कुंभमेळा 2027 बोधचिन्ह स्पर्धा जाहीर; प्रथम पारितोषिक 3 लाखKumbh Mela 2027 emblem competition announced; First prize of Rs 3 lakh
नाशिक | त्र्यंबकेश्वर : भारतातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक उत्सवांपैकी एक असलेला सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे कुंभमेळ्याचे अधिकृत बोधचिन्ह (Logo) डिझाइन स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सहभागींसाठी 20 डिसेंबर 2025 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे.
विभागीय आयुक्त व प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी देशभरातील नागरिकांना, विद्यार्थी, डिझाइनर्स व कलाकारांना मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पुरस्कार रक्कम
स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत :
-
प्रथम क्रमांक – ₹3,00,000 + प्रमाणपत्र
-
द्वितीय क्रमांक – ₹2,00,000 + प्रमाणपत्र
-
तृतीय क्रमांक – ₹1,00,000 + प्रमाणपत्र
कुंभमेळा 2027 : श्रद्धा, पावित्र्य आणि परंपरेचे प्रतीक
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो आणि जगातील सर्वांत मोठ्या आध्यात्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिकचे घाट, रामायणातील ऐतिहासिक स्थळे—हे सर्व कुंभमेळ्याच्या आध्यात्मिकतेला अधिक भव्य रूप देतात.
नवीन बोधचिन्ह हे :
-
परंपरा आणि आधुनिक सौंदर्यशास्त्रांचा संगम
-
श्रद्धा, एकता आणि अध्यात्माचे प्रतीक
-
नाशिक–त्र्यंबकेश्वरच्या संस्कृती, वारसा आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करणारे
-
जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करणारे असणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी आवश्यक अटी व निकष
✔ A1 आकाराचे पोस्टर – स्पर्धेतील लेआउटनुसार
✔ कमाल 5 MB (PDF) फाइल
✔ रंगीत आणि कृष्णधवल दोन्ही प्रतिमा
✔ 150 शब्दांची संकल्पना टिपणी
✔ स्वाक्षरी केलेल्या अटी व शर्तींची PDF (1 MB)
✔ फाइलमध्ये नाव, संस्था किंवा ओळख दर्शवणारी माहिती नसावी
✔ प्रत्येक सहभागी फक्त 1 प्रवेशिका पाठवू शकतो
✔ वय किमान 12 वर्षे
✔ गट प्रवेशिका असल्यास – एक प्रमुख प्रतिनिधी निवडावा
✔ बोधचिन्हासाठी रंग पॅलेट, टाइपफेस, व्हिज्युअल घटक, आणि त्याचे खालील माध्यमांवरील वापर दाखवणे आवश्यक:
-
ब्रँडिंग
-
साइनेंज
-
स्ट्रीट फर्निचर
-
स्टेशनरी
-
पासेस
-
झेंडे
-
व्यापारी साहित्य (Merchandise)
या निकषांचे पालन न करणाऱ्या नोंदी अपात्र ठरवल्या जातील.
प्रवेशिका कुठे पाठवायच्या?
सर्व तपशील आणि मार्गदर्शक सूचना येथे उपलब्ध :
👉 www.mygov.in
👉 ई-मेल : ntkmalogocompetition@gmail.com
कुंभमेळा 2027 साठी ‘स्मरणीय दृश्य ओळख’ निर्माण करण्याची संधी
ही स्पर्धा केवळ लोगो डिझाइनपुरती मर्यादित नसून, नाशिक–त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक वारशाची, सांस्कृतिक भव्यतेची आणि 21व्या शतकातील आधुनिक दृष्टिकोनाची एक कालातीत दृश्य ओळख निर्माण करण्याची संधी आहे. देशभरातील विद्यार्थी, कलाकार, व्यावसायिक डिझायनर्स आणि नवकल्पनाशील व्यक्तींसाठी ही एक मोठी सर्जनशील व्यासपीठ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा