पुस्तक परिचय Introduction to the book सर्वतीर्थ Sarvatirtha
'सर्वतीर्थ' हे पुस्तक नाशिक येथील हं.प्रा.ठा. महाविद्यालय व नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाचे प्रदीर्घ नोकरीतून सेवानिवृत्त झालेले श्री. संभाजीराव दौलतराव निंबाळकर यांनी लिहिले आहे.
धार्मिक विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असतांना सुद्धा हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता का आहे याचे कारण सोप्या पध्दतीने किंवा कमी खर्चाने किंवा खर्च न करता, वेळ न दवडता परमेश्वराची अनुकूलता, परमेश्वराची कृपा प्राप्त करू शकतो. असे लेखक श्री. निंबाळकर यांना वाटते. ज्यांना पैसा व वेळेअभावी तीर्थयात्रा करणे शक्य नाही त्यांच्यासाठी या पुस्तकात कमी खर्चात, कमी वेळेत किंवा खर्च न करता पर्याय दिले आहे. स्वतः लेखक श्री. निंबाळकर यांनी ही माहिती दक्षिण व उत्तर भारतातील व महाराष्ट्रातील तीर्थयात्रेतून मिळविलेली आहे.
'सर्वतीर्थ' या पुस्तकात 'मोक्षदायी' गणेशांची बारा नांवे, पृथ्वीतलावावरील 'गंगा' गोदावरी आणि 'तीर्थ' महात्म्य, गरिबांसाठी श्राध्दविधी, अस्थिविलयतीर्थ, येथे देवांची वस्ती, पितरांना स्वर्गवास व मोक्ष देणारे श्रीराम (कुंड) तीर्थ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महात्म्य - त्यासी नाही यमपुरी, श्रीभगवानविष्णू यांनी स्थापन केलेले 'श्रीकपालेश्वर मंदिर, ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ शिवलिंग 'तिळभांडेश्वर मंदिर, सर्वग्रहांवर सत्ता चालविणारे दहामुखी 'रुदाक्ष, चारी वेदांचे सार 'ॐ', लाख पिढ्यांचा उध्दार करणारी मोक्षदायीनी 'काशी', पृथ्वी प्रदक्षिणा, शिवलिंगात श्रेष्ठ नर्मदा शिवलिंग, ब्रह्महत्येचे पातक नाहिसे करणारी 'नर्मदा मैय्या', कोटीकन्यादानाचे फळ देणारा 'सूर्याचा महिमा, कोटी कल्पापर्यंत 'स्वर्ग' देणारी मैं तुलसी तेरी अंगण की, आवळ्याचे फळ, देई पुण्याचे फळं !, 'घंटानादाचे' आकाशाएवढे महत्त्व, पांचाळेश्वर येथील 'मुक्ती' देणारे आत्मतीर्थ, कोटी कोटी पापापासून मुक्त करणारा 'शिवनामाचा महिमा', आत्मज्ञान या विषयावरील माहितीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
याबरोबरच सर्वतीर्थ पुस्तकात जणु ३३ कोटी देवतांची इंद्रपरीच 'उज्जैनी','गोवर्धन महात्म्य', श्रीकृष्णजन्मभूमी - मोक्षनगरी - मथुरा, 'राजेनिंबाळकर यांनी स्थापन केलेले श्रीकमलादेवी मंदिर', पुनर्जन्मी नाही - श्रीक्षेत्र तुळजापूर, सर्वतीर्थांचे पुण्यफळ देणारी शरयुनदी - अयोध्या, नंदीग्रामचा महिमा वर्णावा किती !, मोक्ष प्राप्तीसाठी केवळ 'हरेकृष्ण' मंत्र, चारी मुक्ती देणारी श्रीकृष्णाची 'मथुरा', संपूर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ 'श्रीमद्भगवत्गीता', संत एकनाथ भग्वतगीते बद्दल काय म्हणतात ?, कलीयुगातील समस्या, दोष नष्ट करणारा 'श्रीभागवत ग्रंथ', आयुष्याचे सोने करणारे तिरुपती बालाजी, कर्मकांडाची गरज नाही, घरातल्या घरात 'श्रीयंत्र' दर्शनाचा महिमा, घरपण देणारे 'आदर्श देवघर', मी कुरुक्षेत्री जाईन ! भगवद्गीता गाईन !!, मृत्युपुर्वी आपल्याकडे किती वेळ आहे ?, जेवतांना श्रीकृष्णांचे चिंतन केल्यास परमेश्वराची प्राप्ती, आयुष्यातील भांडवल अर्थात दैवी संपत्ती, तर अंतःकाळी भगवंतालाच प्राप्त होतो, हजारो यज्ञ केले तरी भक्ती नसेल तर.. व्रताची आवश्यकता नाही, पुण्याची गणना कोण करी-भू वैकुंठ पंढरपूर, आणखी काही सर्वतिर्थ, परमेश्वराला प्रार्थना या विषयावर लेखकाने माहिती संकलित करून लिहिली आहे.
या पुस्तकातील वैविध्यपूर्ण माहितीमुळे पुस्तक वाचनीय झालेले आहे. दीपयोग प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे.
सर्वतीर्थ
संकलन व लेखन : श्री. संभाजीराव दौलतराव निंबाळकर
प्रकाशक : दीपक केदू अहिरे
प्रकाशन : दीपयोग प्रकाशन, पंचवटी, नाशिक-३
पृष्ठे : ६५, किंमत : ५० रुपये
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment