नाते नवीन जुळतांनाWhen the relationship is new
नाते नवीन जुळतांना
घ्यावी खबरदारी,
प्रथमतः ओलांडावी
विश्वासाची पायरी...
नाते नवीन जुळतांना
घ्यावे एकमेकांना समजून,
नात्यात नसावी अपेक्षा
नसावी उपेक्षा वरून...
नाते नवीन जुळतांना
असावेच माेजके बाेलणे,
अवास्तव भाऊगर्दीत
आपलेच हरवून जाणे...
नाते नवीन जुळतांना
मने व्हावीत एकरूप,
तेव्हाच कळेल आपले
वास्तविक स्वरूप...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा