name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): नाशिक जिल्ह्यातील कृषीपर्यटन केंद्र (Agri Tourism Center in Nashik District)

नाशिक जिल्ह्यातील कृषीपर्यटन केंद्र (Agri Tourism Center in Nashik District)

 नाशिक जिल्ह्यातील कृषीपर्यटन केंद्र
Agri Tourism Center in Nashik District 

  

Nashik jillhyatil krushi parytan kendra
Shivparv Agrotourism Centre 
   

     ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे झाले आहे. आणि त्यासाठी पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक ठरते. शेतीच्या पारंपारिक व्यवसायाबरोबर शाश्वत उपाय म्हणून कृषीपर्यटन हा पर्याय पुढे आला आहे
  
    गेली अनेक शतके भारताची संस्कृती ही जगामध्ये कृषी संस्कृती या रूपानेच ओळखली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे.  शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन रोजगार व अर्थसहाय्य मिळून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषीपर्यटन या संकल्पनेमध्ये आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषीपर्यटन होय.
  
आजच्या धावपळीच्या जीवनात विज्ञानयुगात पर्यटनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक देशात तसेच देशांतर्गत अनेक भागामध्ये ऐतिहासिक किल्ले, धरणे, पुरातन वास्तू यांचा उपयोग सध्या पर्यटनासाठी करण्यात येत आहे. परंतू आता ग्रामीण भागातील संस्कृती, निसर्ग, पशुपक्षी, ग्रामीण भागातील जीवनशैली ही शहरी भागामध्ये पहावयास मिळत नाही. त्यामुळे धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शहरी भागातील जनता आता ग्रामीण भागातील या जीवनशैलीकडे पर्यटन म्हणून पाहू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषि पर्यटन हा एक पुरक व्यवसाय म्हणून नावारुपाला येत आहे. 
       
कृषि व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची तर शेती ही केवळ उपजीवीका नसून जीवनशैली आहे. राज्यातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीमउद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषि संलग्न विषयाचा एकत्रित विचार करुन विकास घडवून आणल्यास ग्रामीण भागामध्ये कृषिपर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. 
     
आजमितीस कृषिपर्यटन संदर्भात शासनाची कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही. त्याकरिता फलोत्पादन तसेच इतर संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिल्यास ग्रामीण भागामध्ये कृषि पर्यटन केंद्र विकसित होणे सहज शक्य आहे. कृषिपर्यटन हा जगातील अतिशय वेगाने वृध्दींगत होणारा व्यवसाय ठरत आहे. महाराष्ट्रात अशी उल्लेखनीय कृषीपर्यटन केंद्र आहेत. त्या ठिकाणी भेट देणे गरजेचे आहे.

शिवपर्व कृषीपर्यटन केंद्र 


    शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र नाशिक जिल्हा, देवळा येथील वाजगाव येथे आहे. हे केंद्र ७० एकरावर पसरलेले आहे. या कृषिपर्यटन केंद्रात स्विमिंग, बोटींग, रेनडान्स, आर्टीफिसियल फॉल्स आहेत. शिवारफेरी, घरगुती चुलीवरचे जेवण, मनोरे, देशी गायीची गोशाळा, फळबागा या सुविधा या  कृषिपर्यटन केंद्रात आहेत.

 

Nashik jillhyatil krushi parytan kendra
Orchard of shivparv Agrotourism 

   निसर्गाच्या सान्निध्यात, ऐतिहासिक धोडप किल्लाच्या कुशीत, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र वसलेले आहे. सर्व प्रकारच्या फळबागांनी बहरलेल्या या शिवपर्व कृषिपर्यटन केंद्रात नारळ, आंबा, सिताफळ, पेरू, चिक्कू, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद,आवळा, अंजिर, लिंबू, जांभूळ इ. फळपिके बागा आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारचे अन्नधान्य, ऊस, कांदे, भाजीपाला या कृषी पर्यटन केंद्रात पाहावयास मिळतात. 

      
शिवपर्व कृषीपर्यटन केंद्र हे विविधतेने नटलेले असून  बोटिंग स्विमिंग, रेनडान्स, धबधबा, खेळणी, बैलगाडी शिवारफेरी या सुविधा येथे उपलब्ध आहेत.  या ठिकाणी हॉल, किचन, कारंजा, मंदीर (देवालय) अशी आकर्षक आणि संदर ठिकाणे आहेत.

नारळवाडीत असलेली निवासव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. तेथे जाण्यासाठी ७०० फूट लांबीचा लोखंडी पूल तसेच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी विविध उंचीचे ठिकठिकाणी अनेक मनोरे असे निसर्गरम्य कृषी पर्यटन असून याचा आस्वाद घेणे हा एक आनंददायी अनुभव आहे.
    
स्थानिक कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देताना ग्रामीण भागात शाश्वत पर्यटनाला चालना देणे हे शिवपर्व कृषीपर्यटनचे ध्येय आहे. ग्रामीण समुदायांसाठी आर्थिक संधी निर्माण करणे, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक परंपरा जतन करणे आणि पर्यटकांना शैक्षणिक आणि माहितीपूर्ण अनुभव प्रदान करणे हे शिवपर्व कृषी पर्यटनाचे उद्दिष्ट असल्याचे संचालिका सौ. अंजना केवळ देवरे यांनी सांगितले.

रानझोपडी कृषीपर्यटन केंद्र

    

    नाशिक जिल्हा, सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील श्री.हर्षल देवराम थविल यांनी रानझोपडी कृषीपर्यटन केंद्राची स्थापना केली. श्री.थविल यांचे इंजिनियरिंग शिक्षण झाले परंतु नोकरी न करता  आपल्या माळरानात रानझोपडी कृषीपर्यटन केंद्र उभारून नंदनवन फुलविले आहे. गावाकडच्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून गावात शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 


Nashik jillhyatil krushi parytan kendra
Ranzopadi Agrotourism 

    श्री. हर्षलला झाडांची आवड असल्याने त्याने सुरवातीला कॉफ़ी, कोको,अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रूट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अँपल, पेरु, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी इ. झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळ्या १३ प्रकारांची लागवड केली.
    
ग्रामीण भागातला हा परिसर नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरलेला असतो. ही बाब हेरुन हर्षदने कृषीपर्यटन सुरु केले. या माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली त्यानंतर हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध प्रकारची झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी इ. गोष्टी उभारुन कृषीपर्यटन केंद्र उभे केले.

Nashik jillhyatil krushi parytan kendra

      


सध्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 'फॅमिली कॅम्पिंग' ची संकल्पना राबवण्यात येत आहे. रानझोपडी कृषीपर्यटन केंद्रात पारंपरिक जेवण दिले जाते.यात नागलीची भाकर, रानभाज्या दिल्या जातात.


© दीपक केदू अहिरे

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...