कापुस कोंड्याची गोष्ट
Kapus kondyachi goshta
बळीराजाने काढला कापुस कोंड्याची गोष्ट चित्रपट,
चार बहिणींच्या संघर्षाच्या कथेतून साकारतो हा बोधपट...
पदार्पणातच चित्रपटाने केली ऑस्करवारी,
खडतर शेतकरी कुटुंबाची झाली वाताहात सारी...
आत्महत्या हा उपाय नसून जगा त्या चार बहिणींप्रमाणे,
खऱ्या अर्थाने त्या जगल्या, लढायला शिकल्यामुळे...
अभिनयात सरस, मातीची चित्तरकथा आहे कसदार,
आपल्या विचारातून उद्याचं स्वप्न पेरा दाणेदार...
सकारात्मक दृष्टीने आयुष्याला सामोरे जाऊन व्हा यशस्वी,
चित्रपटाने हा बोध दिला प्रत्येकाला मनस्वी...
नसेल पहायला वेळ मिळाला चित्रपटगृहात,
झी टॉकिज या लोकप्रिय चॅनेलवरती पहा घराघरात...
न संपणाऱ्या या कथेचा गाभा आहे समाजप्रबोधनाचा,
आत्महत्या नको आता, संघर्ष करून विचार करा जगण्याचा...
दीपू म्हणे पहा चित्रपट, घ्या बोध काहितरी,
शेतकऱ्याच्या जीवनाला आता खऱ्याअर्थाने कोण तारी...
© दीपक केदू अहिरे, नासिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment