मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड Orchard cultivation using the Miyawaki method
जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आधुनिक विज्ञान, पारंपरिक बागायती ज्ञान आणि जपानी "झेन" तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये दिली आहे.
डॉ. अकीरा मियावाकी हे एक जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ होते. त्यांनी मियावाकी पद्धत (Miyawaki Method) विकसित केली – ही एक वेगाने उगम पावणारी, जैवविविधतेने परिपूर्ण वननिर्मिती पद्धत आहे. आता ही पद्धत फळझाडांच्या लागवडीसाठी सुद्धा वापरली जात आहे.
लागवडीचे जपानी झेन तत्त्वज्ञान
झेन म्हणजे शुद्धता, शांतता आणि निसर्गाशी सुसंवाद. आंब्याची लागवड करताना झेन तत्वांनुसार प्रत्येक झाड हा एक सजीव आत्मा आहे. वाढीचा नैसर्गिक प्रवाह अडवू नये.स्थानिक हवामानाशी सुसंगत झाडांची निवड करावी. प्रत्येक झाडाचे एक विशिष्ट स्थान, दिशा आणि अंतर ठरवले जाते.
मियावाकी पद्धतीत आंबा लागवडीचे टप्पे
मातीचा परिपूर्ण अभ्यास करावा. माती परीक्षण करून सेंद्रिय खतांची गरज ओळखावी.
स्थानिक जातींची निवड करावी केसर, तोतापुरी, हापूस, लंगडा अशा स्थानिक आंब्याच्या जातींची लागवड करावी.
या पद्धतीत ३ ते ५ झाडे प्रति स्क्वेअर मीटर लागवड करावी. ही अतिघन लागवड असते.
मियावाकी पद्धतीत फळबाग रोपांची निवड करायची म्हटली तर यात मुख्य गटात हापूस, तोतापुरी, लंगडा, केसर आंबा लावावेत. मध्यम गटात पेरू, सीताफळ, बोर तर झुडूपवर्गीय गटात आवळा, करवंद, लिंबू तर भुईवरील गटात गवती चहा, तुळस, हळद, अळू लावता येईल. लागवडीसाठी शक्यतो स्थानिक जातींची निवड करावी
मियावाकी फळबाग लागवड लेआउट डिझाईन
▪ जागा: १०० वर्ग मीटर (उदाहरणार्थ)
▪ झाडांची रचना: प्रति १ वर्ग मीटर ३/५ रोपे
यासाठी पातळीप्रमाणे पुढीलप्रमाणे गट करावेत. यात
मुख्य फळझाडे: आंबा, चिकू, जांभूळ
मध्यम उंचीची झाडे: सीताफळ, पेरू, बोर
झुडूप झाडे: लिंबू, आवळा, करवंद
भुईवरील झाडे/औषधी: तुळस, गवती चहा, हळद, अळू
झाडे एकमेकांजवळ पण संमिश्र लावली जातात याने जैवविविधता वाढते व मातीची पकड मजबूत होते.
झेन आंबा लागवड व वैशिष्ट्ये :
झेन आंबा हा वर्षातून दोन-तीन वेळा येणारा केशर आंब्यासारखा दिसणारा आहे. खाण्यासाठी हापूस आंब्यासारखा अतिशय गोड आहे. २०० ग्रॅम ते ५०० ग्रॅम इतका मोठा होणारा वर्षभर आंबे देणारा हे वाण आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी असलेला हा आंबा असून अति घनदाट पद्धतीने लागवड करता येतो. ३० ते ४० वर्ष पीक देणारा बहुवार्षिक असलेला हे आंबा वाण आहे. यात मिश्र फळपीक घेता येते.
सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न घेता येईल. यात नॅनो / जापनीज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला असून आपल्या हवामानात चांगले उत्पादनक्षमता असलेला हा आंबा आहे. शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न कमवून देणारी झेन आंब्याची शेती आहे. बोन्साय पद्धतीने वाढ होत असून लागवडीपासून पहिल्याच वर्षात उत्पादन मिळते. वर्षभरात कधीही लागवड करता येणारा हे वाण आहे.
मियावाकी पद्धतीत दिले जाणारे सेंद्रिय खत
फळबाग लागवडीआधी शेणखत १० टन प्रति एकरी द्यावे. यासाठी कंपोस्ट, ह्यूमस द्यावे. दर महिन्याला गोमूत्र-गव्हाच्या भूशासह मिश्रण द्यावे. तीन महिन्यांनी व्हर्मीकम्पोस्ट + नीम खत द्यावे. दर सहा महिन्यांनी बोन मील, अॅझोस्पिरिलम, फॉस्फोबॅक्टेरिया द्यावे.
सेंद्रिय घटकांचा वापर करावा. कोकोपीट, गोमूत्र, शेणखत, कंपोस्ट यांचा समावेश करणे गरजेचे ठरते.
तणासाठी मल्चिंग व नियमित पाणी व्यवस्थापन करावे. पहिल्या 2 वर्षांत नियमित निगा ठेवावी. पुढे झाड आपोआप वाढते.
कामाचे शेड्यूल
फळबागेला दररोज ठिबक सिंचन किंवा बगिच्याप्रमाणे पाणी द्यावे.
आठवड्यातून एकदा झाडांची वाढ व कीडनियंत्रण तपासणी करावी. दर महिन्याला मल्चिंग तपासणे व नवीन खत द्यावे.
तीन महिन्यांनी वाढ मोजमाप व गरजेनुसार आंतरपुनर्लागवड करावी.
झेन आंबा लागवडीचे उत्पादन :
झेन आंब्याची १२ X ३ फुटावर लागवड केली तर १२१० झाडे प्रती एकर बसतात. याचे उत्पादन प्रती झाड २० किग्र. X १२१० = २४२०० कि.ग्र. प्रती एकर उत्पन्न किमान दर ५० रु./किग्र प्रमाणे १२ लाख १० हजार रु. प्रती एकर उत्पन्न मिळते. जर १०० रु. प्रति किलो पकडला तरी २४ लाख २० हजार रु. प्रती एकर उत्पन्न मिळते.
मियावाकी पद्धतीचे फायदे:
मियावाकी पद्धतीत जलद वाढ होत असून पारंपरिक लागवडीपेक्षा तीन पट झपाट्याने वाढ होते.
या पद्धतीत उत्पन्न लवकर मिळत असून २-३ वर्षात फळधारणा होते.
या पद्धतीत नैसर्गिक कीड नियंत्रण होत असल्याने रोग व किडी नियंत्रण खर्च फारसा नाही
या पद्धतीत जैवविविधता वाढते.आणि कमी पाण्यात ही शेती करता येते.
झेन + मियावाकी + आंबा = एक नैसर्गिक समाधानी वन पद्धत आहे. ही पद्धत केवळ उत्पन्नासाठी नसून पर्यावरण पूरक, शाश्वत व मानसिक समाधान देणारी आहे.
झेन तत्त्वधारेनुसार फळबागाचे उत्पादन घेण्यासाठी शांती आणि संयम ठेवणे गरजेचे ठरते. या पद्धतीत निसर्गाच्या गतीला सन्मान द्या.प्रत्येक झाडाशी आत्मीयता ठेवा म्हणजे अपेक्षित उत्पादन मिळतेच यात शंका नाही.
अधिक माहितीसाठी श्री साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती, सत्यशोधक हॉर्टिकल्चर ऑरगॅनिक डेव्हलपमेंट हब लि., श्री. मकरंद पवार info@shodhorganicfarming.com यावर संपर्क करावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment