शाश्वत पीक उत्पादनासाठी सेंद्रिय शेतीची गरज — अहिरे यांचे मार्गदर्शन
Organic Farming for Sustainable Crop Production: Ahire
शाश्वत पीक उत्पादनासाठी सेंद्रिय शेतीची गरज — अहिरे यांचे मार्गदर्शन
Organic Farming for Sustainable Crop Production: Ahire
नाशिक : शाश्वत शेती उत्पादन आणि निरोगी मनुष्य जीवनासाठी सेंद्रिय शेतीची गरज असून, त्यासाठी टॉप लाईफ अॅग्रोची सेंद्रिय शेतीवरील शृंखला शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहे असे प्रतिपादन येथील कृषीपत्रकार दीपक अहिरे यांनी केले.
जळगाव येथे झालेल्या टॉप लाईफ कंपनीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यासाठी टीएल अँग्रोचे सीईओ नितीन टिलेकर, सांगली येथील कृषी विजय काढापुरे टी. एल. कंपनीचे सभासद विलास ढोमसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रासायनिक शेतीच्या रासायनिक शेतीच्या दुष्परिणामाविषयी सांगताना अहिरे यांनी सांगितले की, रासायनिक खते, पाणी, मशागती, संकरीत बियाणे व रासायनिक कीटकनाशकांवर आज मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. यामुळे उत्पादन आणि खर्चाचा विचार केला, तर विक्रमी उत्पादन घेऊनही निव्वळ नफा खूपच कमी प्रमाणात राहतो त्यामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. त्यासाठी सेंद्रिय खते व औषधांकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
परदेशात सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेल्या मालासाठी स्वतंत्र बाजारपेठा तयार झालेल्या आहेत. आपल्या देशातही अशा स्वतंत्र बाजारपेठा निर्माण झाल्यास सेंद्रिय शेतीला वेग येईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी टॉप लाईफ कंपनीच्या सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक निविष्ठांचे अनावरण येथील प्रगतशील शेतक-यांकडून करण्यात आले. सुभाष नांदे यांनी प्रास्ताविक केले. रविकिरण चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जळगाव जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातून बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा