साईदत्त संस्थानतर्फे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा Idol Pranpratistha and Kalsharohana ceremony organized by Saidatta Sansthan from 7th to 10th February
नाशिक : साईनगर येथील साईदत्त संस्थानतर्फे शिव पिंड मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान अमृतधाम, साईबाबा मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती साईदत्त संस्थानकडून देण्यात आली आहे.
शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दु. ४ ते १० वाजेपर्यंत साईनगर परिसरातून मूर्तीची सवाद्य भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत अघोरी पथक, छ. शिवाजी महाराज व मावळे, गोल्डन बॅण्ड, नाशिक ढोल ताशा पथक, डि.जे., पावरी नृत्य, लेझिम पथक यांचा सहभाग असणार आहे.
शनिवार ८ फेब्रुवारी रोजी स. ८ वा. मानसी पाटील यांच्या गणेश वंदना, दत्त संगीत, शिव भजन याने सुरूवात होणार असून स. ९ ते १ पर्यंत व दु. ३ ते ७ पर्यंत महापूजा व रात्री ८ ते १० बाळू गायकवाड यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी स. ९ ते १ व दु. ३ ते ७ महापूजा व रात्री ८ वाजता ह.भ.प. सोपान महाराज यांचे व्याख्यान व १२ ते ४ पर्यंत महाप्रसाद देण्यात येणार आहे. प. पु. श्री. संत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य प.पु. श्री. माधवगिरी महाराज व प. पु. श्री संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन पूजा होईल.
परिसरात होत असलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी नागरिकांनी भरभरून सढळ हाताने आर्थिक व अन्नदानासाठी मदत करण्याचे आवाहन साईदत्त संस्थान व ओम साई फ्रेंड सर्कल यांनी केले आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment