name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): September 2024

साहित्यिकांच्या शब्दात 'पाऊस' ('Rain' in the words of writers)

 साहित्यिकांच्या शब्दात 'पाऊस'
'Rain' in the words of writers


Sahitiyankachya shabdat paus

  अश्मयुगापासून तर आजच्या अणुयुगापर्यंत मानवी मनाचे पावसाशी नाते आहे. भावनांच्या अदिम आविष्कारापासून तो अभिजात स्पंदनांपर्यंत 'पाऊस' सर्वसाक्षी आहे. अनेक लेखकांनी, कवींनी पावसावर लिहिले. पावसाचे आणि त्यांचे नाते इतके घट्ट आहे जसे जीवन-मरणाचे, मातीचं आणि पावसाचं नातं सांगणारी कविता शांता शेळके सहजपणे करून जातात
'आला पाऊस मातीच्या वासात गं...
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं...
      
  पावसाच्या थेंबाचं संजीवन धरतीला मिळालं की धरती टवटवीत होते. उन्हाळ्याने केलेला कठोर आघात विसरण्याचा प्रयत्न करते. अरुणा ढेरेंच्या  कवितेत 'पाऊस' वेगळाच भासतो-
'घन आले म्हणता म्हणता
पाऊस असा आला की
जरी मिटुनी घेतले डोळे
हृदयाची भिजली माती
तू ओंजळ फक्त पसरली
अन् म्हटले नाही काही
सोसल्या अनावर धारा
जशी सोसत असते बाई !'
 
 मंगेश पाडगावकरांना प्रियकराला आर्जवून सांगणाऱ्या सखीच्या भूमिकेत पाऊस दिसतो
'मातीच्या ओल्या ओल्या वासात
वाऱ्याच्या खोल खोल श्वासात
झाडाचं भिजणं सुंदर आहे
माझ्या जीवा जगणे सुंदर आहे.'
        
   पाऊस कधी मातीच्या कुशीत तान्हं बाळ होतं, मोराचं पीस खोवलेला नटखट श्यामल कान्हा होतो. कधी पाऊस छेड काढतो म्हणून इंदिरा संत आपल्या कवितेत म्हणतात-
'नको नको रे पावसा,
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली

Sahitiyankachya shabdat paus

जमिनीवर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांना पाहून कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात -
'बरसे रे घन बरसे रे
बरसे जलसर आले सरसर
मल्हाराचे स्वरसे रे, 
बन बरसे रे!'
  
 वा. रा. कांताच्या काव्यातून होणारी पाऊसभेट नि झपाटणारं प्रेम काव्यातून अनुभवायला रसिकमन हवं. ते म्हणतात -
'केस चिंब ओले होते
थेंब तुझ्या गाली
ओठावर माझ्या त्यांची
किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा
प्रीतीच्या रसाची

 अंतःकरणातून दाटून आलेलं दुःख पावसांच्या धारांनी एकरूप होते. याचा प्रत्यय ग्रेस यांच्या कवितेत येतो
'पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलकी पाने
हलकेच जाग मज ओली
दुःखाच्या मंद सुराने ॥"
 
 अशाप्रकारे साहित्यिकांच्या मनात पावसाने घर केलेले आहे. पावसाची विविध रूपे आपल्याला भुरळ पाडतात. पाऊस हवाहवासा वाटतो कारण तो जमिनीची भूक तर भागवतोच, पण आपल्या मनाचीही भागवतो. म्हणून म्हणावंसं वाटतं-

'पाऊस मातीलाच नव्हे तर
मनालाही भिजवतो
कोंब कोंब मातीत नव्हे
मनातही उगवतो."

दीपक के. अहिरे
आनंदपूर / नाशिक

(पूर्व प्रसिध्दी : दै. लोकमत दि. ९ ऑगस्ट १९९८)

Rain in the words of writers

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

जागतिक पर्यावरण आरोग्य दिन (World Environmental Health Day)

 जागतिक पर्यावरण 
आरोग्य दिन 
World Environmental Health Day


World environmental health day
World environmental health day


दरवर्षी २६ सप्टेंबरला होतो 
जागतिक पर्यावरण आरोग्यदिन साजरा, 
वर्तमान व भावी 
पिढ्यांच्या हितासाठी 
जबाबदारीने पर्यावरणाचं रक्षण करा... 

पर्यावरण आणि आरोग्य 
पूरक आहेत एकमेकांना, 
तुमचं शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी 
निसर्गाच्या सान्निध्यात राहा..ना... 


निसर्गाचं महत्व समजण्याची गरज 
घरात, शेतात आजूबाजूला झाडे लावा, 
तुळस,स्पायडर प्लांट,अरेका पाम लावून 
घरात हवा शुद्ध नी खेळती ठेवा... 


वाढत्या प्रदूषणामुळे मिळत नाही ऑक्सिजन 
वाढत आहेत श्वसनाचे विकार,  
निसर्ग जगला तर 
मानव जगेल 

निसर्गाची हानी करण्याला द्या नकार... 


© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील (Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil)


शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील
Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil

Karmveer

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दि. २२ सप्टेम्बर रोजी सर्वत्र साजरी करण्यात येईल त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा हा लेख. (पूर्व प्रसिध्दी: २२ सप्टेंबर १९९०, दैनिक रामभुमी )

      

 कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज गावी सप्टेम्बर १८८७ मध्ये झाला. कर्मवीर भाऊरावांच्या जीवनाचा आलेख मोठा मनोहारी व स्फूर्तीदायी आहे. खेडयातील रम्य परिसराचा व सत्प्रवण माता पित्यांच्या शिकवणुकीचा भाऊरावांच्या मनावर मोठा परिणाम झाला. सत्यनिष्ठा, समदृष्टी, सेवाभाव, ममत्व हे गुण त्या त्यांच्यात आढळून येत. त्यांच्या स्वतःच्या कार्यामागे स्पष्ट, वस्तुनिष्ठ विचारांची बैठक होती. आपल्या कार्याविषयी श्रद्धा होती. हे सर्व गुण बालपणीच त्यांच्या मनःपटलावर कायमचे ठसलेले होते.

  

 शंभर वर्षांपूर्वीही जनमानसात इंग्रजी शिक्षणावर विश्वास होता. त्यानुसार भाऊरावांना कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी धाडण्यात आले. इंग्रजी सहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे शिक्षण थांबले. कोल्हापुरात शिकत असतांना भाऊरावांची राहण्याची व्यवस्था जैन वसतिगृहात होती. तेथील कर्मठ शिस्त त्यांना सहन होत नसे. अशातच एकदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घडलेल्या मिस क्लार्क होस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी भाऊरावांनी काम केले. त्याबद्दल भाऊरावांना आंघोळ करून येण्यास सांगितले. आपल्यासारख्याच माणसाला स्पर्श केल्याने आपण अमंगल होतो हे भाऊरायांना पटत नव्हते. त्याचा एकूण परिणाम असा झाला की भाऊरायांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. पण त्याचा भाऊरावांना फायदाच झाला. ते छत्रपती शाहू महाराजाच्या सानिध्यात आले. त्यांच्यामुळे भाऊरावांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. समाजातील विषमता, दारिद्रय, अज्ञान, उच्चनिचपणा पाहुन भाऊरावांची समाजसेवेची ईच्छा बळावली. यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे हे त्यांनी ओळखले व आपले आयुष्य समाजास सुशिक्षित, ज्ञानी, सुसंस्कृत बनविण्यासाठी वेचले.

Karmveer

शैक्षणिक कार्यास प्रारंभ
भाऊरावांनी आपल्या वयाच्या ३२ व्या वर्षी शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला १९२९ साली ग्रामीण जनतेच्या, गरीब रयतेच्या कल्याणासाठी भाऊरायांनी सातारा येथे एक शिक्षण संस्था काढली. ती संस्था आज 'रयत शिक्षण संस्था या  नांवाने आजरामर झाली आहे.

"इवलेसे रोप लाविले व्दारी
तयाचा वेलू गेला गगनावरी"
  
  या पद्य पंक्तीप्रमाणे ह्या संस्थेचा विकास झाला आहे, होत आहे, होणार आहे. वयाच्या ३४व्या म्हणजेच १९२१ साली भाऊरावांच्या जीवनात एक क्रांतिक्षण आला. मुंबईला स्वदेशी चळवळीत भाऊरावांची म. गांधीशी भेट झाली. गांधीजीच्या व्यापक व्यक्तिमत्वाचा भाऊरावावर प्रभाव पडला. भाऊरावांनी विदेशी वस्त्रांचा त्याग केला व खादीची वस्त्रे वापरू लागले. टोपी व चप्पल वापरणेही सोडून दिले. अशा प्रकारे निः संगवृत्ती धारण केली.


ग्रामीण जनतेसाठी धडपड
   भाऊरावांची धडपड ग्रामीण गरीब जनतेसाठी होती. भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. म्हणून प्रथम खेड्यात सुधारणा होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. तांत्रिक, वैज्ञानिक, वैद्यकीय ज्ञान खेड्यापर्यन्त पोहोचले पाहिजे असे त्यांचे मत होते. गरीब जनतेस, सुलभतेचे शिक्षण मिळावे ही आजची राष्ट्रीय गरज आहे व खेडी आपल्या पायावर उभी राहिली म्हणजे राष्ट्र सामर्थ्यशाली बनेल हे भाऊरावांचे महत्वाचे विचार होते. महाग शिक्षणाबरोबरच गुणवत्तेवर निकालातील प्रवेशपध्दतीच्याही हे विरोधात होते. आपल्या गावापुरते एखादे कॉलेज, एक दोन शाळा काढणे हा मर्यादित दृष्टीकोन भाऊरावांचा नव्हता. त्यांनी शिक्षणप्रसाराची चळवळच हाती घेतली होती. प्रत्येक खेड्यात शाळा अशा शेकडो शाळा, बालकमंदिरे स्थापन करून प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षणाची भाऊरावांची विशाल दृष्टी होती. या सर्वांमागे श्रम व श्रधेबरोबरच भाऊरावांच्या साथीला जनतेचे सहकार्य होते.
७५ टक्के स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे. या सर्व परिस्थितीत निपटण्यासाठी प्रचंड निर्धार व आर्थिक सहाय्याची गरज आहे. आज शिक्षण महाग बनत चालले आहे. पिळवणूक केली जात आहे आणि अभ्यासक्रम अवघड व सदोष बनत आहे. बाहे. खाजगी क्लासेस व गाईड बुकांना महत्व दिले जात आहे.  शिस्त व चारित्र्य संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. बुध्दिमत्ता आळसावत चालली आहे. शिक्षण हे स्पर्धात्मक बनत आहे.  वयाच्या वीस- पंचविस वर्षानंतरच्या अध्ययनानंतरही नोकरी वा रोजगारांची निश्चिती नसल्याने तरुण पिढीत उदासिनतेचे सावट पसरलेले आहे. या सर्व परिस्थितीवर मात केली पाहिजे व ते शक्य आहे. केवळ कर्मवीरांच्या ध्येयदृष्टीची व निर्धाराची कास धरावी.

गरजा ओळखल्या
  भाऊरावांनी समाजाचे दुःख जाणले. त्यांच्या गरजा ओळखल्या. अशा असाहाय्य समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. ह्या भावनेतून भाऊरावांनी जे शैक्षणिक कार्य केले ते प्रचंड आहे. चैतन्यमय आहे. यांच्या विशुद्ध भूमिकेने व दिशेने गेल्यास संपूर्ण देशात सामाजिक स्थित्यंतर घडून आल्यास नवल नाही. कर्मवीरांच्या बाबतीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की, कर्मविर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपाऱ्यांना लिहिता वाचता केलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरायांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.
  अशा प्रकारे महाराष्ट्रातील दलित, गरीब समाजास जागृत करणारे कर्मवीर ९ मे १९५९ या दिवशी अनंतात विलीन झाले. परंतु हजारो ज्ञानदीप पेटवून गेला.
दीपक के. अहिरे,  
आनंदपूर (बागलाण)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


निरोगी जपानी लोक (healthy japanese people)

निरोगी जपानी लोक
Healthy Japanese People

Healthy Japanese people

जपानी लोक जगतात
निरोगी जीवनशैली,
न चुकता व्यायाम
सवय प्रत्येक घरातली


जपानचा निसर्ग
विलोभनीय खूप सुंदर
सात्विक घरच्या भोजनावर
त्यांचा नेहमी असतो भर


जपानी लोकांना
कशाची नसते हाव
गरजेपुरती वस्तू नी वापर
म्हणून मिळतो वाव


वेळ मिळाला की हे लोक
निसर्गाच्या सान्निध्यात जातात
फोन, टेक्नॉलॉजीपासून दूर
ताजेतवाने, रिफ्रेश होतात


जपानमध्ये "इकिगाई"
संकल्पनेला महत्व फार
शोधतात जीवनाचा उद्देश
पूर्तता करतात अपरंपार


इकिगाई जीवनात
देते अर्थ आणि दिशा
जीवनात नेमका उद्देश
झटकतो कंटाळा नी निराशा


सातत्याने शिक्षण
नी सुधारणा करणे
नवीन शिकण्याची जिद्द
हा दृष्टिकोन अवलंबलणे


योग्य प्रमाणात आहार
जपानी हे तत्त्व पाळतात
पचनक्रियेवर येत नाही ताण
शरीराला निरोगी ठेवतात


जपानी तत्त्वज्ञान "काइझेन"
म्हणजे सतत सुधारणा,
मन स्थिरपणे कार्यरत
शरीर सुदृढतेचा बाणा


"सेपुकु" हे जपानी
आत्मानुशासन
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी
हे महत्वाचे कारण


© दीपक केदू अहिरे, नाशिक

Healthy Japanese people

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


पितृपक्ष (PitruPaksha)

 पितृपक्ष
   PitruPaksha


Pitrupaksha


आजपासून पितृपक्षाची

होत आहे सुरूवात, 

पूर्वजांप्रति आपले

कर्तव्य श्राद्धाची रुजवात...


पूर्वज आणि पितरांची 

काढा श्रद्धापूर्वक आठवण,

पिंडदान करून करा

अपत्य धर्माचे पालन...


श्राद्धावेळी द्यावे

पाच जणांना भोजन,

गाय, श्वान, कावळा, पाहुणा 

आणि मुंगीसाठी अन्नदान... 


श्राद्ध पितरांना तात्काळ 

सूर्य व वायूच्या रूपाने मिळतो,

पृथ्वीलोक व पितृलोकाचा थेट संपर्क

पितृगण अन्नदानाने संतुष्ट होतो...


© दीपक केदू अहिरे, नाशिक 

Pitrupaksha



जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध, चित्रकला स्पर्धा ( Seminar, Essay, Painting Competition on World Tourism Day)

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध, चित्रकला स्पर्धा
Seminar, Essay, Painting Competition on World Tourism Day

World Tourism day

     महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, नाशिक विभागामार्फत २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या परिसंवाद, निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण यांनी केले आहे.

   दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रादेशिक कार्यालय, नाशिक मार्फत २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिन २०२४ साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी युनाटेड नेशन टुरिझम यांचे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनासाठी "पर्यटन आणि शांतता" हे  घोषित केले आहे. 

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास, उपहारगृहे, बोटक्लब येथे २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पर्यटनदिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त राबविले जाणारे विविध उपक्रम प्रादेशिक कार्यालय नाशिक मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात अति महत्वाच्या माननीय व्यक्ती, नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ, पर्यटन व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योजक, विद्यार्थी, निवास व न्याहारी इ. यांना निमंत्रित करण्यात येणार असून या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  पर्यटन दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  यात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आर्वजुन सहभाग घ्यावा. ही स्पर्धा महाविद्यालयांनी आपआपल्या महाविद्यालयात घ्यावयाची असून स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आलेले चित्रकला व निबंध महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय, नाशिक कार्यालयाकडे २० सटेंबर २०२४ पर्यंत जमा करावेत.  दोन्ही स्पर्धेतून पात्र विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषीक बक्षीस व  प्रमाणपत्र वितरण सोहळा २७ सप्टेंबर २०२४ रोजी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येतील.

निबंध स्पर्धेचे विषय : पर्यटन शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे त्यांचा शांतता संदेश, माइया स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय असतील. 

विजेत्यांना प्रथम पारितोषिक : नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यक्तींना २ रात्र ३ दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.  द्वितीय पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ रात्र २दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तर तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.


चित्रकला स्पर्धेचे विषय :  जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधुन आपण पर्यटन आणि शांतता या घोषवाक्याशी अधीन राहून चित्रकलेचे विषय असतील.  विजेत्यांना प्रथम पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ रात्र ३ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तर तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.


निबंध व चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे निबंध व चित्र २० सटेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय,नाशिक-४२२००२ 

दूरध्वनी क्रमांक : ०२५३-२९७००४९ येथे जमा करावीत. अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. तरी परिसंवाद, निबंध व चित्रकला स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात आलेली चित्र व निबंध कार्यालयाकडे सादर करावीत असे आवाहन नाशिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी केले आहे.

शिक्षक दिन (Teachers day)

 शिक्षक दिन
 Teachers day


Teachers day


भारतात ५ सप्टेंबर रोजी

शिक्षक दिन साजरा होतो,

शिक्षकांप्रती असते कृतज्ञता

त्यांचे योगदान आपण पाहतो...


उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

यांचा जन्मही पाच सप्टेंबरचा,

शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे

हा दिवसही त्यांचा वाढदिवसाचा...


अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक

विद्यार्थ्यांना करत असतात खंबीर,

शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्याला दिशा

शाळाबाह्य  जगात धरावा लागतो धीर...


जडणघडण करण्यात गुरूचा वाटा मोठा

जिथे शिक्षण तिथेच होतो विकास,

शिल, क्षमा आणि कलेचा संगम 

शिक्षक, गुरूत असतो हमखास... 


© दीपक केदू अहिरे, नाशिक

Teachers day

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube


Linkedin :

https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


जागतिक नारळ दिन (World Coconut Day)

 जागतिक नारळ दिन 
World Coconut Day


World Coconut Day


जागतिक नारळ दिन 

दरवर्षी २ सप्टेंबरला, 

धार्मिक,आरोग्य,सांस्कृतिक

व्यावसायीकदृष्ट्या महत्व नारळाला... 


नारळ एकमेव असे फळ

ज्याचा प्रत्येक भागाचा वापर,

मोठ्या प्रमाणात पौष्टिक मूल्ये

नारळपाण्याचा वापर भरपूर...


विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी

वापर नारळाच्या दुधाचा,

दररोजच्या वापरातही

वापर होतो नारळ तेलाचा...


नारळाची सरासरी उंची ९८ फुट 

६० ते ८० फुटाचे नारळ बुटके,

जगात इंडोनेशिया, भारतात 

नारळाचे झाड १८६ फूट इतके...


नारळाची उपयुक्तता व मागणी

रोज दिवसेंदिवस वाढते,

म्हणूनच नारळाला 

कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube



हॅरी पॉटरची लेखिका जे.के.रोलिंग (Harry Potters author j.k.rowling)

हॅरी पॉटरची लेखिका जे.के.रोलिंग

Harry Potterchi lekhika: j.k.rowling

वयाच्या १७ व्या वर्षी
महाविद्यालयातून काढले,
२५ वर्षाची असताना
आईचे निधन झाले...


२६व्या वर्षी पोर्तुगालला
इंग्रजी शिकण्यासाठी गेली,
२७ व्या वर्षी लग्न झाले
तिला एक मुलगी झाली...


२८ व्या वर्षी झाला घटस्फोट
निदान झाले गंभीर आजार,
२९ व्या वर्षी आली फुटपाथवर
आत्महत्या करण्याचा केला विचार...


तिला होती लिखाणात रुची
त्याचा विचार तिने केला,
३१व्या वर्षी पहिलं पुस्तक
प्रकाशित करण्याचा विचार झाला...


वयाच्या ४२ व्या वर्षी तिने
"हॅरी पॉटर"  प्रकाशित केले,
प्रकाशनानंतर पहिल्या दिवशी
१ कोटी १० लाख प्रति विक्री झाले...


या लेखिकेचं नाव आहे जे.के.रोलिंग
हॅरी पॉटर आज जागतिक ब्रँड बनला,
आयुष्यात कधी मानू नका हार
जिद्दीने चाला, भले थोडा उशीर झाला...


स्वतःवर ठेवा विश्वास
जिद्द ठेवा मेहनत करण्याची,
आपल्यासमोर ठेवा प्रेरणा
 जे.के.रोलिंग या बाईची...


© दीपक के.अहिरे, नाशिक 

Harry Potter

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

******************************************


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...