ससेपालन (Rabbit farming) कृषियोगचा ससेपालन (रॅबिट) विशेषांक
कृषियोग प्रकाशनाने अनेक चांगले ट्रेंडीग विषयावर विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्याच मालिकेतील ससेपालन (रॅबिट) विशेषांक होय. या अंकात ससेपालन संकल्पना, मांसासाठी ससेपालन, ससेपालन व्यवसायाची पूर्वतयारी, ससेपालनाचे फायदे, सशाच्या विविध जाती, सशाची शारीरिक रचना, सशेपालनाची पद्धत, सश्याचा आहार व खाद्य व्यवस्थापन, सशाचे प्रजनन, व्यावसायिक प्रजनन तक्ता दिला आहे.
या अंकात सश्याच्या पिल्लांचे संगोपन, प्रमुख आजार व उपाय, ससा आजारी पडू नये म्हणून प्रतिबंधक औषधे, कृषिवृत्त, रॅबीट फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स सोसायटीचे निवेदन, उत्पादन, ससेपालन करणारे फार्मर / ब्रिडर फार्म, ससेपालनाच्या यशकथा, महिला शेतकरी सौ. सिमा शिंदे यांचे सशेपालन, एका सशेपालकाचे अनुभव, सशेपालनात अतिमहत्वाच्या सूचना, सशेपालनाचा प्रकल्प अहवाल या सर्वांगीण विषयाचा अंतर्भाव या विशेषांकात केला आहे.
आपल्या देशात लोकरीसाठी ससेपालन बऱ्याच वर्षापासून करतात. परंतु मांसासाठी ससेपालन हा एक नवीन व्यवसाय आहे. त्यासाठी घर, छत, शेड अशा लहान जागेत आयात केलेले ससेपालन करता येते. केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांत यशस्वीपणे हा व्यवसाय चालत असून महाराष्ट्रात देखील तो सहज करता येण्यासारखा आहे.
ससे हे शाकाहारी प्राणी असून ते हिरवा घास व थोडासा खुराक खाऊन त्याचे चांगल्या मांसात रुपांतर करण्याची क्षमता आहे. मांसासाठी ससेपालन छोट्या प्रमाणात परसबागेत करतात. शहरात गच्चीवरही हा व्यवसाय करता येऊ शकतो. अतिशय निर्मळ स्वच्छ, रंगीबेरंगी आणि मनमोहक ससे पाळले तर विक्रीची काळजी नाही. व्यापारासाठी स्पर्धा नाही. कोणत्याही प्रकारची शासकीय संमतीची, कागदपत्रांची आवश्यकता नाही.
सशाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. वैज्ञानिकांनी ह्या प्राण्यामधील महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. मुलाबाळांमध्ये प्रिय असलेला हा ससा दिसला व मनुष्य क्षणभर थांबला नाही हे होणे शक्य नाही. अंगावरचे केस, प्रेमळ स्वभाव, गुबगुबीत शरीरयष्टी लहान थोरांना आकर्षित करते. टुणकन उड्या मारतांना ससा बघितला की कितीही दडपण असले तरी आनंद होतो.
ससेपालन या व्यवसायापासून कोणतीही दुर्गंधी आणि ध्वनीप्रदूषण होत नाही. जादा भांडवल, गुंतवणुकीची आवश्यकता नाही. कमी जागेमध्ये कमी परिश्रमाशिवाय हा व्यवसाय करता येतो. विजेची गरज लागत नाही. कमीत कमी खाद्याबरोबर, आजाराची काळजी नसते. विशेष म्हणजे कमीत कमी कालावधीत भरपूर कमाई मिळवून देणारा हा फायदेशीर व्यवसाय आहे. प्रथिनयुक्त सश्यांचे मांस हे महत्वपूर्ण आहाराची भूमिका बजावू शकतात.
सश्याचे मटन हे अधिक प्रोटीन, चरबी कमी व कोलेस्ट्रॉल आणि सोडिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे मटन अधिक रुचकर, पाचक व आरोग्यदायक असते. ब्रीडर ससे जाळीसहित खरेदी केल्यास ब्रीडर ससे ४५ दिवसाला एकदा ६ ते ७ याप्रमाणे वर्षापर्यंत निरंतरपणे ५ ते १५ पिल्ले देतात. ब्रीडर ससा पिल्लांना ३० दिवसांपर्यंत आपले दूध पाजतो. त्यानंतर पिल्ले खाद्य खाण्यास सुरूवात करतात. पिल्ले २ ते ४ महिन्यात अंदाजे अडीच ते साडेतीन किलो वजनाचे होते. मोठे झालेल्या व मांसानीयुक्त सुदृढ सशांना रू. १०० किलो प्रमाणे भाव मिळतो.
मांसाकरिता सश्याच्या ग्रेजांईट, व्हाईट, जाईंट, सोविएत विचळ, युनीलँड व्हाईट या जाती चांगल्या आहेत. यातील वैशिष्ट्ये म्हणजे चांगली प्रजनन क्षमता, वाढीचे प्रमाण, दोन वितातील कमी अंतर, कमीत कमी गर्भकाळ, एका वर्षात अनेक पिल्ले देण्याची क्षमता, पिल्ले १२ आठवड्यात १.५ ते २.० किलोचे होऊन विक्रीस उपलब्ध करता येतात. अंदाजे ५० ब्रीडर ससे असल्यास प्रत्येक वेळी ४०० ते ५०० याप्रमाणे ८ वर्षापर्यंत पिल्ले देतात. चिकनमध्ये सशांपेक्षा ४ पटीपेक्षा अधिक चर्बी असते पण प्रथिन चिकनपेक्षा दुप्पट आहे. सशाचे मांस विश्वातच श्रेष्ठ आहे.
एक किलो चिकन मध्ये ५०-५० टक्क्यांप्रमाणे हाडे आणि मांस मिळते. पण हे प्रमाण सशांमध्ये म्हणजे ३० टक्के हाडे आणि ७० टक्के मांस मिळते. हा व्यवसाय वृक्षस्वरूपात वाढला आहे. रशिया, जपान, जर्मनी, पोर्तुगाल, आखाती राष्ट्रांमध्ये सशांच्या मांसाला अतिशय मागणी आहे. ससेपालन व्यवसाय सरळ, सोपा, लाभदायक आणि परिश्रमाविना करता येणारा आहे. सशांचे मांस खाण्यावर कोणत्याही धर्माचे बंधन नाही. सशाची - शिकार पूर्वापार केली जात आहे.
ससेपालनातून वर्षभर उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतीपूरक किंवा एका स्वतंत्र - व्यवसाय म्हणूनही ससेपालन व्यवसायाकडे - पाहता येईल. ससेपालनातून अनेक - प्रकारची उत्पादने मिळू शकतात व त्यामुळे - अनेक प्रकारे उत्पन्न मिळू शकते. उदा. थंड हवेच्या ठिकाणी लोकरीसाठी ससेपालन, - केसाळ कातडीसाठी विविध जाती विकसित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मांस - उत्पादनासाठी मोठ्या आकाराच्या जाती - उपलब्ध आहेत. ससे औषधनिर्मिती, प्रयोगशाळेत तसेच शैक्षणिक कार्यासाठी वापरतात.
मादीची वर्षाकाठी अनेकदा विण्याची क्षमता असल्यामुळे वर्षभर मांस उत्पादन होऊन सतत आर्थिक लाभ घेणे शक्य आहे. सशाचे खाद्य म्हणून स्वस्त घास, गवत तसेच पालेभाज्यांचा टाकाऊ भाग इत्यादींचा सहज वापर करता येतो. आंबोण व हिरवा चारा किंवा वाळलेला चारा या दोन्ही प्रकारच्या खाद्यावर ससे पाळता येतात. चारा नसेल तेव्हा केवळ हिरव्या चाऱ्यावर ससे पाळता येतात.
ससा आकाराने लहान व हाताळण्यास सोपा असल्यामुळे मांस उत्पादन व विक्रीच्या दृष्टिने अत्यंत सोईस्कर आहे. सशापासून विविध रंगाची केसाळ कातडी मिळते. सशाच्या मांसात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला सुरक्षित मांस असे मानले जाते. ते अधिक प्रथिने व कमी चरबीमुळे तुलनात्मकदृष्ट्या अधिक सत्वयुक्त असते. लोकर उत्पादनासाठी स्वतंत्र जाती उपलब्ध आहेत.
पिले जन्मल्यानंतर सुमारे १ महिना आईच्या दुधावरच जगतात. त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी लागणारा खर्च कमी होतो. अत्यंत कमी जागेत ससे पाळता येतात. पिले वयाच्या केवळ १०-१२ आठवड्यातच कत्तलीस तयार होतात. कत्तलीनंतर सशांपासून केसाळ कातडी मिळते त्यापासून सुंदर उपयुक्त वस्तू तयार करता येतात.
कृषियोगचा ससेपालन (रॅबिट) विशेषांक ४५ पानांचा असून किंमत २५ रुपये आहे. या अंकाचे संपादक दीपक अहिरे असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे. विशेषांक हवा असल्यास पोस्टाने पाठविण्याची सोयही आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा