हेंटिकुलर पेसींग यामध्ये उजव्या आणि डाव्या चेंबरमध्ये (व्हेंटिकुलर) असून समन्वय साधण्यास मदत होते. 

       या सर्व सेवा कायमस्वरूपी, विनाविलंब देण्यात येतील.  हृदयरोगाच्या विविध सेवेसाठी पियूज हृदय संजीवनी रिदम क्लिनिक, शॉप नं. १०८,पहिला मजला, आर्चित साई स्केअर, सुयश हॉस्पिटल शेजारी, मुंबई नाका - ४२२००२, मोबा.- ८८६२००१००५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. निखिलकुमार पटेल, डॉ. सिमरन पटेल यांनी केले आहे.

✍️ © दीपक केदू अहिरे
📍 नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केले नवीन ‘कॅमरी’ हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन | Toyota Kirloskar Motor Introduces New Camry Hybrid Electric Vehicle

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सादर केले नवीन ‘कॅमरी’ हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन
Toyota Kirloskar Motor has introduced the new 'Camry' hybrid electric vehicle


Camrey hybrid vechicle

नाशिक : टोयोटा किर्लोस्कर मोटरने नुकतेच "सेडान टू द कोअर" म्हणून डिझाइन केलेले पूर्णपणे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन सादर केले. 

  पर्यावरणाला अनुकूल असलेले हे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन शक्तिशाली कार्यक्षमतेसह उत्कृष्ट शैली, सुरक्षिततेचे अविष्कार प्रदान करून आजच्या समकालीन ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक लक्झरी पूर्णपणे नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन असल्याचे वासन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजिंदर बेदी यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. 

  यावेळी जनरल मॅनेजर श्रीकांत नायक, यूज्ड कार्सचे विभागप्रमुख हृषिकेश सोनवणे, सेल्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर  रमणदीप कलसी, फायनान्स मॅनेजर योगेश भोसले, सेल्स मॅनेजर मयूर लोहारकर, रवींद्र बैरागी, ग्राहक हर्ष पटेल हे उपस्थित होते. 

  कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनाचे विविध वैशिष्ट्य मनमीत सिंग सलुजा यांनी सांगितले. टोयोटाच्या पाचव्या पिढीतील हायब्रिड तंत्रज्ञानाद्वारे समर्पित असलेल्या कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनात उच्च-क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी असून जी सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, मजबूत कामगिरी आणि शाश्वत गतिशीलता दोन्ही प्रदान करते. 

  अपग्रेडेड डायनॅमिक फोर्स इंजिन, नवीनतम टोयोटा सेफ्टी सेन्स ३.०, ९ एसआरएस एअरबॅग्ज दिल्या असून सर्व प्रवाशांसाठी सुरक्षित, चिंतामुक्त प्रवासासाठी प्रगत सुरक्षा आणि सोयीचे संयोजन केले जाते. 

 "एनर्जेटिक ब्युटी” या संकल्पनेखाली डिझाइन केलेले हे वाहन असून एक बोल्ड न्यू लूक प्रदर्शित करते. रीडिझाइन केलेल्या फ्रंट बंपर आणि एक्सप्रेसिव्ह उंच आणि रुंद लोअर ग्रिलसह कमांडिंग रोड प्रेझेन्स तयार करते. 

 डेटा कम्युनिकेशनसह अत्याधुनिक टेलिमॅटिक्ससह सुसज्ज मॉड्यूल (डीसीएम), रिमोट एसी पॅकेज आणि १२.३-इंच मल्टीमीडियासह  मनोरंजन आणि अॅप्स यात आहे. मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (एमआयडी) एक पूर्ण ग्राफिक मीटर जो स्पष्ट ग्राफिक्स आणि उत्कृष्ट डिस्प्ले गुणवत्ता प्रदान करतो.

  ऑल न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनात डायनॅमिक फोर्स इंजिन असून स्पोर्ट, इको, सामान्य ड्रायव्हिंग मोडमध्ये ट्रान्समिशन उपलब्ध आहे. 

   मॅन्युअल ड्रायव्हिंगसाठी १०-स्पीड सिक्वेंशियल शिफ्ट मोड आहेत. आरामदायी प्रवासासाठी ऑप्टिमाइली ट्यून केलेले मॅकफर्सन स्ट्रट सस्पेंशन (एफआर) आणि मल्टी-लिंक प्रकार (आरआर) उपलब्ध आहे. 

  या वाहनाच्या डायनॅमिक डिझाइन आणि स्टाइलने बॉडी साइड आणि रीअर डिझाइनसह लो नोज आक्रमक स्पोर्टी लूक दिसतो. एलईडीने सुसज्ज सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट (DRL)सिस्टम, अत्याधुनिक बंपर आणि ग्रिलसह स्टायलिश हुड आणि फेंडर, ऑटोमॅटिक रिट्रॅक्टेबल, टर्न सिग्नल, ऑटोरिव्हर्स टिल्टसह बाहेरील रीअर-व्ह्यू मिरर (ORVM) एकसंध ड्रायव्हिंग अनुभवासाठी नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स स्पोर्टीनेस वाढवतात

  सॉफ्ट अपहोल्स्ट्रीने सजवलेले प्रशस्त केबिन, सीट, इन्स्ट्रुमेंट पॅनेल, पिवळा तपकिरी सॉफ्ट लेदर अपहोल्स्ट्री, ऑर्नामेंट इन्स्ट्रुमेंट पॅनेल, पियानो ब्लॅक फ्रंट कन्सोल बॉक्स, ऑटो अप/डाउन आणि जॅम प्रोटेक्शनसह पॉवर विंडो, गिटार-आकाराचे ऑडिओ गार्निश, 3-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, नॅनोईटीएम एक्स आयन जनरेटर, इंटीरियर इल्युमिनेशन पॅकेज/एंट्री सिस्टम, फेड-आउट स्मार्ट रूम लॅम्प + डोअर,आत हँडल व  ४ फूटवेल दिवे ही कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनाची अंतर्गत वैशिष्ट्ये आहेत. 
  नवीन मॉडेलच्या लाँचिंगबद्दल बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मसाकाझू योशिमुरा म्हणाले कि, ऑल न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलचे लाँचिंग हे टोयोटाच्या जागतिक पर्यावरणीय आव्हान २०५० च्या अनुषंगाने अधिक चांगले, शाश्वत गतिशीलता पर्याय विकसित करण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
  भारतासाठी आमची उत्पादन रणनीती कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा ध्येय साध्य करण्याच्या  राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आहे. ऑल-न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकलची ग्रीन मोबिलिटी ऑफर म्हणून ओळख होईल भविष्यातील कार्बन-मुक्त, आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी आमचे योगदान आणखी मजबूत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 ऑल-न्यू कॅमरी हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनाच्या हायब्रीड बॅटरीवर ८ वर्षांची किंवा १,६०,००० किमी, जे आधी येईल त्याची वॉरंटी मिळते. कारची टेस्ट ड्राईव्ह टोयोटा शोरूम मध्ये उपलब्ध आहे.     ऑल-न्यू कॅमरी हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनासाठी बुकिंग सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी वासन टोयोटा, वासन नगर, कै. श्री कुंदनलाल वासन मार्ग, मुंबई-आग्रा रोड, नाशिक मोबा. नं- ८८८८८ ४७१९, या शो रूमला   भेट द्या किंवा www.toyotabharat.com वर ऑनलाइन बुकिंग करावी.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau)

राजमाता जिजाऊ 
Rajmata jijau

Rajmata


समयसूचकता,संघटन कौशल्य 
अनेक गुणांची झळाळी, 
राजमाता जिजाऊंच्या 
व्यक्तिमत्त्वाला लाभली... 

स्वराज्य स्थापनेच्या ध्येयापासून 
नाही विचलित झाल्या, 
माणूस हाच कर्ता 
कृषी क्षेत्रात बदल केला... 

जिजाऊंच्या जीवनात 
हतबल करणारी परिस्थिती, 
दृढ निश्चयाने घेतले निर्णय 
सारासार निर्णय घेण्याची गती... 

जिजाऊंनी माणसाला व 
समाजाला आकार दिला, 
उच्चतत्त्व आणि नीतीमूल्य 
सातत्याने संघर्ष केला... 

जिजाऊंनी स्वराज्यामध्ये 
पुरुष व महिलांना दिला सन्मान, 
सामाजिक न्यायाची बाजू 
समतेला दिला सर्वोच्च मान... 

जिजाऊंनी सर्व क्षेत्रात 
घेतला कृतीशील सहभाग,
तात्विक मूल्यांची पायाभरणी 
काढला प्रगतीचा माग... 

जिजाऊंनी शिवरायांना दिला 
सल्ला बुद्धीपूर्वक कृतीचा, 
आधुनिक समाजाला प्रेरणा 
सकल जनवादी जीवनदृष्टीचा... 

आजचे प्रश्न सोडवण्यासाठी 
अभ्यासा जिजाऊंचे प्रशासन, 
त्यांच्या समग्र विचारांनी 
जीवनी मिळते मार्गदर्शन...

राजमाता Rajmata

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

*******************************************
Telegram :
*******************************************
Facebook :
*******************************************
Instagram : 
*******************************************
YouTube :

*******************************************
Quora :
*******************************************
Koo :
*******************************************
Pintrest:
*******************************************
Share chat :
*******************************************
Twitter :
@DeepakA86854129
*******************************************
Website :

******************************************


कॉर्पोरेटचा मार्ग सोडून मातीकडे वळण | From Corporate Career to Green Rural Entrepreneurship – Nature’s Bliss Story

  कॉर्पोरेटचा मार्ग सोडून मातीकडे वळण: ‘Nature’s Bliss’ने घडवलेला ग्रामीण परिवर्तनाचा प्रवास | From Corporate Career to Green Rural Entrepre...