name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): November 2021

किती उसन्या आणाव्या (How much to bring)

किती उसन्या आणाव्या...
How much to bring


How much to bring

किती उसन्या आणाव्या,
छातीतील कळा, 
पिकेल कधी माझा,
भावनांचा हा मळा... 

किती उसन्या आणाव्या,
सहानुभूतीच्या लाटा, 
कधी दिसेल प्रकाश,
अंधारल्या या वाटा... 

किती उसन्या आणाव्या,
गळले हे अवसान, 
पैशांपुढे नाही चालत,
वाजत नाही कुठलं गान... 

किती उसन्या आणाव्या,
अख्खं आगलावे वाण, 
उभ्या पिकात चरतंय ढाेर,
हाेतंय माझं नुकसान... 

© दीपक अहिरे,नाशिक

आनंदाच्या पायघड्या (Happy feet)

आनंदाच्या पायघड्या...
Happy feet  


Happy

आनंदाच्या पायघड्या        
टाकून आम्ही बसलाे,        
पसरला चाेहिकडे आनंद    
वाटून आम्ही हसलाे...       

आनंदाच्या पायघड्या
मुक्त हस्ते घ्या आनंद,
तुमच्याकडे पाहिजे
फक्त मनाचा परमानंद...

आनंदाच्या पायघड्या
व्हावे आनंदाचे निधान,
तरच करता येईल
आपल्या आनंदाचे विधान...

आनंदाच्या पायघड्या
आहे आनंदाचे कारण,
दररोज या ठिकाणी
हाेते आनंदाचे सारण...

© दीपक अहिरे, नाशिक

जाता जाता... (As we go)

जाता जाता...
As we go 


As we go

जाता जाता या जगाला प्रेम अर्पावे,

जाता जाता या जगाला समजून घ्यावे...

जाता जाता या जगाला कवेत घ्यावे,

जाता जाता या जगाला धन्यवाद द्यावे...

जाता जाता या जगाला दयेने बघावे,

जाता जाता या जगाला देहदान करावे...

जाता जाता या जगाला नेत्ररूपी उरावे,

जाता जाता या जगाला बाेलू द्यावे...

© दीपक अहिरे, नाशिक


सुटलेली माणसे (Escaped people)

सुटलेली माणसे...
Escaped people


Escaped people

सुटलेली माणसे दबा धरून ठेवतात, 
मिठीत नाहि तर मुठीत आवळतात

सुटलेली माणसे हातचंच शिकवितात, 
दुसऱ्याच्या बुध्दीनेच ते जीवन जगतात

सुटलेली माणसे फसवी साथ देतात, 
बाेट आपलं धरून तिसऱ्यामागे लागतात

सुटलेली माणसे कपाळावर कायम अढी, 
काहीतरी मनात शिजत असते यांची कढी

© दीपक अहिरे,नाशिक

मनात कुठेतरी (Somewhere in my mind)

मनात कुठेतरी...
Somewhere in my mind

Somewhere in my mind


मनात कुठेतरी शंकाचं काहूर, 
काही करण्यास मी खूप आतुर

मनात कुठेतरी असंख्य विचार, 
जुळेल आपली उद्योगाची तार

मनात कुठेतरी विचार हिताचा, 
सदैव चिंतन काया नी वाचा

मनात कुठेतरी भव्य दिव्य स्वप्न, 
तयार करताे संभवित प्रश्न

© दीपक अहिरे, नाशिक

व्रण इतके अंतरी... (Ulcers so far)

व्रण इतके अंतरी...
Ulcers so far

Ulcers so far

व्रण इतके अंतरी,
घाव आता सुकले, 
नाही साेस कशाचा,
परीजनांना मुकले... 

व्रण इतके अंतरी,
काेणाचा देवू दाखला, 
ज्याच्याकडे पहावे,
जाे ताे पाेळलेला... 

व्रण इतके अंतरी,
कुठे साेडू ऊसासा, 
पहावे ह्दयी डाेकवून,
कधी साेडतील फासा... 

व्रण इतके अंतरी,
सुटतात ते वाग्बाण, 
साेडवून माझी समस्या,
ते लावतात त्यांची तान... 

© दीपक अहिरे,नाशिक

माझ्या मनातली कविता (A poem in my mind)

माझ्या मनातली कविता...
A poem in my mind


A poem in my mind


माझ्या मनातली कविता,
शब्दाशब्दातून ओसंडते, 
जाे वाचक घेताे आस्वाद,
त्याच्या मनाचा ठाव घेते

माझ्या मनातली कविता,
सांगताे संदेशपर गुजगोष्टी, 
मनाचा हळूवार निचरा,
बदलते विचारांची सृष्टी

माझ्या मनातली कविता,
दररोज वाचकाला भेटते, 
दाेन हिताच्या गोष्टी, 
सुविचार वाटत फिरते

माझ्या मनातली कविता,
जाणत्या वाचकांसाठी, 
दररोज लागते तिला आस, 
आतुर हाेते ती भेटीसाठी

© दीपक अहिरे, नाशिक

जन्म मानवाचा... (Born human)

जन्म मानवाचा...
Born human


Born human


जन्म मानवाचा अल्पसा मिळताे, 
राग,लाेभ, स्नेहाने देह असा उरताे... 

जन्म मानवाचा अळवावरचे पाणी, 
किती हा हव्यास फेकतात सुटी नाणी... 

जन्म मानवाचा सार्थकी लागावा, 
देह जरी गेला आत्मा शुद्ध असावा... 

जन्म मानवाचा पैलतीर गाठावे, 
सातजन्माचे पुण्य पदरी हे उरावे... 

© दीपक अहिरे, नाशिक

प्रत्येक ओळ (Each line)

प्रत्येक ओळ...
Each line 


Each line


प्रत्येक ओळ सत्य नी खरी, 
जगलाे मी पंढरीचा वारकरी... 

प्रत्येक ओळ वास्तव दाखला, 
जगण्याचा मी नाही केला गफला... 

प्रत्येक ओळ मनाला भिडणारी, 
परस्पर सदृश्य मन जागवणारी... 

प्रत्येक ओळ जपली मी ह्दयात, 
आयुष्याचे पुस्तक गाजतंय विश्वात... 

© दीपक अहिरे,नाशिक

देशाची शान- भारतीय संविधान ( Pride of the country- Indian Constitution)

देशाची शान- भारतीय संविधान... 

Pride of the country-Indian Constitution


Indian constitution


देशाची शान 

भारतीय संविधान,

समस्त भारतीयांचा

आहे ताे अभिमान...


देशाची शान

राज्यघटनेचा स्वीकार,

कारभाराच्या तरतुदीचे

पडतात येथे हुंकार...


देशाची शान 

आहे सर्वोच्च कायदा, 

पायाभूत संविधानाने

    शासनव्यवस्थेचा वादा...   

देशाची शान

भारतीय संविधान,

जगात उंचावली

 या संविधानाने मान...


© दीपक अहिरे,नाशिक


एक चूक (one mistake)

एक चूक...
One mistake


One mistake

एक चूक करते मानवास उध्वस्त,
राहावे आपण याबाबतीत आश्वस्त...

एक चूक मनुष्य चुकांचा पुतळा,
पुन्हा चूक करू नये हा नियम सदाेदित पाळा...

एक चूक पडते काही वेळा महागास,
ओढवते संभाव्य दुर्घटना कारण असते ते विनाश...

एक चूक जीवनभराचा संघर्ष,
साेयीस्कर विसरलात आपण अवतीभवतीचे आदर्श...


© दीपक अहिरे,नाशिक

सुखाची कल्पना (The idea of happiness)

    सुखाची कल्पना    
The idea of happiness


The idea of happiness

सुखाची कल्पना
नित्य नभी वसते,
आभाळ साक्षी
भावना पाेहचवते...

सुखाची कल्पना
आनंदाचे नभांगण, 
धरतीवर अवतरले
सुखाचे तारांगण... 

सुखाची कल्पना
निसर्ग शहराला, 
राेमाराेमात आनंद
चैतन्याने भारला... 

सुखाची कल्पना
वातावरणात जाेश, 
सुखाच्या कल्पनेने
मी नुकताच बेहाेष... 

© दीपक अहिरे, नाशिक

आज जरी वेगळे (Today is different)

आज जरी वेगळे...
Today is different

Today is different


आज जरी वेगळे,
दिसत असू आपण, 
दाता दयावान कृपाळू,
आहे आपले माेठेपण... 

आज जरी वेगळे,
जपू एकरूपता, 
शालीन कुल आपले,
आठवू कुलदेवता... 

आज जरी वेगळे,
शरीराने आपण, 
जपू एकमेकांचे, 
अंतर्बाह्य प्रगट मन... 

आज जरी वेगळे,
सांधू मैत्रीचा पूल, 
जाणून परस्परांना,
सहकार्याची चाहूल... 

© दीपक अहिरे, नाशिक

मी तुझी सावली ( I am your shadow)

मी तुझी सावली...
I am your shadow

I am your shadow


मी तुझी सावली,
तू माझी गुरुमाऊली
हाक तू ऐकली,
हाकेला तू धावली

मी तुझी सावली,
नवसाला तू पावली
तू पावलाेपावली,
दावतेस सावली

मी तुझी सावली,
तू माझा वटवृक्ष
तुझ्याच दृष्टीचा,
मी बाळगला अक्ष

मी तुझी सावली,
देतेस मला अभय
तुझ्याविना मी,
कसा राहू निर्भय

© दीपक अहिरे,नाशिक

वेदना मनातल्या ( pain in mind)

वेदना मनातल्या...
Pain in mind 

Pain in my mind


वेदना मनातल्या,
का जिरवाव्या आपण
कसा निचरा हाेईल,
कसं माेकळं हाेईल मन

वेदना मनातल्या,
उगीच का साठवाव्या
बाेलून माेकळं हाेवू,
कशा त्या साेडवाव्या

वेदना मनातल्या,
राईचा पर्वत नसावा
सहकार्याने त्यासाठी,
एकमेकाचा हात धरावा

वेदना मनातल्या,
आंतरीक संवाद व्हावा
आपल्या वेदना समजून 
दुसऱ्याच्या वेदना समजाव्या

© दीपक अहिरे,नाशिक

शुन्यातून विश्व उभारू या ( Let's build a world from scratch)

शुन्यातून विश्व उभारू या...
 Let's build a world from scratch

Let's build a world from scratch

झाले गेले गंगेला मिळाले
पाप पुण्य सारे विसरू या, 
शुन्यातून विश्व उभारू या... 

नाही गाठी पैसा अडका
उमेद मनातली जागवू या, 
शुन्यातून विश्व उभारू या... 

जरीही नसली बॅंकेत पत
खत देवून शेती फुलवू या, 
शुन्यातून विश्व उभारू या... 

जरी नसले कुठले भांडवल
संभाषण आपले सुधरू या, 
शुन्यातून विश्व उभारू या... 

जरी परीस्थितीने आहे शून्य
धीराने यावर मात करू या, 
शुन्यातून विश्व उभारू या... 

© दीपक अहिरे,नाशिक

कुठे चुकताे माणूस... (wrong man)

कुठे चुकताे माणूस...
wrong man

Wrong man

कुठे चुकताे माणूस 
घेत नाही ध्यानात, 
स्वार्थाचाच विचार 
कायम त्याच्या मनात... 

कुठे चुकताे माणूस 
नाही सहकार्याचा हात, 
संधी साधून माणूस 
करताे आपल्यांचा घात... 

कुठे चुकताे माणूस 
अपेक्षा त्याच्या अवास्तव, 
नेहमीच आपला चाैकाेन
समजत नाही वास्तव... 

कुठे चुकताे माणूस 
सतत घालताे घाव, 
समाेरच्याचे ऐकत नाही
त्याच्या लेखी नसताे वाव... 

© दीपक अहिरे,नाशिक

आस्वाद जगण्याचा.. (Enjoy living)

आस्वाद जगण्याचा...
Enjoy living 

Enjoy living

आस्वाद जगण्याचा घ्यावा भरपूर, 
नसावी आयुष्यात अनावश्यक कुरकुर... 

आस्वाद जगण्याचा जगा आणि जगू द्या, 
आयुष्यात अंथराव्या आनंदाच्या गाद्या... 

आस्वाद जगण्याचा दृष्टीकाेनावर अवलंबून, 
कशाला जगायचे मारून नी मुटकून...

आस्वाद जगण्याचा वेळेनुसार घ्यावा, 
नित्यनेमाने करावा परमेश्वराचा धावा.... 

© दीपक अहिरे, नाशिक

देवाघरची फुले (Flowers of the God)

देवाघरची फुले  
Flowers of the God

Flowers of the God


देवाघरची फुले 
असतात लहान मुले,
त्यांच्यासाठी तुमचं 
अंगण करा हे खुले...

देवाघरची फुले
खुडू नका त्यांना, 
अफाट सामर्थ्य 
त्यांच्यात आहे ना... 

देवाघरची फुले 
जाणा बाळलिला,
राखा आरोग्य
       हाच कुटुंबकबिला...          
देवाघरची फुले
देतीलच सुगंध, 
विकसित हाेईल
स्वमनाचा आनंद... 

© दीपक अहिरे, नाशिक












उन्हातलं झाड (A tree in the sun)

उन्हातलं झाड
A tree in the sun


A tree in the sun


उन्हातलं झाड 
हिरवंगार दिसतं, 
पाणी नाही त्याला 
   कुठून पाणी मिळवतं... 

उन्हातलं झाड 
सुकलं नाही अजून, 
दिसलं जरी वाळलेलं 
ठेवलं त्याने खत धरून... 

उन्हातलं झाड 
मिळवतं ड जीवनसत्त्व, 
उन्हातल्या झाडाने 
जीवंत ठेवलं ममत्व... 

उन्हातलं झाड देते 
प्रत्येकाला सावली, 
प्रत्येक झाड झालं
माझ्यासाठी माऊली... 

© दीपक अहिरे, नाशिक

नाते नवीन जुळतांना (When the relationship is new)

नाते नवीन जुळतांना
When the relationship is new




नाते नवीन जुळतांना 
घ्यावी खबरदारी, 
प्रथमतः ओलांडावी 
विश्वासाची पायरी... 

नाते नवीन जुळतांना 
घ्यावे एकमेकांना समजून, 
नात्यात नसावी अपेक्षा 
नसावी उपेक्षा वरून... 

नाते नवीन जुळतांना 
असावेच माेजके बाेलणे, 
अवास्तव भाऊगर्दीत 
आपलेच हरवून जाणे... 

नाते नवीन जुळतांना 
मने व्हावीत एकरूप, 
तेव्हाच कळेल आपले 
वास्तविक स्वरूप... 

© दीपक अहिरे, नाशिक

सुटत जाते... (Escapes)

सुटत जाते...
Escapes

Escape

सुटत जाते, 
काही वेळा समाजभान, 
त्यामुळे घडते अवचित,
वाजत नाही मंगलगान... 

सुटत जाते, 
काही वेळा मनाचा ताेल, 
किती बाळगावी शांतता,
करत नाही कामाचे माेल... 

सुटत जाते, 
आपल्या सहकार्याचा हात, 
कसा काय माणूससुध्दा, 
रंग बदलून टाकताे कात... 

सुटत जाते, 
हळूहळू प्रश्नांचा गुंता, 
करताे आता प्रयत्न, 
दिव्याला दिवा पेटवता... 

© दीपक अहिरे, नाशिक

कल्पनांची स्वप्ननगरी... (A dream city of imagination)

कल्पनांची स्वप्ननगरी...
A dream city of imagination

A Dream City of imagination


कल्पनांची स्वप्ननगरी,
फेरफटका मारताे, 
विविध कल्पनेला 
वाव येथे मिळताे... 

कल्पनांची स्वप्ननगरी,
नानाविध कल्पना,
द्या त्याला याेग्यवेळी
मनःपूर्वक चालना... 

कल्पनांची स्वप्ननगरी,
कल्पना करत बसताे,
जागेपणी डाेळसपणे 
त्या अमलात आणताे... 

कल्पनांची स्वप्ननगरी,
पाहावी प्रत्येकाने, 
कल्पनाविश्वात रमून 
समृद्ध करावे जगणे... 

© दीपक अहिरे, नाशिक

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...