name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): डाळिंब लागवड तंत्रज्ञान व शिफारसी | Pomegranate Farming Guide in Marathi

डाळिंब लागवड तंत्रज्ञान व शिफारसी | Pomegranate Farming Guide in Marathi

डाळिंब लागवड तंत्रज्ञान व परिसंवादातील महत्वाच्या शिफारसी | 

Pomegranate Farming Guide in Marathi


dalimb lahvad tantradanyan

        डाळिंब हे कमी पाऊस, हलकी ते मध्यम जमीन आणि कोरडवाहू हवामानासाठी उत्तम समजले जाणारे फळपीक आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, नाशिक, बीड आणि उस्मानाबाद भागातील शेतकऱ्यांसाठी डाळिंब हे उच्च उत्पादन देणारे, निर्यातक्षम आणि नफा देणारे पीक ठरले आहे.

dalimb lagavad tantradnyan


        महाराष्ट्रात प्रामुख्याने गणेश, मृदुला, आरक्ता आणि भगवा या जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. वर्षातून तीन बहार येत असल्यामुळे शेतकरी आपल्या संसाधनांनुसार बहार निवडू शकतो.


    
        मात्र गेल्या काही वर्षांपासून डाळिंब बागेत मर रोग, तेलकट डाग, सुत्रकृमी व फुलगळ यांसारख्या समस्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील विठेवाडी येथे अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघवसंतदादा साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी पुढीलप्रमाणे—


डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोरील मुख्य समस्या

1. मर रोग

2. तेलकट डाग (Oily spot)

3. सुत्रकृमी (Nematodes)

4. फुलगळ (Flower drop)


१) मर रोग नियंत्रणासाठी शिफारसी

  • लागवडीचा खड्डा २५% शेणखत + २५% वाळू मिसळून भरावा.

  • रोपे नेहमी दर्जेदार, रोगमुक्त आणि खात्रीशीर रोपवाटिकेतूनच घ्यावीत.

  • फ्युजसियम नियंत्रणासाठी ०.१% कार्बेनडेझिमचे द्रावण खोडाजवळ आळ्यात ओतावे.

  • ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/झाड हे ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे.

  • बुरशी वाढीसाठी २ किलो शेणखत प्रति झाड खोडाजवळ द्यावे.


२) तेलकट डाग रोग नियंत्रण 

(Oily Spot Management)

  • योग्य अंतरावर (४.५ × ३.० मी.) लागवड करावी.

  • फक्त निरोगी गुटी कलमांची निवड करावी.

  • वाढीच्या अवस्थेत ३–४ प्रमुख खोडे ठेवून इतर धुमारे काढावेत.

  • बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

  • रोगग्रस्त पाने, फुले, खोड गोळा करून नष्ट करावीत.

  • छाटणीनंतर १००% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

  • त्यानंतर १० दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लीनची फवारणी करावी.


३) सुत्रकृमी (Nematode) नियंत्रण

  • बहार धरताना हेक्टरी १.५–२ टन निंबोळी पेंड मिसळावी.

  • अथवा कार्बोफ्युरॉन ३% – १३५ किलो/हेक्टरी द्यावे.

  • किंवा फोरेट १०% – ४० किलो/हेक्टरी मुळाजवळ मातीत मिसळून द्यावे.

  • पॅसिलोमायसिस व ट्रायकोडर्मा पावडर ५ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून बुंध्याभोवती ओतावे.

  • हिरवळीच्या खतासाठी ताग/धेंचा वापर करावा.

  • प्रादुर्भावग्रस्त भागात झेंडू लावणे अत्यंत फायदेशीर.


४) फुलगळ (Flower Drop) नियंत्रण

  • वर्षातून एकच बहार घेणे उत्तम.

  • बहार धरताना हलकी छाटणी करावी.

  • बहारानंतर झाडाला योग्य खत व पाणी द्यावे.

  • बाग स्वच्छ ठेवावी; अनावश्यक ताण देऊ नये.

  • जास्त पाणी टाळावे.

  • महत्वाच्या किड-रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक.


निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी महत्वाच्या सूचना

  • ठिबक सिंचनाचा वापर करावा.

  • ओलावा नियंत्रण ही गुणवत्तेची कळी.

  • फळगळ टाळण्यासाठी नियमित मशागत, छाटणी व पोषक द्रव्य व्यवस्थापन करावे.

  • अवकाळी पाऊस व आर्द्रतेचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य फवारणी कार्यक्रम ठेवावा.

  • बाजारपेठ, आकार, रंग, टिकाव याची काळजी घेऊन निर्यात दर्जाचे उत्पादन घ्यावे.


निष्कर्ष

    डाळिंब हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उच्च उत्पन्न देणारे फळपीक आहे. योग्य तंत्रज्ञान, रोग-कीड व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार काम केल्यास निर्यातक्षम, टिकाऊ आणि भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे. विठेवाडी परिसरात झालेल्या या परिसंवादातील शिफारसी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

Pomegranate Farming | Bhagwa Pomegranate | Maharashtra Horticulture

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा | Parasitic Friendly Insect Trichogramma – जैविक किड नियंत्रणातील प्रभावी उपाय

🌱 परोपजीवी मित्र किटक : ट्रायकोग्रामा (Trichogramma)      परोपजीवी मित्रकिटकांपैकी ट्रायकोग्रामा हा एक अत्यंत महत्वाचा मित्रकिटक असून तो ...