संस्था परिचयOrganization Introductionग्रामीण विकासासाठी झटणारी आरतीAarti striving for rural development
पारंपरिक, वडिलोपार्जित उद्योगधंद्यांचा विकास करणे, नवीन उद्योगधंदे वाढविणे आणि नोकरीच्या सुविधा उपलब्ध करून देणे या परोपकारी तत्त्वावर 'आरती' अॅप्रोप्रिएट रुरल टेक्रॉलॉजी इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली. अशा या संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी.
आरती संस्थेची स्थापना :
भारतातील ग्रामीण भागांचा, ग्रामस्थांचा विकास करण्यासाठी, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व जीवनशैलीचा विकास करण्यासाठी मुख्यतः 'आरती' संस्थेची स्थापना झाली आहे.
ग्रामीण तंत्रज्ञानाची गुणवत्ता वाढविणे, त्याचे व्यापारीकरण करणे, लोकप्रियता वाढविणे, एकाच मापनाखाली मूल्यमापन करण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आणणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. कृषितज्ज्ञ ए.डी. कर्वे या संस्थेचे अध्यक्ष असून संस्थेचे सभासद या नात्याने यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.. ए.आर.टी.आय. ने संस्थेसाठी सक्रिय काम करणाऱ्यांची तुकडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. तंत्रज्ञानात काही बदल घडवून आणले, या दृष्टीने औद्योगिक विकास करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता :
आरतीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे. फक्त तांत्रिक ज्ञानाच्या आधारावर ग्रामस्थ उद्योगपती होऊ शकत नाही.
नवीन उत्पादन बाजारात आणून ते लोकप्रिय होईपर्यंत होणारी आर्थिक तूट (तोटा) भरून काढण्याची क्षमता ही फक्त काही संस्थांतच असते. ती गरीब शेतकऱ्यांत कशी असणार? हा धोका गरीब गावकरी पत्करू शकत नाहीत. तांत्रिक ज्ञानाबरोबर यात आर्थिक पाठबळही आवश्यक ठरते. ही कामे संघटनांच्या आधाराशिवाय कशी होणार? नवीन मार्ग अवलंबिलेले हे उद्योगधंदे करोडो, अब्जावधी रुपयांची उलाढाल करू शकतात.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन करण्यास उत्सुक असलेल्या व्यावसायिकास अर्थसाह्य करणे, त्याचे उत्पादन बाजारात आणणे ही जबाबदारी ए. आर.टी.आय. ने उचलली आहे. कोणाला तरी या तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या व्यावसायिकाची आर्थिक क्षमता सिद्ध करून दाखवावी लागते.
योजना काय आहे :
सुप्तावस्थेतील ग्रामीण उद्योगपतींना शिकविण्याचा ठोस कार्यक्रम आरतीने आखला आहे. पण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास हे सुप्त उद्योगपती धजावत नाहीत असे निदर्शनास आले आहे. म्हणून या तंत्रज्ञानावर आधारित, व्यापारी तत्त्वांवर काम करणाऱ्या गटांची स्थापना करून, उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे, तसेच या तंत्रज्ञानाचे महत्त्व, आर्थिक व्यवहार पटवून देण्याचा निर्णय ए.आर.टी.आय.ने घेतला आहे.
या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सुधारीत चुली, अत्याधुनिक रोपवाटिकेचे तंत्र विकसित करण्यासाठी आरतीने 'चॅरिटी बिगिन्स अॅट होम' या म्हणीप्रमाणे प्रथम स्वतःची रोपवाटिका स्थापन केली. यामध्ये मुळे धरलेली रोपे, कलम केलेली झाडे, लहान आकारांची फुलझाडे, औषधी वनस्पती व मौसमी पिकांची रोपे यांचा समावेश केला. एका आठवड्यात नवशिक्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले.
योजनेची अंमलबजावणी :
आरतीच्या सुविधांचा लाभ घेऊन एकदा त्यांनी नवीन उद्योगधंदा सुरू करायचे ठरवले की, त्यांना आवश्यक ते साहाय्य करण्यासाठी आरतीचा ताफा सज्ज असतो. यात सावली धरण्यासाठी जाळी, जास्त दमटपणा देणारी खोली स्वरूपातील काच घर, कठीणता टिकविण्याची खोली, वाळूचे वाफे, वाढत्या रोपांसाठी कंपोस्ट खत असलेली जमीन व पूरक प्रकाश योजना या सुविधांचा समावेश असतो.
आरतीच्या अनुभवी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली (साईटवर) जमिनीवर याची उभारणी केली जाते. या योजनेखाली अंदाजे वीस ट्रेनीजनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. पाच जण औषधी पिकांच्या उत्पादनात निष्णात जाणकार झाले असून आठ जण फक्त उसाच्या धंद्यावर आपली गुजराण करत आहेत. उरलेल्या रोपवाटिका या फक्त सुशोभीकरणासाठी लागणारी फुलझाडे, कलम केलेली फुलझाडे व इतरही वनस्पती पुरवितात, लागवड करतात. हा उद्योग मुख्यतः ग्रामीण स्त्रिया चालवितात.
या माध्यमातून ग्रामीण अशिक्षित स्त्रियासुद्धा महिना ५००० ते ६००० कमावतात. रोपवाटिकेच्या तंत्रज्ञानासाठी मुख्य पुरवठा केंद्र या एस.टी., सीएपीएआरटी तत्त्वाखाली ए.आर.टी.आय. सध्या काम करत आहे. आरतीतर्फे मदत केलेल्या अनेक संघटनांचे जाळं उत्तरेकडून दक्षिणेकडे हिमाचल प्रदेश ते केरळ असं भारतभर विखुरलेलं आहे.
काचगृहातील तांत्रिक पद्धतीचा वापर करून पीक घेणे हे काम नित्याचेच आहे. पण काचगृहातील तांत्रिक पद्धतीचा वापर करून खुल्या आकाशाखाली घेतले जाणारे पीक हे यापेक्षा दुपटीने येते हे आरतीच्या कुशल तंत्रज्ञांनी निदर्शनास आणलं आहे, कारण ही उत्पादने म्हणजे उदा. भाज्या, फळ, स्ट्रॉबेरीज, औषधी वनस्पती होत. यांचा खप होण्याकरिता ए.आर.टी.आय.ला जाहिरातबाजीचीही व बाजारपेठेचीही आवश्यकता लागणार नाही, लागत नाही. ए.आर.टी.आय. कडून प्रशिक्षण घेतलेले वीस जण या पद्धतीने पीक घेण्यात यशस्वी ठरले आहेत. ज्याद्वारे हिंदी, मराठी व इंग्रजी या भाषेद्वारे तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी आरतीने व्हिडिओ कॅसेटस उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी आरतीला साहाय्य केले.
प्रशिक्षणाची सोय :
निरनिराळ्या शाखांमध्ये सहभागी होण्यास, प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारांची मनोकामना पूर्ण करण्याकरिता आरतीने आयसीआयसीआय बँकेकडून अर्थसाह्य घेतले. ४००० चौरस फुटांच्या प्लॉटसाठी आयसीआयसीआयने ५ लाख रक्कम दान दिली आहे. आर.इ.डी.सी. अलगुवाडी, सातारा येथे ही इमारत उभी राहत आहे. २० लोकांचा समावेश होऊ शकेल असे भव्य शयनगृह, स्वयंपाकघर, जेवणाचे सभागृह व प्रशिक्षण देण्यासाठी सभागृह असे या इमारतीचे स्वरूप आहे.
यासाठी अमेरिकेतील भारतीयांनी स्थापिलेल्या 'एड इंडियाज' डेव्हलपमेंट या संस्थेकडून २००० पौंड इतकी रक्कम मंजूर झाली आहे. मुख्यतः दृकश्राव्य विभागासाठी व रंगकाम करण्यासाठी या रकमेचे पाठबळ मिळाले आहे. आरतीच्या या उद्योजकता विकास कार्यक्रमाला योग्य दिशा मिळेलच असा विश्वास वाटतो.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment