name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): December 2023

भारतातील हरितक्रांतीचे जनक : एम.एस. स्वामीनाथन (Father of Green Revolution in India : M.S. Swaminathan)


भारतातील हरितक्रांतीचे जनक : एम.एस. स्वामीनाथन 
(Father of Green Revolution in India : M.S.  Swaminathan)

Haritkrantiche janak: m.s. swaminathan 
M.S. Swaminathan

  डॉ. मोंकोम्बू सांबासिवन स्वामीनाथन हे एक प्रसिद्ध भारतीय कृषीशास्त्रज्ञ आहेत. ज्यांना आपण सर्व  एम्.एस. स्वामीनाथन या नावाने ओळखतो. 

अतुलनीय समर्पण

 ज्यांनी हरितक्रांतीद्वारे भारतातील कृषीक्षेत्र बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  तामिळनाडूतील कुंभकोणम येथे ७ ऑगस्ट १९२५ रोजी जन्मलेल्या स्वामिनाथन यांचे अन्नसुरक्षा सुधारण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण कृषी पद्धतींचा अवलंब करून भूकबळी कमी करण्यासाठी त्यांचे अतुलनीय समर्पण आहे

कृषीक्षेत्राला आकार

     डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचे जीवन आणि कार्य हे विज्ञानाच्या परिवर्तनशील शक्तीचा आणि एका उदात्त कार्यासाठी समर्पणाचा पुरावा आहे.  कृषी क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य प्रयत्नांमुळे लाखो भारतीयांसाठी केवळ अन्नसुरक्षाच नाही तर शास्त्रज्ञांच्या भावी पिढ्यांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींसाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून एम.एस. स्वामिनाथन यांचा वारसा देशाच्या कृषीक्षेत्राला आकार देत आहे आणि हे नावीन्यपूर्ण आणि प्रगतीचे चिरस्थायी प्रतीक आहे.

 जीवनप्रवास आणि शिक्षण 

      एम.एस. स्वामिनाथन यांचा एक प्रतिष्ठित कृषीशास्त्रज्ञ होण्याचा प्रवास भक्कम शैक्षणिक पायापासून सुरू झाला.  त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मधून कृषी विज्ञान विषयात बॅचलर पदवी घेतली.  त्यानंतर त्यांनी युनायटेड स्टेट्समधील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातून जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यानंतर पीएच.डी. त्याच संस्थेतून कृषी वनस्पतिशास्त्रात केली.

करिअरची सुरुवात

      १९५० दशकाच्या सुरुवातीस भारतात परतल्यानंतर स्वामीनाथन यांनी देशाच्या कृषीक्षेत्राला आकार देणारा प्रवास सुरू केला. त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रवेश घेतला आणि नंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेत (ICAR) प्रमुख पदे भूषवली. त्यांचे कार्य प्रामुख्याने उच्च-उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींच्या प्रजननावर केंद्रित होते. जे देशातील अन्नटंचाईच्या सततच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करतात.

हरितक्रांती 

    एम.एस स्वामिनाथन यांची कारकीर्द १९६०च्या दशकात आली. जेव्हा त्यांनी नॉर्मन बोरलॉगसह इतर शास्त्रज्ञांसोबत  सहकार्य करून भारतात हरितक्रांतीची ओळख करून दिली. ज्यावेळी भारताला वारंवार अन्नसंकटांचा सामना करावा लागत होता. आणि उपासमारीचा धोका मोठा होता तेव्हा स्वामीनाथन यांचे समर्पण आणि दूरदृष्टी उच्च-उत्पादक पीक जाती विशेषत: गहू आणि तांदूळ विकसित आणि अंमलात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

भारतातील हरितक्रांतीचे जनक

   हरितक्रांतीने पीक उत्पादनात  वाढ घडवून आणली. प्रामुख्याने या उच्च-उत्पादनाच्या वाणांची लागवड सुधारित सिंचन पद्धती आणि खते आणि कीटकनाशकांचा वापर  याने केवळ अन्नसंकट टळले नाही तर भारताला अन्न उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले.  स्वामीनाथन यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना "भारतातील हरितक्रांतीचे जनक" अशी उपाधी मिळाली.

योगदान आणि वारसा 

  एम.एस. स्वामीनाथन यांचे भारतीय शेतीतील योगदान हरितक्रांतीपुरते नसून त्याच्या पलीकडे आहे.  पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेचे जतन करण्यावर भर देऊन शाश्वत कृषी पद्धतींचा पुरस्कार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  त्यांच्या नाविन्यपूर्ण पध्दतीमध्ये सेंद्रिय शेतीच्या वापरास प्रोत्साहन देणे, पर्यावरणास अनुकूल कीटक व्यवस्थापन आणि देशी पिकांच्या जातींचे संवर्धन करणे समाविष्ट आहे. 

स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना

 स्वामीनाथन त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत  गरिबांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबी कमी करणे या उद्देशाने अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) १९८८ मध्ये स्थापन केले. हे  फाउंडेशन शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि अन्नसुरक्षा या दिशेने कार्य करत आहे.

मिळालेले पुरस्कार 

    एम.एस. स्वामिनाथन यांच्या कृषी आणि अन्न सुरक्षेतील  योगदानामुळे त्यांना १९८७ मध्ये प्रतिष्ठित जागतिक अन्न पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांसह पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देखील मिळाले आहेत. एम.एस. स्वामिनाथन यांचे निधन २८ सप्टेंबर २०२३ रोजी झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. भारतातील कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************



शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख : (Introduction of the Farmer Producer Company) : विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कं.लि.(vimalai mahila farmers producer company Ltd.)

शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख :
Introduction of the Farmer Producer Company:

विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कं.ली; शहादा 
Vimalai Mahila Farmers Producer Co., Ltd. Shahada


Shetkari utpadak kamapnichi olakh
Sou. Priti Abhijeet patil

    नंदुरबार जिल्ह्यातील, तालुका शहादा येथील विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना अध्यक्षा सौ. प्रिती अभिजीत पाटील यांनी केली आहे. 

सुरुवातीपासून त्यांना शेतकरी वारसा लाभला आहे.  त्यांनी  कॉम्पुटर सायन्समध्ये एम.एस.ची पदवी अमेरिकेतील मिसूरी सेंट लुइस विद्यापीठातून घेतली आहे.  तसेच कृषी क्षेत्रातील मोन्सॅन्टो या नामांकित कंपनीत आय. टी. डिव्हिजन मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदावर काम करून त्याचा लाभ आपल्या परिसरातल्या शेतकरी बांधवाना कसा होईल तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांचा शेती व्यवसायात सहभाग वाढवून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक सबलीकरण कसे करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या मातीत दि. २ एप्रिल २०२१ रोजी कंपनीच्या अध्यक्षा सौ. प्रिती पाटील यांनी परिसरातील होतकरू महिलांना सोबत घेऊन यांनी विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली.

  विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये एकूण पाच महिला संचालक असून ३१० महिला सभासद आहेत. एकूण भागभांडवल ६ लाख असून २०२०-२१ मध्ये या आर्थिक वर्षात उलाढाल १२ लाख झाली असून २०२१-२२ मध्ये ही उलाढाल २५ लाखापर्यंत पोहचली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ५० लाख एवढी उलाढाल झाली आहे. 

Shetkari utpadak kamapnichi olakh
On Training institute 

    कंपनीच्या अध्यक्षा सौ. प्रीती पाटील यांनी आपला आय.टी., कॉम्पुटर व फायनान्स क्षेत्रातील आपला अनुभव पणाला लावून परिसरातील शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी महिला म्हणून माझी जबाबदारी काय? या प्रश्नावर त्यांनी काम केले. त्यांनी त्यावर मॉडेल प्रशिक्षण विकसित केले. यात त्यांनी समाविष्ट केले कि, एक महिले मध्ये जी कामाची व्यावहारिकता, अचूकता व सातत्य असते. जे इतर कोणातही नसते. 

    त्याचा फायदा आपल्या कुटुंबाची शेती व्यवसाय करतांना कसा करता येईल याच्यासाठी त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला. व तो अभ्यासक्रम ते आपल्या विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत प्रशिक्षण केंद्रातून महिलांपर्यंत पोहचवीत आहेत. जसे कि, आजच्या शेती व्यवसायात आपण पाहतो कि, शेतकरी बांधव आपल्या घराबाहेरील सगळे काम करू शकतो. पण अजून बरीच अशी कामे आहेत कि जी कामे शेतकरी बांधव वेळेच्या अभावी करू शकत नाही. पण त्या कामांमध्ये जर महिला सहभागी झाल्यानंतर त्या कुटुंबाचे उत्पन्न निश्चित २० ते ३० टक्के वाढू शकते. असे सौ. प्रीती पाटील यांना वाटते.

  आज कुठल्याही शेतकरी बांधवाकडे आपल्या व्यवसायाचा लेखा-जोखा नसतो. आपल्या व्यवसायाचे कुठलेही आर्थिक ताळेबंद नसते ते ताळेबंद ठेवणे. अशी बरीच जोडधंदे आहेत कि जे महिला घरातल्या घरात करू शकतात. व्यवसायातील बारकाव्यांचा अभ्यास करू शकतात. मजुरांचा हिशोब ठेऊन त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेऊ शकतात. 

   पिकांच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून चांगल्या प्रतीचा माल तयार करू शकतात. आपल्या घराचे व शेती- व्यवसायाचे आर्थिक व्यवस्थापन महिला चांगल्या रीतीने करू शकतात. या व इतर पैलूच्या आधारे भरपूर विषयांचा अभ्यास सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला भगिनीपर्यंत कंपनीच्या अध्यक्षा सौ. प्रीती पाटील व संचालक मंडळ पोहचवीत असतात.

    विमलाई धान्य, मिरची खरेदी व प्रतवारी केंद्रातर्फे धान्य खरेदी व प्रतवारी केंद्रात विविध प्रकारचे धान्ये जसे कि, सोयाबीन, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी तसेच लाल मिरची, हिरवी मिरची खरेदी करून त्याची योग्य प्रतवारी करून कंपन्यांना विकली जातात. 

Shetkari utpadak kamapnichi olakh
Stall of vimalai mahila farmer company 

      कंपनीचे शहादा येथे शेतकरी सुविधा व सल्ला केंद्र आहे. त्याच्यामार्फत कंपनी शेतकरी बांधवाना पिकविमाविषयी मार्गदर्शन करून पीकविमा काढून देणे, शेतकरी अपघात विमा काढून देणे, शेतकरी बांधवाना माती व पाणी परिक्षणानुसार अन्नद्रव्ये व्यवस्थापन करून देणे, कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन सदर योजनांचे अर्ज करून देणे जसे कि,  एन.एच. एम., एन.एच.बी., डीबीटी, मनरेगा, पीएमएफएमई, स्मार्ट, मॅंग्नेट, एमओएफपीआय, पीएमकेएसवाय, ई. योजनांचे अर्ज भरून देण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. याबरोबरच परिसरातील विविध बचतगटातील महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करून त्यांना विविध प्रकारचे उद्योगधंदे उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम या सुविधा केंद्रामार्फत केले जाते.

  सद्यस्थितीत कंपनीचे वरीलप्रमाणे प्रकल्प सुरु असून कंपनीला स्मार्ट प्रकल्पातून धान्य क्लिनिंग, ग्रेडिंग व सोर्टेक्स युनिट, गोदाम बांधकाम २००० मे. टन असा असून ३.५० कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर झाला असून सदर प्रकल्पाचे चालू होईल. 

    तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव विविध प्रकारच्या भरडधान्याचे (मिलेट) उत्पादन घेत असतात. सदर परिसरातील शेतकरी बांधव व महिलांना सोबत घेऊन मिलेटची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी मिलेटस पार्क उभारणार असल्याची माहिती सौ. प्रीती पाटील यांनी दिली.

संपर्क : सौ. प्रीती अभिजित पाटील, अध्यक्षा
विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कं. लि., शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार
ई मेल : vimlaimfpcl@gmail.com

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

नाशिक जिल्ह्यातील कृषीपर्यटन केंद्र (Agri Tourism Center in Nashik District)

 नाशिक जिल्ह्यातील कृषीपर्यटन केंद्र
Agri Tourism Center in Nashik District 

  

Nashik jillhyatil krushi parytan kendra
Shivparv Agrotourism Centre 
   

     ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे झाले आहे. आणि त्यासाठी पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक ठरते. शेतीच्या पारंपारिक व्यवसायाबरोबर शाश्वत उपाय म्हणून कृषीपर्यटन हा पर्याय पुढे आला आहे
  
    गेली अनेक शतके भारताची संस्कृती ही जगामध्ये कृषी संस्कृती या रूपानेच ओळखली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे.  शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन रोजगार व अर्थसहाय्य मिळून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषीपर्यटन या संकल्पनेमध्ये आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषीपर्यटन होय.
  
आजच्या धावपळीच्या जीवनात विज्ञानयुगात पर्यटनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक देशात तसेच देशांतर्गत अनेक भागामध्ये ऐतिहासिक किल्ले, धरणे, पुरातन वास्तू यांचा उपयोग सध्या पर्यटनासाठी करण्यात येत आहे. परंतू आता ग्रामीण भागातील संस्कृती, निसर्ग, पशुपक्षी, ग्रामीण भागातील जीवनशैली ही शहरी भागामध्ये पहावयास मिळत नाही. त्यामुळे धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शहरी भागातील जनता आता ग्रामीण भागातील या जीवनशैलीकडे पर्यटन म्हणून पाहू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषि पर्यटन हा एक पुरक व्यवसाय म्हणून नावारुपाला येत आहे. 
       
कृषि व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची तर शेती ही केवळ उपजीवीका नसून जीवनशैली आहे. राज्यातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीमउद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषि संलग्न विषयाचा एकत्रित विचार करुन विकास घडवून आणल्यास ग्रामीण भागामध्ये कृषिपर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. 
     
आजमितीस कृषिपर्यटन संदर्भात शासनाची कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही. त्याकरिता फलोत्पादन तसेच इतर संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिल्यास ग्रामीण भागामध्ये कृषि पर्यटन केंद्र विकसित होणे सहज शक्य आहे. कृषिपर्यटन हा जगातील अतिशय वेगाने वृध्दींगत होणारा व्यवसाय ठरत आहे. महाराष्ट्रात अशी उल्लेखनीय कृषीपर्यटन केंद्र आहेत. त्या ठिकाणी भेट देणे गरजेचे आहे.

शिवपर्व कृषीपर्यटन केंद्र 


    शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र नाशिक जिल्हा, देवळा येथील वाजगाव येथे आहे. हे केंद्र ७० एकरावर पसरलेले आहे. या कृषिपर्यटन केंद्रात स्विमिंग, बोटींग, रेनडान्स, आर्टीफिसियल फॉल्स आहेत. शिवारफेरी, घरगुती चुलीवरचे जेवण, मनोरे, देशी गायीची गोशाळा, फळबागा या सुविधा या  कृषिपर्यटन केंद्रात आहेत.

 

Nashik jillhyatil krushi parytan kendra
Orchard of shivparv Agrotourism 

   निसर्गाच्या सान्निध्यात, ऐतिहासिक धोडप किल्लाच्या कुशीत, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र वसलेले आहे. सर्व प्रकारच्या फळबागांनी बहरलेल्या या शिवपर्व कृषिपर्यटन केंद्रात नारळ, आंबा, सिताफळ, पेरू, चिक्कू, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद,आवळा, अंजिर, लिंबू, जांभूळ इ. फळपिके बागा आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारचे अन्नधान्य, ऊस, कांदे, भाजीपाला या कृषी पर्यटन केंद्रात पाहावयास मिळतात. 

      
शिवपर्व कृषीपर्यटन केंद्र हे विविधतेने नटलेले असून  बोटिंग स्विमिंग, रेनडान्स, धबधबा, खेळणी, बैलगाडी शिवारफेरी या सुविधा येथे उपलब्ध आहेत.  या ठिकाणी हॉल, किचन, कारंजा, मंदीर (देवालय) अशी आकर्षक आणि संदर ठिकाणे आहेत.

नारळवाडीत असलेली निवासव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. तेथे जाण्यासाठी ७०० फूट लांबीचा लोखंडी पूल तसेच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी विविध उंचीचे ठिकठिकाणी अनेक मनोरे असे निसर्गरम्य कृषी पर्यटन असून याचा आस्वाद घेणे हा एक आनंददायी अनुभव आहे.
    
स्थानिक कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देताना ग्रामीण भागात शाश्वत पर्यटनाला चालना देणे हे शिवपर्व कृषीपर्यटनचे ध्येय आहे. ग्रामीण समुदायांसाठी आर्थिक संधी निर्माण करणे, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक परंपरा जतन करणे आणि पर्यटकांना शैक्षणिक आणि माहितीपूर्ण अनुभव प्रदान करणे हे शिवपर्व कृषी पर्यटनाचे उद्दिष्ट असल्याचे संचालिका सौ. अंजना केवळ देवरे यांनी सांगितले.

रानझोपडी कृषीपर्यटन केंद्र

    

    नाशिक जिल्हा, सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील श्री.हर्षल देवराम थविल यांनी रानझोपडी कृषीपर्यटन केंद्राची स्थापना केली. श्री.थविल यांचे इंजिनियरिंग शिक्षण झाले परंतु नोकरी न करता  आपल्या माळरानात रानझोपडी कृषीपर्यटन केंद्र उभारून नंदनवन फुलविले आहे. गावाकडच्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून गावात शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 


Nashik jillhyatil krushi parytan kendra
Ranzopadi Agrotourism 

    श्री. हर्षलला झाडांची आवड असल्याने त्याने सुरवातीला कॉफ़ी, कोको,अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रूट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अँपल, पेरु, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी इ. झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळ्या १३ प्रकारांची लागवड केली.
    
ग्रामीण भागातला हा परिसर नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरलेला असतो. ही बाब हेरुन हर्षदने कृषीपर्यटन सुरु केले. या माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली त्यानंतर हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध प्रकारची झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी इ. गोष्टी उभारुन कृषीपर्यटन केंद्र उभे केले.

Nashik jillhyatil krushi parytan kendra

      


सध्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 'फॅमिली कॅम्पिंग' ची संकल्पना राबवण्यात येत आहे. रानझोपडी कृषीपर्यटन केंद्रात पारंपरिक जेवण दिले जाते.यात नागलीची भाकर, रानभाज्या दिल्या जातात.


© दीपक केदू अहिरे

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


तृणधान्यापासून खाद्यान्नप्रक्रिया (Food processing from cereals)

 तृणधान्यापासून खाद्यान्नप्रक्रिया
Food processing from cereals

Trundhanya


     जगातील जास्तीत जास्त लोक तृणधान्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात मुख्य खाद्यान्न म्हणून करतात. भारतामध्ये प्रामुख्याने भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी हे तृणधान्य मोठया  प्रमाणावर खाद्यान्न म्हणून वापरली जातात.  


   तृणधान्यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च हा मुख्य अनघटक असतो आणि त्यापासून मानवी शरीरास सर्वात जास्त ऊर्जा पुरविली जाते. पिष्टमय पदार्थाबरोबरच तृणधान्यांमध्ये प्रथिने, कैल्शियम, लोह आणि बी. कॉम्प्लेक्स जीवनसत्वेसुद्धा मोठया प्रमाणावर असतात.

तृणधान्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण इतर धान्यांपेक्षा कमी असल्यामुळे त्यांची साठवण सहजासहजी, कमी खर्चात अधिक कालावधीसाठी करता येते. 

    तृणधान्यामुळे जेवणास मृदू, सौम्य चव निर्माण होते. याच कारणामुळे तृणधान्यांचा वापर बालआहारात जास्त केला जातो. तृणधान्याचे आकार, जडणघडणही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. काही तृणधान्य आकाराने मोठी तर काही अतिशय लहान आहेत. त्यांचे आकारमान गोलाकार, निमुळते, दंडगोल, चपटे, अंडाकृती, किडनीसारखे, अर्धगोल अशा प्रकारचे आहेत. यात ७५ ते ९० टक्के भाग स्टार्चचा असतो.

तृणधान्याचे दाणे प्रामुख्याने टरफलांनी, कोंड्याने किंवा जाड आवरणाने, रंगद्रव्याने, मेणाने आच्छादलेले असते. हा भाग खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तसेच पचनासाठी सुलभ नसतो. त्यामुळे ते तृणधान्यापासून वेगळे करणे गरजेचे असते. 

  तृणधान्य दळण्याच्या प्रक्रियेत तृणधान्यात असणारे कठीण आवरण काढून टाकले जाते. तृणधान्यापासून चांगल्या प्रतीचे पीठ तयार व्हावे म्हणून त्या तृणधान्यास दळण्याअगोदर गरम पाण्याची प्रक्रिया करावी. गरम पाण्याच्या या प्रक्रियेमुळे तृणधान्यापासून कोंडा, बिजांकुर,फोलकटे लवकर व सहजा सहजी वेगळे होऊन त्यापासून बनवलेल्या पदार्थांची प्रत आणि प्रमाण वाढते. 

तांदूळ प्रक्रिया 

   तांदळापासून भात तयार करता येतो. अशा या तांदळाचे विविध प्रकार आहेत. त्यात थाय जासमिन व्हाईट राईस, तांबडा तांदूळ, पांढरा तांदूळ, तुटलेला तांदूळ, आखूड तांदूळ, पारबॉइल्ड राईस किंवा अपूर्ण शिजविलेला तांदूळ, गलुटेनियम राईस हे प्रकार आहेत. मुख्यत्वे तांदळामध्ये महत्त्वाचे दोन प्रकार म्हणजे मेनरहित तांदूळ व मेणासहित तांदूळ हे आहेत.


Trundhanya
Rice🌾 processing


     तांदळापासून अनेक पदार्थ तयार होतात. त्यात पूर्ण शिजवलेला किंवा त्वरीत शिजणारा तांदूळ, शेवया, राईस केक, आंबविलेला तांदळाचा केक आणि पुढींग्ज, इनस्टंट राईस, रेडी टू- इट सिरीअल्स, तांदळाचे पोहे (साळीचे पोहे), भाजलेले पोहे (चुरमुरे), तांदळाच्या लाह्या, तांदळाचे इतर खाद्यापदार्थ तयार करता येतात.

भाताचा तुसाचा उपयोग विट भट्टीमध्ये विट भाजण्यासाठी करतात. तसेच तुस जाळल्यावर त्याच्यामध्ये असणाऱ्या वाळूचा उपयोग काच निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तुस जाळल्यानंतर मिळणाऱ्या काळपट राखेचा उपयोग जमिनीचा सामू सुधारण्यासाठी होतो. अशी राख अल्कधर्मीय जमिनीमध्ये वापरतात.  

     भाताच्या तुसामध्ये व कोंड्यामध्ये १५ ते २० टक्के तेलाचे प्रमाण असते. याचा उपयोग कच्चे तेल (क्रूड ऑईल) म्हणून डांबरामध्ये करतात. तसेच या तेलावर प्रक्रिया केल्यास याचा पुरक खाद्यतेल म्हणूनही उपयोग करतात. ज्या भागात उकडा तांदूळ केला जातो त्या कोंड्यामध्ये या तेलाचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढे आढळते.

याचा उपयोग मेन, चरबीयुक्त पदार्थ, संतुलीत पशुखाद्य व पेंड तयार करण्यासाठी करतात. पॉलीश करताना कोंड्यामध्ये जो भृम असतो तो २० ते २५ मेश चाळणीतून चाळून अलग करून कोंबड्याचे खाद्य म्हणून याचा उपयोग करता येतो. कारण त्यामध्ये अधिक पौष्टीकता असते. 

   मानवी आहारासाठी याचा उपयोग करावयाचा असेल तर यामधील भेसळयुक्त खडे, कसपटे, तुटलेले दाणे काढून टाकावेत. ह्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, शर्करा व तेलाचे भरपूर प्रमाण असते. तसेच लहान मुलांना शाळेमध्ये सुकडी म्हणून देता येते.

सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये उकड्या तांदूळ अन्न म्हणून शिजवतांना जे पाणी निघते त्याचा उपयोग पेज खाण्याकरीता करतात. उकड्या तांदळाला भाजून त्याचे पीठ तयार केले जाते. व त्यात साखर, वेलची, सुके खोबरे घालून लाडू तयार करतात. अशा प्रकारे भाताचे उपपदार्थ तयार करून आपला आर्थिक फायदा करून घेऊ शकतो. 

मका प्रक्रिया 

     मका तृणधान्याचा उपयोग खाद्यान्न म्हणुन मोठया प्रमाणात केला जातो कारण त्यात भरपूर पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने आहेत.
भारतात ९० टक्के मका मानवी खाद्यपदार्थ म्हणून वापरतात. मक्यापासून पोहे मोठया प्रमाणावर तयार केले जातात. त्यांचा वापर न्याहरी, ब्रेकफास्टसाठी केला जातो. मक्यापासून लाह्या, स्टार्च, डेस्ट्रीन सायरप, कारखान्यातील अल्कोहोल, बिव्हरेजेस, पशुखाद्य आणि इतर अनेक पदार्थ तयार केले जातात. 


Trundhanya
Maize 🌽 processing 

   मक्याच्या दाण्यातील स्टार्चच्या प्रकारानुसार फिल्ट कॉर्न, डेन्ट कॉर्न, स्वीट कॉर्न, पॉप कॉर्न, फ्लोअर कॉर्न, वॉक्सी कॉर्न असे प्रकार पडतात मक्याची सोजी म्हणजेच रवा वापरून उपमा, हलवा, इडली सारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात. गहू किंवा ज्वारीच्या पिठात ४० टक्के मका पीठ मिसळून बेकरी पदार्थ तयार केल्याने कमी किमतीत व पौष्टीक पदार्थ तयार करता येतील. 

   महागड्या बेसन पिठात ३० टक्के मक्याचे पीठ मिसळून बेसन पीठाचे उत्तम प्रकारचे कमी किंमत असलेले विविध खाद्यपदार्थ तयार करता येतील. मक्याच्या पिठापासून सूप, सॉस, कस्टर्ड पावडर, कॉर्न फ्लोअर बनविली जाते. शिजवलेल्या मका कणीचा उपयोग करून पोहे व चिवडा तयार करतात. काही विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या मक्याच्या वाणापासून लाह्या, पॉप कॉर्न तयार करून स्नॅक फूड म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. 

   मक्याच्या दाण्यापासून खाद्यतेल, पशुखाद्य, स्टार्च, सिरप बनवले जाते. दुय्यम पदार्थ यांचा वापर खुराक तयार करणाऱ्या उद्योगात केला जातो. कोंबड्यांचे खाद्य निर्माण करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या मक्याचा वापर करून अंड्याची गुणवता सुधारता येते. 

मक्याच्या धान्याव्यतीरीक ताटांचा वापर ओला चारा म्हणून जनावरांना खाऊ घातला जातो. जनावरांनी न खाल्लेली ताटे सरपण, इंधन म्हणून वापरली जातात. मक्याच्या कणसापासून दाणे वेगळे केल्यानंतर जी बुरकुंडे किंवा बिट्टी मोठया प्रमाणावर इंधनासाठी वापरतात. या सर्व प्रक्रियेतून उरलेला माल कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो. 

मक्यापासून अशा प्रकारे कोरडी (ड्राय मिलिंग) प्रक्रिया पद्धतीचा वापर करून विविध खाद्यपदार्थ, पशुखाद्य तसेच औद्योगिक उपयोगाचा माल तयार करता येतो.

गहू प्रक्रिया 

  जगातील सर्वात महत्वाचे वैशिष्टयपूर्ण असे गहू तृणधान्य आहे. यात सर्वात जास्त प्रथीने असून, त्याचे पौष्टीक मूल्यही अधिक आहे. म्हणून याला तृणधान्यांचा राजा म्हटले जाते.

बेकरी उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटकपदार्थांपैकी सर्वात महत्वाचा व पायाभूत घटक म्हणजे मैदा होय. हा मैदा गव्हाच्या रोलर फ्लोअर मिलमध्ये विशिष्ट पद्धतीने दळून तयार केला जातो. मैद्याची प्रत ही  बऱ्याचवेळी गव्हाच्या मुलभूत गुणधर्मावर अवलंबून असते. काही गहू टणक असतात. अशा गव्हापासून तयार होणारा मैदा, ब्रेड चांगला तयार होतो. 


Trundhanya
Wheat 🌾 processing 

    गव्हाचा उपयोग मुख्यत्वे शेवया, बोटवे, नखुले असे विशिष्ट खाद्य पदार्थ बनविण्यासाठी होतो. पशुखाद्यही तयार केले जाते. विविध प्रकारचे ब्रेड, बनस, केकस्, बनस, बिस्कीटे, कुकीज तयार करण्यासाठी गहू दळून त्याचे पीठ तयार करणे ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया होय.

आधुनिक मैद्याच्या गिरणीमध्ये गहू मुख्यत्वे दोन टप्प्यात दळतात ते म्हणजे ब्रेक सिस्टीम व रिडक्षण सिस्टीम हा होय.  ब्रेक सिस्टीममध्ये रोलरच्या ४ ते ५ जोड्या असून त्याला लागून चाळण्या व प्यूरीफायर असतात. रिडक्सन सिस्टीममध्ये गव्हाच्या तुकडयांचे टप्प्याटप्याने आकारमान कमी करून शेवटी त्याचे रुपांतर मैद्यात करतात. 

   ही प्रक्रिया करतांना कोड्याचा व बीजांकुराचा भाग चाळण्याद्वारे वेगळा करतात.  कोंडा काढलेला म्हणजे पॉलिश केलेला आणि तडे गेलेला पारबॉईल गव्हाला बुलगूर असे म्हणतात. बुलगूर हा एक महत्वाचा गव्हाचा पदार्थ मानला जातो.

या पदार्थापासून अनेक प्रकारचे शिजविलेले पदार्थ, न्याहरीचे पदार्थ तसेच पाहुणचाराचे पदार्थ बनवता येतात.  काही वेळेस तांदळास पर्याय म्हणून बुलगूर या पदार्थाचा वापर केला जातो. बालकाच्या आहारामध्ये वापरतात.

ज्वारी प्रक्रिया 

     भारतात भात आणि गव्हानंतर ज्वारीचा खाद्यान्न म्हणून उपयोग केला जातो. ज्वारीचा उपयोग विविध प्रकारचे खाद्यपदार्थ निर्मितीसाठी केला जातो. ज्वारीच्या धान्याबरोबरच त्याच्या ताटांचा, कडब्याचा उपयोग ओला किंवा वाळलेला असतांना पशुखाद्य म्हणून प्रामुख्याने करतात. ज्वारीच्या काही वाणात रस व साखरेचे प्रमाण अधिक आहे. अशा वाणांचा उपयोग सायरप तयार करण्यासाठी केला जातो. 


Trundhanya
Jwari processing

  ज्वारीत स्टार्च महत्त्वाचा घटक आहे. तो शुद्ध स्वरूपात वेगळा करून त्याचा उपयोग आंबविण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी व त्यापासून अल्कोहोल व इतर रासायनिक द्रावणे तयार करतात.

ज्वारीवर प्रक्रिया करताना प्रथम स्वच्छता करणे, कोंडा काढणे, कांडणे आणि शेवटी पिठामध्ये रुपांतर करणे या नंतरच्या प्रक्रियेमध्ये पिठाचे किंवा कच्च्या मालाचे रूपांतर पदार्थामध्ये पक्क्या मालामध्ये केले जाते. 

     मानवी आहारात तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण पाहिजे ते ज्वारीच्या सेवनाने पुरेपूर मिळते. कावीळ झालेल्या रोग्यास ज्वारीचा आहार उपयुक्त ठरतो. मानवाचा लठ्ठपणा व मधुमेह कमी करण्यास ज्वारीचा उपयोग होतो.

हृदयाचे विविध विकार ज्वारीने कमी होतात. भुक वारंवार लागत नाही. पोटाचे विकार कमी होतात. आजारी मानवास दूध ज्वारी भाकरीचा आहार देण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. अशी या बहुउपयोगी ज्वारीचे विविध अन्नपदार्थ बनवल्यास तरुणांना या क्षेत्रात मोठा रोजगार प्राप्त होऊ शकतो. 

बाजरी प्रक्रिया 

  बाजरी प्रामुख्याने खाद्यान्न म्हणून वापरतात.  बाजरीवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जात नाही. काही प्रमाणात पॉलीश करून हिरवा रंग घालवून पांढरा केला जातो. बाजरीपासून लाह्या तयार करण्यासाठी परलिंग केले जाते. आणि नंतर लाह्या तयार केल्या जातात. तसेच परलिंग केलेली बाजरी शिजवून अनेक पदार्थ तयार केले जातात. 


Trundhanya
Bajari processing 

   बाजरीपासून भाकरी, पोरजी यासारखे पदार्थ तयार करतात. या धान्यास माल्टींगची प्रक्रिया करून त्यापासून पेयही तयार करतात.

बाजरीचे पीठ साधारणपणे ४-५ दिवसांत कडसर होत असल्यामुळे पुष्कळ लोक बाजरी खाणे टाळतात. बाजरीचे धान्य फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात १५ ते २० सेकंद बुडविल्यास त्यातील पीठ कडू करणारे घटक निष्क्रीय होतात. अशा प्रक्रिया केलेल्या धान्यापासून तयार केलेले पीठ महिनाभरापर्यंत चांगल्या स्थितीत साठवता येते.

   अशा प्रकारे तृणधान्यांचा उपयोग मानवी आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. सध्या तर या तृणधान्यांच्या पदार्थाना, उपपदार्थाना भरपूर मागणी आहे. खाद्यान्न बरोबरच यापासून विविध पदार्थ बनवल्यास फार मोठी बाजारपेठ या पदार्थांना उपलब्ध होईल. 


#millet year #rice #cereal #processing #भरडधान्य #तृणधान्य #bajari #gahu #nachani #varai #kodo #jwari #maize #prakriya 


© दीपक केदू अहिरे, 
नाशिक
deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...