"कृषिगाथा" काव्यरूपात शेतीविषयक मार्गदर्शन Agricultural Guidance in Poetry : "krushigatha"
नाशिकच्या दीपयोग प्रकाशनाने कृषीतज्ज्ञ श्रीधर भोनाजी ढाके यांचा कृषि गाथा हा ओवी-अभंगाच्या लोक छंदातून शास्त्रीय कृषी ज्ञान देणारा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
श्रीधर ढाके हे राज्य शासनाच्या कृषी विभागातून उपसंचालक पदावरून निवृत्त झाले. निवृत्ती नंतरही शेती आणि शेतकरी बांधवांविषयी असलेली आत्मीयता म्हणून त्यांनी कृषि गाथा हा काव्यमय ओवी प्रबंध लिहिला आहे. आधुनिक ज्ञान- विज्ञानाच्या काळात प्रगत पद्धतीने शेती कशी करावयाची याचा मूलमंत्र या काव्यसंग्रहातून सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न ढाके यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी बांध घालून पाणी कसे अडवावे, लागवडीपूर्वी कोणत्या प्रकारची मशागत करावी, खारवट जमिनीचा पोत कसा सुधारावा, माती परीक्षण करून खतांचा वापर करतांना कोणती काळजी घ्यावी, पिकांवर फवारणी केव्हा आणि कशी करावी, शुद्ध बियाण्यामुळे पिकांची हमी कशी मिळते यासारखे अनेक विषय कृषिगाथा मधून हाताळण्याचा प्रयत्न श्रीधर ढाके यांनी केला आहे.
बांध बंधिस्तीमुळे उतारावरील जमिनीची धूप थांबते. शेळ्या मेंढ्यांचे खत वाहून जात नाही. जमिनीचा कस टिकून राहतो. शेतकऱ्यांनी आपला आळस सोडावा म्हणून "ज्यांची बांधाविना शेती, वाहून जाती माणिक मोती, फत्तर लागती त्याच्या हाती" असा इशारा कृषिगाथा मधून देण्यात आला आहे.
शेणाच्या गोवऱ्या करू नका, शेणखत करा, गोबर गॅस करा आणि धनवान व्हा.! असा संदेशही एका कवितेतून देण्यात आला आहे. काव्याच्या रूपातून शास्त्रीय माहिती सोप्या शब्दात देण्याचं ढाके यांचे कसब या काव्यसंग्रहातून दिसून येतं.
सर्वसामान्य शेतकऱ्याला कृषीविषयक आधुनिक ज्ञान त्यांच्या भाषेत मिळत नाही. मात्र श्री. ढाके यांनी आपल्या काव्यसंग्रहातून ही अडचण दूर केली आहे. कृषिगाथाची किंमत ४० रुपये असून प्रत्येक शेतकऱ्याने हा काव्यसंग्रह जरूर चाळावा असाच आहे. या पुस्तकाला बळीराजा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment