अग्रिस्टॅक प्रकल्पाच्या 'युनिक फार्मर आयडी'मुळे
शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ
Agristack Project's 'Unique Farmer ID'
Farmers will get benefit of various schemes
देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र निर्माण करून देण्यासाठी आधारकार्डप्रमाणेच 'युनिक फार्मर आयडी' देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा उभारणे हा अग्रिस्टॅक उपक्रमाचा (Agristack Farmer Registration Maharashtra) उद्देश आहे.
योजनेची अंमलबजावणी सुरू
कृषी व महसूल विभागाकडून आयडीचे काम सुरू झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील सीएसी सेंटर चालकांनाही यात समाविष्ट करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत हा आयडी मिळणार आहे. शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी प्रत्येकवेळी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. या युनिक आयडी मुळे शेतकऱ्यांचा मनःस्ताप कमी होणार आहे.
जिल्ह्यातील १३ लाख ८७ हजार २३० शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत हा आयडी मिळणार आहे. यासाठी कृषी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व सीएससी सेंटरचालकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
युनिक फार्मर आयडीचे फायदे
- युनिक फार्मर आयडीचा उपयोग पीएम किसान योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी होईल.
- किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी या आयडीचा उपयोग होईल.
- पीकविमा काढणे तसेच त्याअंतर्गत परतावा मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
- केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून जाहीर पिकांची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आयडीचा वापर करता येणार आहे.
- पीक कर्ज तसेच शेती विकासासाठी मिळणारे कर्जासाठी याचा वापर करता येईल.
- शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती, कृषी निविष्ठा, विपणन, कृषी तज्ज्ञ यांच्याकडून मार्गदर्शनासाठी या युनिक आयडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे.
- पीक व शेतीविषयक सर्वेक्षण करून घेणे, शेतमालाची एमएसपीच्या दराने विक्री करण्यासाठी युनिक आय डी आवश्यक ठरणार आहे.
- जिओ रेफरन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होणार आहे.
लागणारे कागदपत्रे
फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांचा ७/१२, आधारकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड संलग्न मोबाइल क्रमांक, जमिनीचा गट क्रमांक, सव्हें नंबर, पत्याचा पुरावा, इ-मेल आयडी अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे महसूल विभागाकडे नोंद नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावावर असलेल्या शेतजमिनींचा ७/१२ आधारकार्ड संलग्न असलेला मोबाइल क्रमांक यासह इतर कागदपत्रे संबंधित कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावे लागणार आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी https://developer.agristack.gov.in यावर संपर्क करावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment