केव्हातरी पहाटे...
Sometime in the morning
केव्हातरी पहाटे
सूर्य उगवत हाेता,
त्याच्या नशीबी
ताे दिसत नव्हता...
केव्हातरी पहाटे
चिमणीचा चिवचिवाट,
राेजच्या जीवनात ऐकू येत
नव्हता कलकलाट...
केव्हातरी पहाटे
पडते गुलाबी थंडी,
राेजच्या दिनक्रमात
विसरताे ही हुडहुडी...
केव्हातरी पहाटे
पडत जाताे पाऊस,
बाहेर ताे निघताच
वाजवताे नकाराची कूस...
© दीपक अहिरे,नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा