name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी रस्ते वाहतूक अनुदान योजना (Road Transport Subsidy Scheme for Inter-State Agricultural Trade)

आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी रस्ते वाहतूक अनुदान योजना (Road Transport Subsidy Scheme for Inter-State Agricultural Trade)

आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी 
रस्ते वाहतूक अनुदान योजना
Road Transport Subsidy Scheme for Inter-State Agricultural Trade

Antarrajya shetmal vyaparasathi raste vahatuk anudan yojna

    महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत महाराष्ट्रातून शेतमालाच्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. 

  राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था यांना वाहतूक खर्चावर ५०% अनुदान मिळणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

  फळे-भाजीपाला नाशवंत असल्याने अनेक वेळा अयोग्य हाताळणीमुळे तसेच वाहतूकीदरम्यान होणा-या विलंबामुळे सुमारे २०ते ३० टक्के शेतमालाचे नुकसान होते. महाराष्ट्रातील फळे व भाजीपाल्याचे उत्पादन पाहता, निर्यातीबरोबरच देशांतर्गत व्यापारही महत्त्वाचा असल्याने राज्यात उत्पादित शेतमालास परराज्यात बाजारपेठ मिळवून थेट व्यापारास चालना देणे आवश्यक आहे. 



    सदर योजना आंबा, केळी, डाळींब, द्राक्षे, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले व भाजीपाला या नाशवंत पिकांसाठीच लागू राहील. तसेच यामध्ये नमूद नसलेला नाशवंत शेतमाल परराज्यात विक्री करावयाचा झाल्यास लाभार्थी संस्था किंवा कंपनीने तसा स्पष्ट उल्लेख करून पणन मंडळाची पुर्वमान्यता घेणे आवश्यक राहील.

    सदर योजनेमध्ये रस्तेमार्गे प्रत्यक्ष वाहतूक होणा-या शेतमालावर अनुदान देय राहील. यामध्ये इतर कोणत्याही अनुषंगिक खर्चाचा अंतर्भाव असणार नाही तसेच शेतमाल प्रत्यक्ष विक्री झालेनंतरच अनुदान देय राहील. 

   अंतरानुसार देय अनुदान असून यात ३५० ते ७५० किमी: ५०% किंवा ₹२०,०००,

७५१ ते १००० किमी: ५०% किंवा ₹३०,००० 

१००१ ते १५०० किमी: ५०% किंवा ₹४०,०००

१५०१ ते २००० किमी : ५०% किंवा ₹४०,०००

२००१ किमी आणि त्याहून अधिकः ५०% किंवा ₹६०,०००

 सिक्कीम, आसाम, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा: ५०% किंवा ₹७५,०००एवढे अनुदान देय राहील. 

   ३५० कि.मी. पेक्षा कमी अंतरावर अनुदान नाही. एका संस्थेला वर्षाला ₹३ लाखांपर्यंत अनुदान मर्यादा असेल. वाहतूक भाडे केवळ बँक व्यवहारातून अदा करणे बंधनकारक असेल. किमान ३ सभासदांचा माल एका ट्रिपमध्ये पाठवणे आवश्यक असून शेतमाल विक्री न झाल्यास अनुदान नाही.

   संबंधीत शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी संस्था यांनी या योजनेअंतर्गत परराज्यात पाठविण्यात आलेल्या वाहतूक खर्चाचे अनुदान मागणी प्रस्ताव शेतमाल विक्रीनंतर ३० दिवसांत आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत.

   या योजनेच्या पूर्वमान्यता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज, नोंदणी प्रमाणपत्र, सभासद यादी, ७/१२ उतारे, बँक पासबुक प्रत, लेखापरिक्षण अहवाल द्यावा लागतो. अनुदान मागणी अर्जासाठी पूर्वमान्यता पत्र, ट्रान्सपोर्ट बिल व पावती, विक्री बिल, बँक व्यवहाराचा तपशील द्यावा लागतो. 

   या योजनेच्या अधिक माहितीसाठी नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर जिल्ह्यासाठी  उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पंचवटी, मार्केटयार्ड, दिंडोरी नाका, नाशिक येथे संपर्क साधावा 

   नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोदिया, चंद्रपूर जिल्ह्यासाठी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, नविन कॉटन मार्केटयार्ड, एस.टी. स्टॅण्डसमोर, गणेशपेठ, नागपूर येथे संपर्क साधावा 

   लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यासाठी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, आंबा व डाळिंब सुविधा केंद्र, प्लॉट न डी-१/१ एम.आय.डी.सी. वखार मंडळाचे गोदाम समोर, बार्शीरोड, लातूर येथे संपर्क साधावा. 

  अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यासाठी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, जुने कॉटन मार्केट यार्ड, अमरावती येथे संपर्क साधावा 

   रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड जिल्ह्यासाठी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी येथे संपर्क साधावा 

   औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यासाठी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, प्लॉटनं. ५/८, पिसादेवीरोड, नवामोंढा, वखार महामंडळ गोदामाजवळ, जाधववाडी, औरंगाबाद येथे संपर्क साधावा 

   पुणे, सोलापूर जिल्ह्यासाठी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, व्दारा-महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ कार्यालय, मार्केटयार्ड, पुणे येथे संपर्क साधावा 

   सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, बाजार समिती मल्टीपर्पज हॉल इमारत, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...